सावरकर आणि समाजकारण - पु.ल. देशपांडे
In reply to अप्रतिम भाषण! by प्रास
In reply to छान by नितिन थत्ते
सावरकरांची विज्ञाननिष्ठा नेहमीच आदरणीय+अनुकरणीय वाटलेली आहे.माफ करा, पण या आख्ख्या लांबलचक भाषणात सावरकरांच्या विज्ञाननिष्ठेचा उल्लेख करणारी दोन ते तीनपेक्षा* अधिक वाक्ये मला शोधूनदेखील सापडू शकली नाहीत. तो या भाषणाचा फोकस नसावा. * "विज्ञाननिष्ठेवरचे त्यांचे निंबंध ह्या दृष्टीने अभ्यास करण्यासारखे आहेत आणि ही विज्ञाननिष्ठा का? तर ती सदैव अज्ञानापोटी जन्माला येणाऱ्या अंधश्रद्धेच्या काळोखावर मात करायला निघालेली असते म्हणून." बस, एवढेच. (परिच्छेद २मधून उद्धृत.) त्याशिवाय, "साम्राज्यशाहीच्या आत्म्याचे गणित ते वैज्ञानिक पद्धतीने मांडू शकत होते" (परिच्छेद ४मधून उद्धृत.) या वाक्याचा अर्थ लागू शकला नाही**. गणिताच्या नेमक्या कोणत्या शाखेत हे शक्य होते? शिवाय, 'आत्मा' आणि 'वैज्ञानिक पद्धत' हे दोन शब्द एकाच वाक्यात पाहून मौज वाटली. ** अर्थात, वैज्ञानिक पद्धतीबद्दलच्या माझ्या अज्ञानाची पातळी सर्वज्ञात आहे. त्यामुळे केवळ कॉमन सेन्स***च्या आधारावर अर्थ लावणे भाग पडले. जमले नाही. तरी तज्ज्ञांनी कृपया - इच्छा असल्यास, आणि मुख्य म्हणजे जमल्यास - खुलासा करावा. *** याला विद्वज्जनांत 'धादान्तवाद'**** की कायसेसे म्हणतात, असे ऐकून आहे. (सावरकरांना आवडण्यासारखा प्रतिशब्द!) **** नुसता पोकळ शब्दांचा डोलारा! 'कॉमन सेन्स' सारखा साधासोपा आणि पब्लिकच्या तोंडात रुळलेला शब्द सोडून 'धादान्तवादा'सारखा फारसा कोणाच्या तोंडी नसलेला शब्द ओढूनताणून वापरायचा झाले.***** ***** तमाम विद्वज्जन सावरकरवादी असावेत काय?
In reply to माफ करा, पण... by पंगा
In reply to हे पण by नितिन थत्ते
सावरकर मात्र आपले शव विद्दुतदाहिनीत टाका म्हणतात.(विद्दुत दाहिनी हा शब्दही त्यांचाच असावा असे मला वाटते.) मंत्रपठणाची गरज नाही म्हणतात. नंतरच्या क्रियाकर्माची आवश्यकता नाही म्हणून बजावतात. आयुष्यभर सावरकर ह्या बुद्धिनिष्ठेचा पाठपुरावा करीत आले. अंधश्रद्धा माणसाला दुबळं करते हे सांगत आले. इहवादाचा पुरस्कार करीत आले. राष्ट्रहिताविरुद्ध कारवाया करणाऱ्यां अनुयायी मिळवण्यासाठी त्यांनी सत्याशी तडजोड करणे नाकारले. सावरकारांनी गाईला केवळ एक उपयुक्त पशू म्हटल्यावर तिच्या पोटातल्या तेहतीस कोटी देवांच्या भाकड काथांवर आपली तुंबडी भरणारे त्यांच्यावर तुटून पडले होते.यात 'रूढींच्या अंधानुकरणास विरोध' आहे, मान्य. 'बुद्धिनिष्ठा'ही समजू शकतो. 'विज्ञाननिष्ठा' कुठे आली? 'विद्युद्दाहिनी वापरण्याचा आग्रह' हा फार तर 'अद्ययावत गोष्ट वापरण्याचा कंझ्युमेरिस्ट अट्टाहास किंवा हव्यास' म्हणता येईल. म्हणजे घरातला जुना पिच्चर ट्यूबवाला टीव्ही व्यवस्थित चालत असताना 'आम्हाला लेटेष्ट मॉडेलचा फ्ल्याटस्क्रीन एलसीडी टीव्ही पाहिजे' म्हणण्यासारखे. (त्यात काही गैर आहे असा दावा नाही. माणसाला नवनवीन वस्तूंची हौस असू शकते.) पण त्यात जोपर्यंत तो फ्ल्याट स्क्रीन एलसीडी टीव्ही (किंवा विद्युद्दाहिनी) नेमका कसा चालतो (/चालते) याचे वैयक्तिक ज्ञान किंवा संशोधन नाही, त्यातील पुढील सुधारणांसंबंधी (प्रॉडक्ट डेवलपमेंट किंवा इंप्रोवायझेशन अशा अर्थी) संशोधनाकरिता काही वैयक्तिक इन्पुट किंवा योगदान नाही, तोपर्यंत त्याला 'विज्ञाननिष्ठा' म्हणता येईल काय? मुंबई ते ठाणे जी पहिली झुकझुकगाडी धावली, तेव्हा तिला 'चाक्या म्हसोबा' म्हणून तिच्यासमोर नारळ फोडणारांपैकी अनेकांनी पुढे 'साहेबाचा पोर्या मोठा अकली, बिनबैलाची गाडी कशी ढकली' म्हणतम्हणत का होईना, पण (तिकीट काढून किंवा विनातिकीट) ती झुकझुकगाडी पुढे प्रवासाकरिताही वापरली असेल. अट्टाहासाने वापरली असेल. (सोयिस्कर असेल, तर का नाही वापरणार?) ते सगळे 'विज्ञाननिष्ठ' झाले काय? 'रेल्वेचे जे काय दीडदोन पैशाचे किंवा त्या काळी जे काही भाडे असेल तितक्या पैशांचे तिकीट विकत घेणे' एवढ्या भांडवलावर स्वतःला 'विज्ञाननिष्ठ' म्हणवून घेता यावे काय? झुकझुकगाडीचे तिकीट हे विज्ञाननिष्ठांच्या मांदियाळीचेही तिकीट ठरावे काय? 'उपभोक्तावाद' ही ऑपॉप 'विज्ञाननिष्ठा' कशी काय होऊ शकते? ('उपभोक्तावादा'त नेमके गैर असे काही असावेच असे नाही हे मान्य करूनही.) बाकी, 'विद्युद्दाहिनी' हा शब्द बनवणे हे सावरकरांच्या भाषाशुद्धीच्या ध्येयाशी सुसंगत असेलही, परंतु असा एखादा शब्द बनवणे यातही 'विज्ञाननिष्ठा' नेमकी कोठे आली? (त्याशिवाय, "साम्राज्यशाहीच्या आत्म्याचे गणित ते वैज्ञानिक पद्धतीने मांडू शकत होते" यांसारखी वाक्ये केवळ अनाकलनीय. कोनाड्यातल्या हिंदमातेची आठवण आल्यावाचून राहिली नाही.)
In reply to तरीही... by पंगा
In reply to पंगा शेठ अहो त्याकाळात अनेक by निनाद मुक्काम …
ह्या जुन्या रूढींना सारून त्याकाळात अत्यंत व्यवहारी व सोपा आणी पर्यावरणाचे रक्षण करणारा ( वृक्ष तोड न होता ) विद्युत द्हीनीचा वापर करावयाच त्यांनी सांगितले .वीज कोठून येते? Long tailpipe theoryबद्दल आपण ऐकलेले नाही काय? (विजेच्या वापराला माझा व्यक्तिशः विरोध नाही, पण) पर्यावरणवादच जर यात मध्ये आणायचा असेल, तर मग विजेचा वापर हा ऑपॉप पर्यावरणवादी होतो, हे गृहीतक तपासल्याशिवाय तसेच स्वीकारता येईल काय? वीजनिर्मिती ही सामान्यतः एक तर लाकूड किंवा कोळसा यांसारखी इंधने जाळून व्हावी (म्हणजे प्रदूषण आले आणि लाकडाच्या पर्यायात वृक्षतोड आली.) किंवा धरणांतून, पाण्याचा कडेलोट करून त्यावर जनरेटर ('जनित्रे') चालवून व्हावी (म्हणजे धरणे बांधण्यासाठी गावांचे विस्थापन वगैरे आले आणि कदाचित त्याबरोबर वृक्षतोडही आली.). (अणुऊर्जेतून वीजनिर्मिती वगैरे प्रकार सावरकरांच्या काळी असावेत का, याबद्दल साशंक आहे.) म्हणजे, वृक्षतोड, पर्यावरणाचा र्हास वगैरे बाबी फक्त उपभोक्त्याच्या ठिकाणापासून दूर होऊन इतरत्र गेल्या. म्हणजे विजेच्या वापरातून पर्यावरणाचा र्हास टळला वगैरे नाही. दृष्टीआड झाला, इतकेच. हं, आता हा (वीज न वापरल्याने) जागच्याजागी होणारा र्हास विरुद्ध (वीजनिर्मितीतून झालेला) इतरत्र गेलेला र्हास यांचे गणित मांडून तुलना करता येईल. त्यातून कोणता पर्याय अधिक पर्यावरणवादी, वगैरे निष्कर्ष काढता येतील. कोण जाणे, कदाचित Long tailpipe theoryत फारसे तथ्य नाही, असेही कदाचित या गणितातून सिद्ध होईल. हे गणित मी केलेले नाही, त्यामुळे नक्की काय ते मला माहीत नाही. मुद्दा हा आहे, की (१) सावरकरांनी हे गणित केलेले होते काय? तसे गणित त्यांनी स्वतः केलेले असल्याबद्दल काही माहिती आहे काय? की (२) 'विद्युद्दाहिनीच्या वापरात वृक्षतोड ही डोळ्यांना दिसत नाही, त्यामुळे हा पर्याय वरकरणी पर्यावरणवादी वाटतो' या 'फीलगुड फ्याक्टर'वर आपले गृहीतक आधारलेले होते? की (३) विजेचा वापर हा अद्ययावत पर्याय आहे, त्यामुळे वैज्ञानिक प्रगतीचे लक्षण म्हणून बाय डिफॉल्ट 'विज्ञाननिष्ठ' पर्याय आहे, असे काही गृहीतक होते? (२) हा पर्याय असल्यास काही आक्षेप नाही, शेवटी मानवी स्वभाव आहे आणि सावरकरही मानव होते. पण त्या परिस्थितीत त्यांचा विद्युद्दाहिनीचा आग्रह हा त्यांच्या विज्ञाननिष्ठेचे द्योतक म्हणता येईल का, याबद्दल साशंक आहे. (३) हा पर्याय 'विज्ञाननिष्ठ' पर्याय ठरू शकतो की नाही, याबद्दल खात्री नाही, परंतु निदान पर्यावरणाच्या कारणावरून तरी तो 'विज्ञाननिष्ठ' ठरू नये (कारण त्या दृष्टीने पुरेशी चिकित्सा झालेली नाही). (१) हा पर्याय योग्य आहे याबद्दल काही खात्रीलायक माहिती असल्याखेरीज या आग्रहामागे पुरेशी वैज्ञानिक चिकित्सा झालेली असल्याचे माझ्या मर्यादित समजशक्तीस तरी जाणवत नाही, त्यामुळे अशा खात्रीलायक माहितीअभावी 'विज्ञाननिष्ठे'चे लेबल लावण्याची घाई मला तरी करवत नाही. बाकी चालू द्या. (अर्थात, हा सगळा आमच्या अर्धवट अज्ञानाच्या आधारावर आम्हाला धड न कळलेल्या गोष्टींवर टाकून दिलेला आमचा पो आहे. वि़ज्ञाननिष्ठ तज्ज्ञ विद्वज्जन यावर योग्य काय तो तपशीलवार खुलासा करतीलच - करतच असतात. त्यामुळे, अधिक तपशिलांसाठी तज्ज्ञ विद्वज्जनांना गाठावे.)
In reply to ? by पंगा
In reply to ? by पंगा
(अर्थात, हा सगळा आमच्या अर्धवट अज्ञानाच्या आधारावर आम्हाला धड न कळलेल्या गोष्टींवर टाकून दिलेला आमचा पो आहे. वि़ज्ञाननिष्ठ तज्ज्ञ विद्वज्जन यावर योग्य काय तो तपशीलवार खुलासा करतीलच - करतच असतात. त्यामुळे, अधिक तपशिलांसाठी तज्ज्ञ विद्वज्जनांना गाठावे.)असा डिसक्लेमर टाकुन दिलात. त्यामुळे वरच्या पोस्टची समीक्षा करणे शक्य नाही. असो. पु.ल. यांच्या एका भाषणात तुम्हाला सापडणे अवघड आहे. कारण ते पु.ल. यांचे मत आहे आणि अतीशय योग्य आहे. ते योग्य कसे हे समजायला अभ्यास करायला हवा. स्वा.सावरकरांचे लिखाण वाचा. त्यात अनेक गोष्टी दिसतील. थोडी तसदी घेतल्यास दुस-याकोणी समजावुन सांगायची गरज पडणार नाही.
स्वा. सावरकरांच्या पुण्यतिथीला, २६ फेब्रुवारी १९८३ ह्या दिवशी, अंदमानच्या सेक्युलर तुरूंगातील मैदानात पु.ल.देशपांडे यांनी भाषण केले होते.'सेक्युलर' तुरुंग??? खरोखरच त्या तुरुंगाचे असे नाव आहे? हिंदुस्थानातील सेक्युलरिझमचे मूळ इंग्रजी सत्तेत आहे, असे यातून समजावे काय? की यात स्वातंत्र्योत्तर काळात गावोगावच्या 'मेन स्ट्रीट'चे 'महात्मा गांधी मार्ग' असे पुनर्नामकरण करणार्या हरामखोर काँग्रेसचा काही हात आहे? (सावरकरांसारख्या हिंदुत्वाभिमानी महापुरुषाला 'हिंदू तुरुंगा'त ठेवण्याऐवजी जाणूनबुजून 'सेक्युलर तुरुंगा'त त्यांची रवानगी करून त्यांना यातना देऊ पाहणार्या अधिक त्यांचा अपमान करू पाहणार्या इंग्रज सरकारचा त्रिवार निषेध! कोलूचा अपमान यापुढे काहीच नव्हे.)
In reply to अवांतर शंका by पंगा
In reply to तुरुंगाचे नाव "सेल्युलर जेल" by दीपक साळुंके
अलीकडे कुठेही सभेला गेल्यावर गाणी ऎकावी लागतात ती बहुदा सिनेमातली किंवा प्रसंगाला साजेशी अशी तितल्याच शाळेतल्या गुरुजीनीं कानामात्रांची यथेच्छ मोडतोड करून जुळवलेली स्वागतपर पद्दं. आणि इथे पेटीवाल्यांनी सुर धरला तबलजीने ठेका सुरू केला आणि अस्खलित वाणीने त्या दलित भगिनींनी गाणे सुरू केले. - जयोस्तुते श्री महन्मगंले शिवास्पदे शुभदे! स्वतंत्रते भगवती त्यामहं यशो युतावंदे! माझ्या अंगावर सर्रकन काटा आला. ज्या दलितांचे जीवन सुधारावं, त्यांना समाजात मानाने जगता यांव- मोकळेपणाने गाता यांव वावरता यांव म्हणून सनातनी धर्मबांधवांचे शिव्याशाप सहन करित ज्या सावरकरांनी जींवाचं रान केलं त्यांनी रचनेत हे स्त्रोत्र मुक्तमनाने दलित स्त्रिया बिनचुकपणाने उत्तम सुराचालात गात होत्या.दलित भगिनींची वाणी अस्खलित का असू नये? एखादे गाणे दलित स्त्रियांनी बिनचूकपणे आणि उत्तम सुरातालात का गाऊ नये? यात अंगावर सर्रकन काटा येण्यासारखे नेमके काय आहे?
एखाद्याचं पुण्य फळाला येणं म्हणजे काय याचा मला त्या क्षणी अनुभव आला.हा भाग तर मुळीच कळला नाही. सावरकरांचे पुण्य "दलितांना 'शुद्ध' बोलायला शिकवणे" यात होते काय? (नाही म्हणजे, सावरकरांच्या कार्याबद्दल - विशेषतः दलितांसंबंधी केलेल्या कार्याबद्दल - प्रशंसा समजू शकतो. पण हे म्हणजे थोडेसे चुकीच्या गृहीतकांवरून भलत्याच गोष्टींची प्रशंसा केल्यासारखे होत नाही काय? आणि तेही बहुधा स्वतःच्याच पूर्वग्रहांतून? "दलितांची भाषा'शुद्धी'" वगैरे विचार सावरकरांच्या मनातही नसावेत, किंवा असलेच तर ते त्यांचे मुख्य उद्दिष्ट नसावे, असे मानावयास जागा आहे. शिवाय, "दलितांची भाषा, त्यांचे उच्चार शुद्ध नसतात" हे गृहीतक या वाक्यांमागे दडलेले आहे, जे अस्थानी आहे आणि तसेही तपासून पहावे लागेल. अशा परिस्थितीत अशी 'प्रशंसात्मक' वाक्ये - मग भले ती पु.लं.ची का असेनात - अनवधानाने का होईना, पण भलतेच काहीतरी सुचवून जात नाहीत काय? दुर्दैवाने, ही विधाने बहुधा प्रामाणिकपणे केलेली असावीत, यास बहुधा अनवधान कारणीभूत असावे, असे मानावयास जागा असल्याने, याला 'वामहस्त प्रशंसा'ही म्हणवत नाही. भाषणास उपस्थित अपेक्षित श्रोतृवर्ग - टार्गेट ऑडियन्स - नेमका कोणता होता, याची कल्पना नाही, परंतु भाषण निर्विघ्नपणे पार पडले असल्यास, एवढेच नव्हे, तर श्रोतृवर्गाच्या प्रशंसेचे धनी ठरले असल्यास, आश्चर्य वाटणार नाही.)
जयोस्तुते श्री महन्मगंले शिवास्पदे शुभदे! स्वतंत्रते भगवती त्यामहं यशो युतावंदे!सावरकरांच्या प्रशस्तीपर असलेले एखादे भाषण उद्धृत करताना बाकीचे भाषण सोडा, पण किमान त्यात आलेले सावरकरांचेच एखादे पद तरी मुळाबरहुकूम, मोडतोड न करता, टंकलेखनाच्या चुका न करता उद्धृत करण्याची काळजी घ्यायला हवी होती, असे वाटते. (हा ब्याकड्राप लक्षात घेता, ते गाणे कोणीतरी बिनचूकपणे गाऊ शकते हे कौतुकास्पद आहे असे कोणाला वाटल्यास, ते क्षम्य असावे का, असा विचार मनात येऊ लागतो.) बाकी, उर्वरित भाषण उतरवून काढतानाही टंकलेखनाच्या चुका पदोपदी, मुबलक,आणि रसभंग करणार्या आहेत, ज्या पु.लं.नी स्वतः केल्या नसाव्यात, असे मानावयास जागा आहे. (हा बर्टुड रसेल कोण?) पुढील लेखनास शुभेच्छा.
In reply to कळले नाही by पंगा
In reply to @प्रारंभी थट्टेवारी नेलेले by निनाद मुक्काम …
चेपू ,खरडवही असे अनेक शब्द येथेच मी पहिल्यांदा वाचले .व आता आवर्जून त्यांचा उपयोग करतो .उदाहरण तितकेसे चपखल नाही. चेहरापुस्तक, खरडवही हे शब्द नको तितके सुटसुटीत आहेत. (शिवाय, नक्की खात्री नाही, पण 'चेहरा' हा शब्द बहुधा 'यावनी' - म्हणजे काय कोण जाणे - आहे. याने की आक्षेपार्ह.) फेसबुकसाठी 'वदनग्रंथ'सारखे पर्याय अधिक सयुक्तिक ठरले असते. (खरडवहीसाठी प्रतिशब्दाबद्दल विचार करावा लागेल.)
अर्थात गाय ,डुक्कर माझ्यासाठी पशु आहेत .व खाद्यगायीला खाद्य करण्यासाठी सावरकरवादाची (किंवा गायीचीही) कास धरावी लागत नाही. (स्वानुभवाने सांगतो.) (अतिअवांतर: केरळमधील हिंदुबांधवांत गोमांसभक्षण निषिद्ध मानले जात नाही, किंबहुना केरळबाहेरील 'मेनस्ट्रीम' हिंदुत्वात असा काही निषेध आहे, असे त्यांच्या अनेकदा गावीही नसते, असाही अनुभव आलेला आहे.)
In reply to @पंगा आपल्याकडून मराठी भाषेस by निनाद मुक्काम …
आपल्याकडून मराठी भाषेस गटणे छाप पद्धतीच्या मराठीत नवीन नवीन शब्द निर्माण करावे .म्हणजे आम्ही सर्व उपकृत होऊ'चेहरापुस्तक' वगैरे शब्दांस माझा आक्षेप नाही. (मला ते बर्यापैकी सुटसुटीत आणि मराठीस त्या मानाने बरेच जवळचे वाटतात.) मुद्दा एवढाच आहे, की असे सुटसुटीत मराठीकरण हे 'सावरकरी' वाटत नाही. आणि 'यावनी' वगैरे आक्षेप माझे नाहीत. सावरकरांचे असू शकतात. तेव्हा, 'गटणेछाप' शब्दांकरिता माझे उपकार मानू नका. ते श्रेय योग्य ठिकाणीच गेलेले बरे. ('वार्ताहर' वगैरे शब्दांचे एवढे काय कौतुक ते कळत नाही. 'खबर्या', किंवा गेला बाजार 'बातमीदार' वगैरे शब्दांत काय वाईट आहे? 'बातमीदार' तर मराठीत छान रुळलेला आहे. त्या मानाने 'वार्ताहर' हा छापील मराठी वगळता एरवी कोण कुठे वापरतो? आणि तिथेदेखील - म्हणजे छापील मराठीत - 'बातमीदार' हा शब्द आजमितीस जवळपास तेवढ्याच प्रमाणात वापरला जात असावा. मग 'वार्ताहर'चे एवढे काय अप्रूप? 'हुंडी'सारखे शब्द-संकल्पना मराठीत अगोदरपासून असताना 'धनादेश' कशासाठी? (आणि तसेही छापील मराठी वगळता 'धनादेश' कोण वापरतो?) 'खाणावळ' असताना 'उपाहारगृह' कशासाठी? 'आपल्याला संस्कृत शब्द माहीत आहेत, आणि आपण त्यांची जुळवाजुळव करू शकतो' हे दाखवण्यासाठी? 'महापौर' हे तर सरळसरळ 'फर्स्ट सिटिझन'चे रूपांतर वाटते. अर्थात, रूपांतरात काही गैर नाही, आणि 'मेयर' हा शब्द मराठीत अनैसर्गिक वाटतो हे खरेच आहे, पण 'महापौर' तरी आपण खर्या अर्थाने अंगीकारला आहे का? अनेकदा तो बोलीत ओढूनताणून 'म्हापौर' होतो, काहीतरी अनैसर्गिक - म्हणजे मराठीत अनैसर्गिक - शब्द उच्चारल्यासारखा. त्यातून 'शहराचा प्रमुख नागरिक' हा अर्थ किती जणांना चटकन लक्षात येतो? 'मेयर' ओढूनताणून म्हणायचा तसाच 'महापौर' - 'म्हापौर' ओढूनताणून म्हणायचा, इतकेच. तो शब्द म्हणताना त्या शब्दाबद्दल आपुलकीची भावना खरोखरच किती जणांना येते? त्यापेक्षा 'पाटला'च्या किंवा 'पुढार्या'च्या धर्तीवरचा पण शहरी पातळीवरचा एखादा मराठी सुटसुटीत शब्द नसता का बनवता आला? 'म्होरक्या'ही एक वेळ चालू शकला असता. पण तो सोडून देऊ. 'शहरप्रमुख', किंवा 'शहर' यावनी वाटतो तर 'नगरप्रमुख', 'नगरमुख्य', 'नगरनायक' किंवा 'नगरनाईक' वगैरे नसते चालू शकले? सुटसुटीतही झाले असते, 'मराठी'ही झाले असते आणि त्यातून सुचवायचा अर्थ लोकांना चटकन सुचलाही असता. 'महापौर'ने नेमका कोणाला काय अर्थबोध होतो? किंवा, तसेच बघायला गेले, तर 'वार्ताहर'मधून 'वार्ता खेचून आणणारा' हा अर्थ कोणाला सांगितल्याशिवाय लक्षात येतो? 'बातमीदार'मधून 'बातमी देणारा' हे चटकन समजते तरी. अतिअवांतर: 'वार्ता खेचून आणणारा' मध्ये एका प्रकारची 'वार्ता बाहेर येत नसली, घडत नसली, तरी खेचून, म्हणजे शब्दशः "ओढून किंवा ताणून" अर्थात "ओढूनताणून" आणणारा' अशी छटा येते. 'बातमीदार'मधून 'घडते तशी बातमी निमूटपणे देणारा' असा अर्थ प्रतीत होतो. सावरकरांना 'तहलका'छाप पत्रकारिता अभिप्रेत होती काय? सावरकर द्रष्टे असल्याबद्दल ऐकलेले आहे, पण इतकेही द्रष्टे असतील असे वाटले नव्हते. आदर वाढला.)
गायीचे उदाहरण फक्त इतक्यासाठी दिले .की जुन्या प्रथा किंवा रूढी ह्यात प्रथम दर्शनी वैज्ञानिक दृष्ट्या मला काही वावग दिसले नाही तर मी त्या पाळत नाही .मला सोयीच्या नसतील तर जुन्या रूढी मीही पाळत नाही. पण त्याकरिता सावरकरांना मध्ये का आणायचे?
बाकी आपल्यामुळे केरळ मधील प्रथा कळली पण तिचे माझ्या प्रतिसादात काय प्रयोजन ?तो मुद्दा थोडा अवांतर होता. पण नाही म्हटले तरी त्याला प्रयोजन आहे. केरळमधल्या हिंदूंना केरळबाहेरील उर्वरित हिंदूंमध्ये असा काही निषेध आहे हे माहीत नसावे. त्याचप्रमाणे केरळबाहेर 'सावरकर' नावाचे कोणी होऊन गेले हेही (बहुधा) माहीत नसावे. थोडक्यात, (हिंदू असूनही) गोमांसभक्षण करण्याकरिता सावरकरवादाची आवश्यकता नसावी, एवढाच मुद्दा आहे.
In reply to काही मुद्दे by पंगा
In reply to वाह रे वाह. by चिंतामणी
महाराष्ट्रातल्या सुशिक्षीतांनासुद्धा स्वा.सावरकर समजत नाहीत ते केरळियांना काय कळणार.माझ्या समजुतीकरिता विचारतो. केरळीय हे महाराष्ट्रीयांपेक्षा, खास करून महाराष्ट्रातील सुशिक्षितांपेक्षा (खास करून समजुतीत) कमी प्रतीचे असतात, असा आपला दावा आहे काय? (अरेरे! हीच का ती 'आसिन्धुसिन्धुपर्यन्त हिन्दुबान्धवां'बद्दलची आत्मीयता? आणि तीसुद्धा (सावरकर न कळतासुद्धा) 'गाय हा एक उपयुक्त (खाद्य)पशू आहे' हे सावरकरतत्त्व नीट कळणार्या हिन्दुबान्धवांबद्दल??? सावरकरांचा आत्मा आपल्या विद्युद्दाहिनीत गरगर फिरू लागेल ना हे ऐकून!)
In reply to ? by पंगा
In reply to ? by पंगा
In reply to काही मुद्दे by पंगा
In reply to नवे शब्द by हुप्प्या
In reply to सहमत-असहमत by सुनील
मराठी शब्द बनवण्यासाठी संस्कृतच्या कुबड्यांची गरज भासणे हेच कमकुवतपणाचे लक्षण आहे.किंबहुना जी भाषा आम जनतेची भाषा होऊ शकली नाही (किंवा तसे तिला मुद्दामच होऊ दिले नाही) तिच्या कुबड्या मराठीस कशाला हव्यात? आपल्या माथ्यावर जी शासकीय मराठी मारली जात आहे, ती असल्या उद्योगाचे उत्तम उदाहरण आहे. 'शासन' काय, 'संपन्न' काय, 'प्रभावित' काय...!!
In reply to सहमत by प्रदीप
In reply to सहमत by प्रदीप
In reply to कुबड्या ? by मैत्र
शासकीय मराठी हा फार मोठा विषय आहे. (शासकीय हिंदी सुद्धा - कधी बँक व्यवहारातले हिंदी शब्द पहा. उदा> समाशोधन). त्याचा इथे संबंध जोडण्याचे कारण नाही.शासकीय मराठी व हिंदीही, विनाकारण संस्कृताळलेली आहे, असे नाही वाटत आपणास? ही वर आपण सर्वांनी दिलेली उदाहरणे संकृतशी नाळ जोडूनच तर आहेत की! ही असली शब्दावळ निर्माण करणार्यांची प्रेरणा व सावरकरांची प्रेरणा एकच असतील असे कुणी म्हणत नाही. सावरकरांनी त्यांच्या विशीष्ट निष्ठेमुळे हे केले, इथे काही बाबू लोक स्वतःसाठी कामे निर्माण करण्यसाठी व ती सुरू ठेवण्यासाठी करताहेत हा फरक आहे खरा, पण शेवटी परिणाम एकच.
In reply to सहमत-असहमत by सुनील
In reply to नवे शब्द by हुप्प्या
बातमीदार असताना वार्ताहर कशाला हवा असे विचारणे म्हणजे इंग्रजीत न्यूज रिपोर्टर आहे मग जर्नालिस्ट कशाला?'न्यूज रिपोर्टर' आणि 'जर्नालिस्ट' हे शब्द समानार्थी नाहीत.
नवे शब्द जेव्हा रुळतात तेव्हा त्यांची व्युत्पत्ती सर्वसामान्य लोकांना माहित नसते. अगदी इंग्रजीतही हे होते तेव्हा वार्ताहर ह्या शब्दाचा समास सामान्यांना उलगडता येत नाही म्हणून तो शब्द बाद असे म्हणणे बावळटपणाचे आहे.'वार्ताहर' हा (किंवा अन्य कुठलाही) शब्द मराठी(!)त बनवण्यास per se आक्षेप नाही. 'बातमीदार' सारखा शब्द मराठीत असताना, लोकांच्या तोंडी रुळलेला असताना, केवळ त्याचे मूळ 'यावनी' (पक्षी: 'त्यांचे') आहे एवढ्याच कारणास्तव तो हटवण्याच्या आणि त्याजागी ओढूनताणून जुळवलेला संस्कृतोद्भव (पक्षी: 'आपला') शब्द घुसडण्याच्या अट्टाहासाला विरोध आहे. (आजमितीस पाव खाल्ल्याने - किंवा शर्टप्यांट घातल्याने - जसा माणूस बाटू नये, तशीच रुळलेला 'परकीय' शब्द वापरण्याने भाषाही बाटू नये.)
शांपू ह्या शब्दाचे मूळ भारतीय चंपी मधे आहे. जगरनॉट ह्या शब्दाचे मूळ जगन्न्नाथात आहे. हे शब्द राजेरोस वापरणार्यांना त्यांचे हे मूळ माहित नसते. पण म्हणून हे शब्द इंग्रजीतून हद्दपार करायचा दुराग्रह लोक धरत नाहीत.नेमके! मग रुळलेले फारसी/अरबी/इंग्रजी शब्द राजरोसपणे वापरताना (मग त्यांचे मूळ माहीत असो वा नसो) ते मराठीतून तरी हद्दपार करण्याचा दुराग्रह का धरावा? 'जगरनॉट', 'शांपू' असे शब्द वापरण्याने इंग्रजांचे स्फुल्लिंग (म्हणजे काय कोण जाणे!) विझते काय? बाकी चालू द्या.
In reply to 'न्यूज रिपोर्टर' आणि 'जर्नालिस्ट' by पंगा
In reply to >>नेमके! मग रुळलेले by हुप्प्या
In reply to प्रेरणा by नितिन थत्ते
In reply to प्रेरणा by नितिन थत्ते
In reply to प्रेरणा by नितिन थत्ते
In reply to प्रेरणा by नितिन थत्ते
In reply to प्रेरणा by नितिन थत्ते
कायदा हा सोपा, साधा आणि सरळ शब्द परका असल्याने तो घालवायचा होता पण त्याला चपखल संस्कृतोद्भव शब्द सापडत नव्हता तो कसा बनवला (बहुधा अधिनियम हा तो शब्द असावा) यावर सावरकरांचाच एक लेख वाचलेला आहे.'अधिनियम' म्हणजे 'कायदा' किंवा कसे याबद्दल खात्री नाही, पण आजकाल 'विधी' हा शब्द त्या अर्थी वापरला जात असावा, असे वाटते. म्हणजे, निदान कायदेमंडळाला तरी 'विधीमंडळ' म्हणतात बॉ. यावरून, विधीमंडळात सकाळीसकाळी पास झालेल्या कायद्याला 'प्रातर्विधी' आणि दिवसाअखेरीस पास झालेल्या कायद्याला 'अंत्यविधी' म्हणावे किंवा कसे, हे कळत नाही.
In reply to प्रेरणा by नितिन थत्ते
>>सावरकरांच्या मते फारसी/अरबी शब्द हे आक्रमकांच्या संस्कृतीचे प्रतिनिधी आहेत. या प्रेरणेलाच मुख्य आक्षेप आहे (अशी प्रेरणा असणे हे विकृतीचे-किमान आचरटपणाचे* लक्षण मानावे का?) आणि त्या प्रेरणेतून वापरातले शब्द हद्दपार करून त्याजागी संस्कृत शब्द रूढ करण्याला आहे.नेमके! (किंवदंतेवरून) 'साहेब' हा शब्द यावनी आहे, त्याऐवजी 'राव' वापरावा. 'बाळासाहेब' नाही म्हणायचे, 'बाळाराव' म्हणायचे, असा अट्टाहास. म्हणजे बहुधा 'आईसाहेब' म्हटलेले चालू नये, 'आईराव' म्हणावे लागावे. "म्हणजे यांना 'आई'मागे 'साहेब' लागलेला चालत नाही, 'राव' लागलेला चालतो" असे कोणी का म्हणू नये?
In reply to प्रेरणा by नितिन थत्ते
In reply to सावरकर ब्राम्हण नसते तर थत्ते by परिकथेतील राजकुमार
In reply to खुलासा by नितिन थत्ते
अवांतर: सावरकर ब्राह्मण नसते तर माझे वाक्य बोचले नसते का?हॅ हॅ हॅ ते नसते तर तुम्ही हे वाक्य लिहिले असते का?
In reply to खुलासा by नितिन थत्ते
In reply to खुलासा by नितिन थत्ते
In reply to प्रतिभा by चिंतामणी
In reply to >>त्यांची " प्रतिभा " योग्य by नितिन थत्ते
In reply to >>नेमके! मग रुळलेले by हुप्प्या
>>'न्यूज रिपोर्टर' आणि 'जर्नालिस्ट' हे शब्द समानार्थी नाहीत. असहमत. मी एक तरी थेसॉरस काढून दाखवतो जिथे ते समानार्थी आहेत. पण मान्य नसेल तर रायटर आणि ऑथर हे समानार्थी आहेत. त्यांचे उदाहरण घ्या.न्यूजरिपोर्टर हा बहुधा जर्नालिस्टामध्ये मोडावा, परंतु प्रत्येक जर्नालिस्ट हा न्यूजरिपोर्टर असेलच, असे नाही. 'केसरी'-'मराठा'कार लोकमान्य टिळक हे जर्नालिस्ट होते. न्यूजरिपोर्टर बहुधा नसावेत.
मान्य नसेल तर रायटर आणि ऑथर हे समानार्थी आहेत. त्यांचे उदाहरण घ्या.हेही वरकरणी पटण्यासारखे वाटत नाही. थोडा विचार करावा लागेल. सामान्य अर्थाने 'ऑथर' हा बहुधा 'रायटर'चा उपसंच मानता यावा. याशिवाय 'ऑथर'ला (लिखाणाशी थेट संबंध नसलेल्या) इतरही अर्थच्छटा आहेत. (पहा: writer आणि author.) 'रायटर' हा बहुधा काहीही लिहिणारा व्हावा. (म्हणजे, ऐन परीक्षेच्या वेळी जर एखाद्याचा हात फ्रॅक्चर झाला, तर त्याची परीक्षा बुडू नये म्हणून त्याने सांगितलेली उत्तरे सांगितल्याबरहुकुम लिहिणारा जो लेखनिक अनेकदा दिला जातो, त्यालाही 'रायटर' म्हणतात. तो त्या लेखनाचा 'ऑथर' होऊ शकत नाही.) 'ऑथर'मध्ये लेखनस्वामित्व अभिप्रेत असते. तसेच 'ऑथर' हा कोणत्याही निर्मितीचा कर्ता असू शकतो; लेखनाचाच, असे नव्हे. थोड्या व्यापक अर्थाने, एखाद्या कृतीचे निर्मितीस्वामित्व ज्याला दिले जाऊ शकते, तो त्या कृतीचा 'ऑथर' ठरू शकतो. वरील दुव्यावरील 'ऑथर ऑफ अ क्राइम'ऐवजी 'रायटर ऑफ अ क्राइम' म्हणता येणार नाही.
In reply to >>नेमके! मग रुळलेले by हुप्प्या
तुम्हाला त्यांची प्रेरणा मान्य नसेल तर नसू द्या पण ह्या शब्दांचा आंधळा द्वेष का?या शब्दांचा द्वेष नाही. या शब्दांना, आणि अशा शब्दांमागच्या रुळलेले शब्द केवळ परकीय (विशेषतः फारसी-अरबी) भाषांतून उद्भवलेले आहेत म्हणून त्यांच्या उच्चाटनामागील द्वेषभावनेला, विरोध जरूर आहे. शब्दाचा उगम फारसीतून असो किंवा अरबीतून असो किंवा इंग्रजीतून, एकदा तो शब्द मराठीने स्वीकारला, तो मराठीत रुळला, की तो मराठी. मग अशा मराठी शब्दांचे उच्चाटन करून त्याजागी दुसरा एखादा स्वनिर्मित शब्द लादण्याला विरोध आहे. फारसी, अरबी शब्द हे जर मराठीत यावनी बलात्काराने आले असतील, तर त्याच न्यायाने हे कृत्रिम संस्कृतोद्भव शब्द मराठीत सावरकरी बलात्काराने आलेले आहेत, असे म्हणावे लागेल. (मराठीत परंपरेने आलेल्या तत्सम, तद्भव शब्दांना विरोध नाही. नवीन संकल्पनांकरिता, जोपर्यंत त्या संकल्पना नवीन आहेत आणि त्यांसाठी एखादा शब्द - कोणतेही मूळ असलेला - रूढ नाही तोपर्यंत आणि तोपर्यंतच, नवीन शब्द बनवायलाही तितकासा* आक्षेप नाही. विरोध आहे तो रूढ शब्दांच्या ठिकाणी असल्या लादलेल्या शब्दांना.) * अशा संकल्पनांकरितासुद्धा एखादा शब्द मुद्दाम बनवण्याऐवजी सामान्य वापरातून नैसर्गिकरीत्या आलेला कधीही बरा. पण बनवायचाच झाला, तर तो मराठीच्या स्वभावाशी शक्यतो मिळताजुळता असावा. केवळ संस्कृत ही आपली पुरातनभाषा आहे म्हणून संस्कृतातून ओढूनताणून बनवलेला नसावा. 'रेस्तराँ'(मराठीत 'रेष्टॉरंट')करिता 'उपाहारगृह' किंवा 'भोजनालया'ऐवजी 'खाणावळ' हा शब्द त्या दृष्टीने मराठीशी मिळताजुळता आणि अधिक जवळचा आहे. बहुधा आधीपासून रूढ असावा आणि नैसर्गिकतःही बनला असावा. (खात्री नाही.) मग मुद्दाम 'उपाहारगृह' कशासाठी? कोणालातरी भारदस्त वाटते म्हणून?
In reply to मेकॉले by नितिन थत्ते
In reply to ? by पंगा
In reply to बिंगो by नितिन थत्ते
In reply to अभावित परिणाम? by पंगा
In reply to बिंगो by नितिन थत्ते
In reply to सुंदर भाषण. अवांतर : अपेक्षित by प्यारे१
In reply to लेख आवडला. by पैसा
In reply to पाककृती - शब्दांचा खीमा by जयंत कुलकर्णी
सोने पे सुहागा
बाकी चर्चा हे खास मिपा चे लक्षण . अंदमानच्या सेक्युलर तुरूंगातीलअसे लिहीले आहे. ते सेल्युलर जेल आहे... बाकी सुंदरच..
केवळ राजकिय शत्रूंवरच नव्हे तर जिथे जिथे तुम्हाला अंधश्रद्धा दिसेल, अज्ञान दिसेल तिथे तिथे वीर पुरुषासारखे त्याच्यावर तुटून पडा
जीवनात प्रत्येक माणसाला तीन शक्तीशी सतत झूंज द्यावी लागते. बर्टुड रसेलने त्याचं वर्गीकरण केलं आहे. मनुष्य आणि निसर्ग, मनुष्य आणि समाज, आणि मनुष्य आणि तो स्वत: ह्या तिन्ही शक्तीशी त्याची रस्सीखेच चाललेली असते.या दोन वाक्यांसाठी चिंतामणीला मनःपूर्वक धन्यवाद! (आणि अर्थात मृत्युंजयावरच्या या अप्रतिम लेखासाठी पुलंना विनम्र अभिवादन)
In reply to साहीत्य : मिपावरील कुठलाही by चित्रार्जुन
In reply to धन्यवाद! by भाते
चिंतामणी यांचे आभार.