कार्ट्यांस...
लेखनविषय:
मिपावरच्या सर्व कार्ट्यांस समर्पित.
(चालः चल री सजनी अब क्या सोचे)
लिही रे भावा तू अपुल्या मनचे
डोहाळे कशाला प्रतिक्रियांचे
लिही रे...
टाकून खरडी भिक्षा मागणे
जमवून कंपू गोंधळ घालणे
असं काही ऽऽ करू नकोऽऽ, करू नकोऽ रे
लिही रे...
असेलही तुझी लेखणी धमाल
करिती इथले सगळेचि लाल
स्वतःचीऽऽ, स्वतःचीऽऽ, स्वतःचीऽच रे
लिही रे...
लिहीले जरी तू ओतुनि तनमन
गेले जरी पुढच्या पानी ते पटकन
दबलेलाऽ कोळसाऽ तो होईल हिरा रे
लिही रे...
जुन्या जाणत्यांचे लागावे चरणी
आतल्या गोटात लावावी वरणी
भाषा नाहीऽ शैली नाहीऽ पीआर हवा रे
लिही रे...
वाचने
6087
वाचनखूण
प्रतिक्रिया
12
जुन्या जाणत्यांचे लागावे चरणी
आतल्या गोटात लावावी वरणी
भाषा नाहीऽ शैली नाहीऽ पीआर हवा रे
लिही रे...
व्वाह व्वाह!! क्या बात !! क्या बात!! ;)
मस्तच ननि.
खूपच संदेशात्मक आहे. एकदम मस्त लिहिले आहे.
हे हे हे.. ननि मस्त एकदम मिटरमध्ये बसलय.
सह्ही!
लिही रे भावा तू अपुल्या मनचे
डोहाळे कशाला प्रतिक्रियांचे
लिही रे...
टाकून खरडी भिक्षा मागणे
जमवून कंपू गोंधळ घालणे
असं काही ऽऽ करू नकोऽऽ, करू नकोऽ रे
लिही रे...
छानच!!
हम्म! लिहित रहा! :)
लिहीले जरी तू ओतुनि तनमन
गेले जरी पुढच्या पानी ते पटकन
दबलेलाऽ कोळसाऽ तो होईल हिरा रे
ननि.. झक्कास्. :)
असेलही तुझी लेखणी धमाल
करिती इथले सगळेचि लाल
स्वतःचीऽऽ, स्वतःचीऽऽ, स्वतःचीऽच रे
लिही रे...
हे सर्वात जास्त आवडले आणि मागे एकदा नवीनच मिपाकर झालेल्या एका व्यक्तीच्या लेखावर एका जुन्याजाणत्या मिपाकाराने दिलेला नकारात्मक प्रतिसाद आठवला.
मस्त .. संदेश पण छान ...
हाहा.. मस्त जमलंय हो ननि.. आणि खरंय.. :)
झकास!
व्वाह व्वाह