'पाय्'विषयी थोडेसे -१
लेखनप्रकार
नमस्कार,
दररोज कुठला ना कुठ्ला डे साजरा होत असतो. हल्लीच 'पाय डे' साजरा झाल्याची बातमी वाचली आणि हा नक्की काय प्रकार आहे असा प्रश्न पडला आणि पाय विषयीची उत्सुकता वाढली.
शालेय जीवनापासुन डिग्री मिळेपर्यंत अधून मधुन डोकावणारा पाय्,त्याचा वाढदिवस म्हणून १४ मार्च साजरा केला जातो.योगायोगाने आईन्स्टाईन ह्यांची जन्मतारीख १४ मार्च आहे.
शालेय पुस्तकांतून परिघ आणि व्यास ह्यांचे प्रमाण म्हणजे पाय असे सांगितले जायचे. आणि वर्तुळाचे क्षेत्रफळ काढायचे झाल्यास पाय* त्रिज्या*त्रिज्या. हे प्रमाण कोणी काढले आणि पायची किंमत ३.१ अशी साधी न घेता त्याला न संपणारे अंक लावून irrational म्हणायचे कारण काय? ह्या प्रश्नांची उत्तरे मिळेपर्यंत नोकरी चालु झाली होती.
कॅल्क्युलेटरवर पायची किंमत साधारण ३.१४१५९२७५८ अशी येते. पाय म्हणजे- २२/७ अशी त्यातल्यात्यात समजणारे प्रमाण.
गणित्,विज्ञानाची परंपरा असलेल्या ईजिप्शियन संस्कृतीत(ख्रिस्तपूर्व १६००) परिघ आणि व्यास ह्यांचे मोजमाप करुन त्याचा अभ्यास केल्याचे पुरावे सापडतात.हजारो वर्षापूर्वींपासुनचा न सोडवता येणारा प्रश्न म्हणजे- squaring the circle.वर्तुळाएवढेच क्षेत्रफळ असलेला चौरस कंपास आणि (अंक नसलेल्या)पट्टीच्या साहाय्याने काढणे. हा प्रश्न सोडवत असताना काही निष्कर्ष काढले गेले-समजा परिघ d असेल आणि (८/९)*d चा चौरस काढला तर वर्तुळ आणि चौरस ह्यांचे क्षेत्रफळ साधारण सारखेच असेल.
वर्तुळाचे क्षेत्रफळ पाय्*d*d/4 आणि चौरसाचे ६४*d*d/८१ .दोघांची तुलना केली तर पाय ची किंमत मिळते-
२५६/८१ = ३.१६०४९३८२७१६०४९३८२७२७१..... आपण वापरतो त्या ३.१४ च्या जवळपास येते.
अर्किमिडीजच्या The measurement of circle मध्ये परिघ,चौरसाविषयीचे सिद्धांत सापडतात. एक आहे-
१)काटकोन त्रिकोण- एक बाजु r असेल आणि दुसरी बाजु २*पाय्*r असेल तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ आणि r त्र्यिज्या असलेल्या वर्तुळाचे क्षेत्रफळ सारखे असते.
म्हणजे- त्रिकोणाचे क्षेत्रफळ- १/२*(r)(२*पाय*r) =पाय*r*r . वर्तुळाचे क्षेत्रफळ म्हणून आपण जो formula वापरतो तो हा.
२)वर्तुळाची त्रिज्या r असेल ,२*r बाजुचा चौरस ,तर त्यांच्या क्षेत्रफळाचे प्रमाण- ११/१४ एवढे असते.
(पाय*r*r)/४*r*r = ११/१४
इथे पाय ची किंमत मिळते २२/७ !! शाळेत आपण पाय म्हणजे २२/७ सांगितले जायचे ते ह्यावरुन.
जगाला दशमान पद्धत देणार्या भारतात पायचा अभ्यास झाला नसल्यास नवल. ब्रम्हगुप्त ह्याने १०चे वर्गमूळ (म्हणजे साधारण- ३.१६२२) ही किंमत परीघ्/व्यासाचे प्रमाण म्हणून वापरली तर आर्यभट्ट- ह्यांनी ६२,८३२/२०,०००---> ३.१४१५६ ही किंमत वापरली.
हजारो वर्षे न सोडवता येणारा squaring the circle चा प्रश्न १९व्या शतकापर्यंत कायम होता.१८८२साली लिंडमन ह्या गणितीने असे करणे केवळ अशक्य आहे हे सिद्ध केले.आणि हा प्रश्न न सोडवता सुटला.!
१८९७ साली अमेरिकेतल्या इंडियाना राज्यात गूडविन ह्या गृहस्थाने काही पायच्या किंमती 'ठरवल्या'!-पाय-४/३.१६०४/३.२६ ..अशा काही. ह्या किंमती इंडियाना राज्याच्या बाहेर जो वापरेल त्यांनी गुडविन ह्यांना रॉयल्टी द्यायची असे बील पास करण्याची विनंती त्याने विधिमंडळात केली. गंमत म्हणजे हे बील सर्वांनी बीनविरोध मंजूरही केले! सुदैवाने अनेक वृत्तपत्रांनी ह्यावर टीका केली आणि बील शेवटी गुंडाळण्यात आले.
पाय हे ग्रीक अक्षरमालेतील सोळावे अक्षर.१६५२ मधे विल्यम ऑट्रेड ह्याने ह्याचिन्हाचा प्रथम वापर केला.प्रसिद्ध गणिती ऑयलर ह्यानेही १७३६ मध्ये ह्याचा वापर्-परिघ्/व्यास म्हणून चालु केला.रेनेसॉच्या काळात अनेक गणितींनी पायचीकिंमत काढण्याची सुत्रे शोधून काढली- काही भूमितीचा आधार घेवून तर काही बीजगणिताच्या सहायाने.यात श्रीनिवास रामानुजन ह्यांची infinite series वापरुन पायची किंमत काढण्याचे सूत्र प्रसिद्ध आहे.ह्याशिवाय पायच्या किंमती काढण्याची अनेक बीजगणितीय सुत्रे त्यांनी मांडली.
पायची किंमत विविध मार्गाने काढायचे प्रयत्न २० व्या शतकाच्या मध्यापर्यंत- संगणक अवतरेपर्यंत सुरु होते.(अजुनही आहेत).
पुढील भागात पायची किंमती काढण्याच्या सोप्या भूमितिय पद्धती पाहू.
(संदर्भ- PI- biography of the world's most mysterious number)

वाचने
12935
वाचनखूण
प्रतिक्रिया
37
रोचक लेख... मालिका वाचत आहे.
In reply to रोचक लेख... मालिका वाचत आहे. by ३_१४ विक्षिप्त अदिती
+१

In reply to +१ by राजेश घासकडवी
योग्य....
In reply to योग्य.... by प्रास
+२२/७
मस्त ...
मस्त लेखन! शाळेतले दिवस
In reply to मस्त लेखन! शाळेतले दिवस by रेवती
३५५/११३...
In reply to ३५५/११३... by पंगा
आमचे एक प्राध्यापक १००/३२
Phi - ϕ
In reply to Phi - ϕ by विनीत संखे
अपरिमेय
In reply to अपरिमेय by मिहिर
यावरून आठवले (अतिअवांतर)
In reply to अपरिमेय by मिहिर
ओके
मस्त लेख...
व्वा! मस्त! हे घ्या धमाल अवांतर...
In reply to व्वा! मस्त! हे घ्या धमाल अवांतर... by मन
खि: खि: खि:
In reply to व्वा! मस्त! हे घ्या धमाल अवांतर... by मन
मनोबा पायाळु आहेत असे वाटुन
In reply to मनोबा पायाळु आहेत असे वाटुन by वपाडाव
सहमत!
गोल्डन रेशो आठवला.
पाय चे क्यालक्युलेशन आर्य
पंमकिन पाय
३.१४/२२/७
छान उजळणीपर माहिती, पण आम्ही
सुंदर लेखमाला होण्यासाठी शुभेच्छा !
प्रसन्ना !! शनिवार-रविवार ची
३_१४ वैग्रे आकड्यांचे कुठे
रंजक धागा
छान
In reply to छान by स्मिता.
पूढील लेख वाचण्यास उत्सुक.
In reply to छान by स्मिता.
?
In reply to ? by पंगा
जाउंद्या हो!
In reply to जाउंद्या हो! by Nile
होना!
In reply to जाउंद्या हो! by Nile
?
In reply to ? by पंगा
<पीजे> अहो ते मेलच आदरार्थी
छान लेख
ऑयलर
In reply to ऑयलर by हुप्प्या
Euler असेच म्हणायचे असेल ना