Skip to main content

मालवणी फिश करी

लेखक सानिकास्वप्निल यांनी शनिवार, 07/05/2011 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः पापलेट स्वच्छ करून तुकडे करणे १ वाटी खोवलेले खोबरे १ मध्यम कांदा बारीक चिरून २-३ लसुण पाकळ्या ३-४ आमसुलं १ टेस्पून धणे ५-६ बेडगी किंवा संखेश्वरी मिरच्या (आपल्या आवडीप्रमाणे कमी-जास्त) मीठ चवीनुसार १ टीस्पून गरम मसाला (ऐच्छिक) तेल ६-७ तिरफळं , आतील काळी बी काढुन टाकावी , तिरफळं पाण्यात भिजवावी, मग ठेचुन त्याच पाण्यात घालावी. (हे ऐच्छिक आहे) . पाकृ: पापलेटच्या तुकड्यांना थोडी हळद व थोडे मीठ लावून ठेवावे. धणे व मिरच्या १/२ तास गरम पाण्यात भिजवून ठेवणे. नंतर ओले खोबरे, लसुण, धणे, मिरच्या व कांदा एकत्र मिक्सरमधून बारीक वाटून घेणे. (कांद्यातील १ टेस्पून कांदा बाजुला काढून ठेवणे.) . वाटलेला तयार मसाला. . जाड बुडाच्या पातेल्यात तेल गरम करून १ टेस्पून कांदा गुलाबीसर परतून घ्यावा. . त्यात वाटलेला मसाला घालून चांगले परता. . कालवणासाठी लागेल तसे पाणी घालून उकळी आणा. त्यात माश्यांचे तुकडे, मीठ, गरम मसाला व आमसुलं घाला , सुमारे १० मिनिटे शिजवावे. . तिरफळाचे पाणी गाळून कालवणात घालावे व ४-५ मिनिटांनी शिजवून गॅस बंद करावा चिरलेली कोथिंबीर घालावी व चपाती, भाताबरोबर सर्व्ह करावी. .

वाचने 13533
प्रतिक्रिया 15

प्रतिक्रिया

In reply to by कौशी

कधी येउ जेवायला..... मी मत्स्यप्रेमी आहे. एव्हढी भारी पाकृ (आणि फटुसुद्धा) आहे. पण काय उपयोग??????????? खायला परवनागी असली तरी घरी करायला नाही परवानगी. मग काय करायचे?? :( म्हणूनच विचारले "कधी येउ जेवायला." :D

In reply to by सानिकास्वप्निल

पण त्यासाठी राणिच्या देशात यायचे की तु मातृभुमीला आल्यावर खाद्य मैफल ठेवायची?? :-/

'मालवणी' माश्याच्या आमटीत गरम मसालो खयसून इलो..?

व्वाह !! मार डाला ... आत्ताच एक व्हेज मधला फडतुस प्रकार पाहुन तोंडातली लाळ सुकली होती ... पण ही पाकृ पाहुन तोंड लाळावले ... :) लै भारी ;) - खानावळी फस्त करी

गोवा आणि सिंधुदुर्ग प्रदेशात कच्चे खोबरे वापरून केलेल्या आमटीत गरम मसाला सहसा वापरत नाहीत. गोव्यात तर लसूणही नसते. ओरिजिनल सिंधुदुर्गी फिशकरीतही बहुधा नसावी.

आज सोमवार आहे .पुढच्या आठवड्यात !!!

ते त्रीफळा चूर्ण ज्याचे बनव्तात ते का? करी मस्त दिस्तिये!