सध्या मिपाचा सर्वर खुपच गंडला आहे. मिपा हळु चालतेय की गोगलगाय यावर सध्या जोरात चर्चा आणि अभ्यास चालु आहे. धागे टंकायला घेतले की ते प्रकाशित होतीलच याची काही खात्री नसते (हे "मै सुबह घर से निकलता हू तो शाम को घर पहुचांगा की नही मुझे मालूम नही होता" या धर्तीवर वाचावे). सकाळी मिपाचा पहिला धागा उघडताना किमान ४ वेळा रिफ्रेश करावे लागते.
मिपाबद्दल किंवा व्यवस्थापनाबद्दल मला अजिबात तक्रार नाही कारण विनामोबदला, पदरचे पैसे खर्च करुन, संकेतस्थळ उत्पन्नाचा स्त्रोत म्हणुन न वापरता, संकेतस्थळ चालवणे अवघडच नाही तर अशक्य आहे. अश्या परिस्थितीत याहुन चांगल्या सुविधा देता येतील असे वाटत नाही.
पण आहे त्या सुविधांमध्येही फार तगतग न करता , सगळ्यांनी सहकार्य केले तर सर्वरवरचा ताण थोडा कमी करता येइल असा निष्कर्ष काही तज्ञांशी केलेल्या थोड्या चर्चेअंती निघाला आहे. चूक की बरोबर मला माहित नाही. मिपावरच अनेक तज्ञ आहेत ते सांगु शकतील. काही सुचना अश्या:
१. थोड्या दिवसांपुर्वी इतर कुठल्यातरी संकेतस्थळावर वाचले होते की खरडींमुळे देखील सर्वर वर ताण येउ शकतो. खरडवही मिपाची शान आहे. कुठल्याही अॅक्टीव्ह सदस्याच्या किमान हजारभर खरडी होतील असे वाटते, उदा.: माझ्या स्वतःच्या खवमध्ये १०००+ खरडी आहेत, स्पावड्याच्या खवमध्ये २०००+ आहेत, पराच्या खरडींची संख्या साधारण १८ हजार आहे. धम्याच्या खरडी २५०००+ असतील. या सगळ्या खरडी उडवल्या, किमान १ जानेवारी २०११ च्या आधीच्या उडवल्या तरी सर्वरवरचा ताण कमी होणे शक्य आहे काय?
२. मिपावर " मदत पाहिजे " चे १०० एक धागे असतील. त्यातील सगळेच्या सगळे माझ्यामते तरी कालबाह्य आहेत. त्यात कुठलेही साहित्यिक मुल्य नाही. त्या धाग्यांची गरजही आता संपली असावी, त्यांचा कार्यभाग साधला गेला असावा. काही अजुनही उपयोगी ठरु शकतील मात्र त्यांची संख्या फारच कमी असावी. संपादकांनी स्वतःच्या अखत्यारीत योग्य तो निर्णय घेउन असे धागे उडवले तरी हरकत नसावी.
३. पाकृंची संख्या सध्या उंदरांच्या प्रजननापेक्षा जास्त वेगाने वाढते आहे. कोणी काय प्रकाशित करावे हे सांगण्याचा माझा अधिकार नाही. तसा तो कोणाचाच नाही. मी लिहितो तेही काही खुप उच्च साहित्यिक मुल्यात मोडत नाही. पण बर्याच पाकृ अगम्य आहेत. त्या उडवता येतील.
४. बरेच कौल खोडसाळ असतात. ते चालु करण्यामागे लोकांचा काय हेतु असतो माहित नाही. पण असले कौल सर्वरचा ताण मात्र वाढवत असणार. उदा.: वायुपुत्राचे आगमन झाले आहे हा कौल? काय उपयोग आहे त्या कौलाचा. कोणीतरी त्या कौलावरच प्रतिक्रिया दिलेली आहे नवीन बाटलीतील जुनी दारु म्हणुन. ते चुकीचे आहे असे मलातरी मनापासून वाटत नाही. असल्यास त्या सदस्याची आगाऊ जाहीर माफी मागतो. परंतु तसे असले अथवा नसले जरी, तरी कौल तद्दन फुटकळ, फालतु, निरुपयोगी आणि अवाजवी आहे. असले अनेक कौल उडवता येतील.
इतर कोणाकडे काही उपाय असतील तर ते ही सांगावे. हे उपाय बरोबर आहेत की नाही आणि त्याचा काही उपयोग होइल की नाही हे ही सांगावे. नाहितर नीलकांत ने कितीही उपाय केले तरी मूळ समस्या तशीच राहिल.
वाचने
7617
प्रतिक्रिया
31
मिसळपाव
प्रतिक्रिया
मिपा चा सर्वर
आभार मृत्युंजय .... सगळे
सहमत..म्हणजे मिपा फार गंडत
>>नुसता स्टेशनरी टेक्स्टचा
In reply to सहमत..म्हणजे मिपा फार गंडत by गवि
खव आणि काही धाग्यांच्या साफ
मालक जाहीर माफी मागतो. आक्षेप
In reply to खव आणि काही धाग्यांच्या साफ by गणपा
अरे मित्रा तो गमती गमतीतला
In reply to मालक जाहीर माफी मागतो. आक्षेप by मृत्युन्जय
मृत्युंजय, मला वाटते की उपाय
सहमत
शे फ ग ण पा शी स ह म त !!
मी काय म्हणतो, काही लोकांनी
मी काय म्हणतो, काही लोकांनी
In reply to मी काय म्हणतो, काही लोकांनी by परिकथेतील राजकुमार
बोल्ले हे
In reply to मी काय म्हणतो, काही लोकांनी by परिकथेतील राजकुमार
...
In reply to मी काय म्हणतो, काही लोकांनी by परिकथेतील राजकुमार
विकासजी लिस्टमधुन 'नाडी'
In reply to ... by विकास
खरचं की!
In reply to विकासजी लिस्टमधुन 'नाडी' by गणपा
प्र का टा आ
बहुतांशी सहमत.
सहमत आहे .
In reply to बहुतांशी सहमत. by चिंतामणी
माझ्या अंदाजाप्रमाणे
एरर लॉग बघावा
टूल्स
वरील बर्याच जणांशी सहमत
हे सगळे त्रास कमी करण्यास
खरड
डेटाबेस
मिपा खुपच स्लो आहे.. त्यामुळे
अगदी हेच म्हणतो. अनेक मिनिटे एका पेजला..
In reply to मिपा खुपच स्लो आहे.. त्यामुळे by गणेशा
ओक्के
In reply to अगदी हेच म्हणतो. अनेक मिनिटे एका पेजला.. by गवि
सर्वर
च्यायला, या फटाल येरर ला आवरा रे........!