आपण नक्की 'कोण'?
डोक्यात नेहमीप्रमाणेच गोंधळ झालाय.
पूर्वीची वर्णाश्रम पद्धती म्हणे आपण मोडीत काढलीये.
वर्ण - ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र आता नाहीत.
आश्रम - ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ, संन्यास हे देखील मोडीत.
ज्यावेळी ही पद्धत अस्तित्वात आली तेव्हा इतर पंथ अथवा प्रार्थना पद्धती नव्हत्या अथवा त्यांना तशी नावे नव्हती. इस्लाम, ख्रिस्ती इ.इ. वेगळे म्हणवणारे आणि बौद्ध, जैन इ. बंडखोर धर्म तेव्हा नव्हतेच.
(मी धर्म म्हणत नाहीये कारण धर्म म्हणजे माझ्यामते वस्तूचा स्वभाव असतो. अग्निचा उष्णता हा धर्म, बर्फाचा थंडपणा हा धर्म इ.इ.)
त्यामुळे सगळ्यांनाच या वर्णाश्रम पद्धतीचे जाणते अजाणतेपणी अनुकरण करणारे म्हणून अनुयायी म्हणायला प्रथमदर्शनी तरी प्रत्यवाय नसावा.
माझ्या माहितीप्रमाणे
ब्राह्मण म्हणजे यजन, याजन - यज्ञ करणारा आणि करवून घेणारा, अध्ययन अध्यापन करणारा, दान देणारा (ज्ञानदान, यज्ञदान, औषधांबद्दलचे ज्ञान वापरुन जीवनदान करणारा इ.) आणि घेणारा असा असणे अपेक्षित होते.
क्षत्रिय म्हणजे समाज व्यवस्था नीट चालावी म्हणून असणारा विश्वस्त अधिकारी, समाज रक्षण करणे, व्यवस्था नीट सांभाळणे इ. त्याची कामे.
वैश्य म्हणजे व्यापार करणारे, विविध प्रकारचे उद्योग धंदे करणारे आणि आपल्या साहित्य, मालमत्ता यांच्या रक्षणासाठी त्यातील नफ्याचा काही भाग कराद्वारे राजसत्तेला देणारे.
शूद्र म्हणजे वरील पूर्ण स्तरांना सेवा पुरवणारे, त्याना त्यांच्या त्यांच्या कार्यात मदत करणारे.
जर ही व्यवस्था मोडीत निघाली असे आपण म्हणत असू तर आज चालू असलेली व्यवस्था ( भारताबाबत बर्याच प्रमाणात अव्यवस्था) कशी सुरु आहे?
अध्ययन अध्यापनाच्या क्षेत्रात काम करणारे शिक्षक, प्रोफेसर, डॉक्टर, इंजिनिअर इ.इ. आपल्या ज्ञानाचाही वापर करत असतात. दान करत असतातच. शास्त्रज्ञ अभ्यास करत असतात, संशोधन करत असतात.ते ब्राह्मण म्हणावेत का?
महार बटालियन म्हणवणारी सैनिकांची तुकडी क्षत्रिय नाहीतर आणखी काय? बरेच सरकारी, खाजगी क्षेत्रात काम करणारे नोकरशहा /व्यवस्थापक समाज व्यवस्था नीट चालावी म्हणून कार्यरत असतात. ते ही क्षत्रियच ना?
उद्योगधंदा करणारा 'कोणीही' वैश्य म्हणून म्हणायला काय हरकत आहे? त्यांच्या पैशावर राजसत्ता चालते हे खरे आहेच की!
या सगळ्यांना सेवा पुरवणार्या विविध संस्था शूद्र म्हणवाव्यात का? ( शूद्र आणि क्षुद्र या श ब्दातील साम्य चीड आणते खरे पण ते पूर्ण वेगवेगळे शब्द आहेत)
आपल्या समाजामध्ये अजूनही बव्हंशी जन्मावरुनच त्याचा वर्ण ठरवला जातो. (जरी त्या त्या वर्णातील गुणसंपदा माझ्याकडे नसेल तरी )
समजा मी जर जन्माने वैश्य वर्णात मोडणार्या जातीमध्ये जन्माला आलो असेन आणि मला सेवा उद्योगामध्ये काम मिळालेले असेल तर मी स्वतःला वैश्य म्हणवून घेण्यात काय हशील आहे? याउलट एखादा शूद्र म्हणवणार्या कुटुंबात जन्माला येऊन संशोधनाचे काम करत असेल तर त्याला शूद्रच म्हणायचे का? भगवदगीता देखील 'गुणकर्म विभागशः' म्हणते पण प्रत्यक्षात तसे दिसत नाही.
प्रश्न असा पडलाय की मी नक्की कोण आहे?
आपण नक्की कोण आहोत?
जर जन्मकुल आणि गुणसंपदा यामध्ये विसंगती आढळत असेल तर मी ज्या कुळात जन्मलो त्याचा अभिमान, वैषम्य का बाळगावे? काय सांगता येईल?
वाचने
8740
वाचनखूण
प्रतिक्रिया
28
विचार
चांगला चर्चा प्रस्ताव
वर्णाश्रम
In reply to वर्णाश्रम by रणजित चितळे
चांगला प्रतिसाद. आदर्श
In reply to चांगला प्रतिसाद. आदर्श by नगरीनिरंजन
धन्यवाद
In reply to वर्णाश्रम by रणजित चितळे
काही प्रश्न
पण....
In reply to पण.... by पिलीयन रायडर
समाज मला माझ्या जातीनी ओलखतो,
In reply to समाज मला माझ्या जातीनी ओलखतो, by आत्मशून्य
पण किती दिवस??
In reply to पण किती दिवस?? by पिलीयन रायडर
एकीकडे तुम्ही आरक्षणाला बरोबर
आपण नक्की 'कोण'?
शूद्र आणि क्षुद
In reply to शूद्र आणि क्षुद by नर्मदेतला गोटा
कोण कोणास म्हणाले? काय लिहिले
.
In reply to . by नाना बेरके
कालबाह्य?? कसे ते कळेल काय
नविन वर्णव्यवस्था हवीए कशाला?
In reply to नविन वर्णव्यवस्था हवीए कशाला? by Nile
नविन वर्णव्यवस्था हवीए कशाला?
In reply to नविन वर्णव्यवस्था हवीए कशाला? by आत्मशून्य
संतुलित
हम्म
१. भारतीय समाजात वर्ण नावाचं
In reply to १. भारतीय समाजात वर्ण नावाचं by नितिन थत्ते
असेच म्हणतो. मागच्या
जातीपातींचा फार बारीक विचार
In reply to जातीपातींचा फार बारीक विचार by नर्मदेतला गोटा
हे ब्राह्मण स्वतःला काय
सेवा उद्योगामध्ये काम
चातुर्वण्य नव्हे ते तर चतुर---वर्ण्य...
In reply to चातुर्वण्य नव्हे ते तर चतुर---वर्ण्य... by अत्रुप्त आत्मा
_/\_ सुरेख प्रतिसाद.
अट्टाहास कशासाठी?
?