लिहीतो आहे ते चर्हाट आनि पाल्हाळच आहे
पण जसं आठवतं आहे आणि आठवतं आहे तोपर्यंत लिहावंच असं म्हणत लिहीतो आहे .
म्हणजे ही गोष्ट डोंबीवलीची आहे.
फक्त चार फलाट असलेले स्टेशन होते तेव्हाची.
तेव्हा दिवा हे गुंड लोकांचं गाव आणि भांडूप तडीपारांचं गाव असं म्हटलं जायचं.
नवडोंबीवली नावाची सोसायटी उभी राहत होती तेव्हा
डोंबीवलीच्या घरांना भयगण्ड झाला नव्हता आणि दरवाजाच्या बाहेर लोखंडी जाळीचे सेफ्टी डोर नव्हते.
नव डोंबीवली सोसायटी आणि जळगावचे टँकरमधले दूध जवळजवळ एकाच वेळी डोंबीवलीत आले.
डोंबीवली म्हणजे फक्त डोंबीवली .
ठाकुर्ली वेगळीच.
तेव्हा चोळा पावर हाऊसच्या नळकांड्यातून काळा धूर येत होता आणि ठाकुर्ली स्टेशनच्या फलाटावर पण कोळशाची पावलं उमटायची .
बारा बंगल्याची शान टिकून होती आणि नवनाथ गॅंग आणि पनवेलकर गॅंगची कोळशाच्या राखेसाठी खून पाडत नव्हते त्यासुमाराची गोष्ट,
ठाकुर्ली आणि डोंबीवली एकमेकाच्या पायापायात येत नव्हते .सवा जोशी शाळेत ठाकुर्लीहून जायचे तर भाताची खाचरं आणि वांग्याच्या आकाराचे पिवळे हिरवे बेडूक तुडवत जायला लागायचं त्या दरम्यानची समजा ..
फारच लांबलचक होतंय पण नवडोंबीवली च्या बाजूला नवरे वखार त्यानंतर आफळे राम मंदीर त्यानंतर ओतूरकर कला मंदीर .
एक लाख चिमण्या एकाच वेळी चिवचिवतात ते मोठ्ठं झाड पण पाटकर बंगल्याच्या बाजूला नव्हतं तेव्हाची ही गोष्ट आहे.
पंचायतीची विहीर होती आणि पाण्याची पंचाईत नव्हती तेव्हाच्या डॉबीवलीची गोष्ट.
पाच मुलींच्या पाठीवर मुलगा झालेल्या (सहाच्या सहा बाळतपणं डॉक्टर वर्द्यांच्याच हातानीच )भक्कम बायका बालटीभर धुणं पाचशे एक च्या बारनी धोका आपटत धुवायच्या आणि मग घामानी थबथबलेल्या कपाळावर ओघळलेल्या दरबार गंधाची खूण नेटकी करून पुन्हा खाकी पावडर लावून कामाला लागायच्या त्या काळची गोष्ट .
(ज्यांच्या कडे पाचशे एक बार नव्हता त्यांच्या हिरण छाप काळा साबण होता आणि पैसेवाल्यांकडे सनलाईट बार होता)
मग डॉबीवली भरत गेली म्हणजे आंतर जिल्हा तांदूळ बंदी होती तेव्हापासून .
सवा जोशीच्या बरोबर साऊथ ईंडीयन एज्युकेशन सोसायटीची शाळ आली.
आता आपण ज्याला फ्लॅट म्हणतो त्याला तेव्हा लोकं ब्लॉक म्हणायची .
म्हणजे या दहा ओळीच्या पाल्हाळात दहा वर्षं पुढे आलोच की आपण.
आधी नवर्यांच्या वखारीवर पत्ता विचारला की पुरेसा व्हायचा आता मात्र बोडस मंगल कार्यालयाच्या पुढे आल्यावर पत्ता शोधायला लागायचा.
पत्ता विचारण्याची खूण आता लागायला लागली होती आणि या खूणेला मराठीत लँड मार्क म्हणायचे नाहीत .
ओतूरकरांच्या पुढे शेताडीत चाळी उभ्या राहील्या आणि शेताडीतल्या एका चाळीवर भिंतभरून पहीली जाहीरात लागली झरणची. भिंतीवरची त्या काळ्ची पहीलीच जाहीरात.
आता गनी आर्ट्सवाला रेल्वेच्या भिंतीचे महीन्याला अडीच लाख घेतो म्हणे.ते जाऊ देत.तर झरणची जाहीरात म्हणजे
लांब केस मोकळे सोडलेली बाई .तिच्या बाजूला एक छोटीश्शी कुपी आणि मोठ्ठ्या अक्षरात लिहीलं होतं झरण .
गाडीतून जाताना झरणची जाहीरात दिसायची .
स्लो गाडीतून जाताना झरण दिसलं की दिव्याला किंवा मुंब्र्याला उतरणारे ऊठून उभे रहायचे.
डोंबीवलीत रहाणारे पत्ता सांगताना झरण पर्यंत सरळ या मग डावीकडे किंवा उजवीकडे या असं वगैरे सांगायचे .
झरणची छोटीशी कुपी बाजारात मिळायची .
पाव किलो खोबरेलात मिसळली की हिरवंशार केशतैल तयार व्हायचं .
एकूणीसशे साठ सालचागुजरात अॅरोमॅटीक्स चा ब्रँड.
प्रकाशचं माक्याचं तेल किंवा दुनाख्यांचं शकुंतला हेअर ऑईल महाग पडणार्यांसाठी परवडणारे तेल.
दरबार गंध- खाकी पावडर -पाचशे एक बार -धनतक का डबल बी साबण -सनलाईट बार -डालडा असे काही मोजकेच ब्रँड तेव्हा होते .
मग गिरगावतली आणि गिरणगावतली माणसं रहायला इकडेच आली.
खानदेशी मास्तरं आली .
तीनशे ग्रॅम भाजी घेणारी जोडपी आली.
गाडगीळ चीफ ऑफीसर झाले -हेरंब सोसायटीसारखे शंभर लँडमार्क तयार झाले
सुबत्ता आली आणि झरण तेल नाहीसं झालं पण -डोंबीवली पूर्व झरणच्या पुढे -हा पत्ता कायम तसाच राहीला.
झरण म्हणजे एक अजरामर लँडमार्क झाला .
गुजराथ अॅरोमॅटीक डायरसाहेबाना (ब्रँडच्यामालकांना)पण डोंबीवलीच्या झरणचा इतिहास माहीती आहे की नाही
...क्या पता ?
माझी पण एक गडबड झाली मी झरण च्या ब्रँड बद्दल लिहीणार होतो पण ह्या झरणच्या कुपीचं बुच्चू काढलं आणि डोंबीवलीचा इतिहासच त्यातून भळभळून बाहेर पडला.
आता ह्यात माझी काय चूक बरं ?
वाचने
26354
प्रतिक्रिया
60
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त... मस्त...
मस्तच मुक्तक
छान
तुमच्या इतकी जुनी डोंबिवली
मुंबईची माहिती नाही. पण
पराशी सहमत. सुंदर लेखन.
In reply to मुंबईची माहिती नाही. पण by परिकथेतील राजकुमार
झरण ला आम्ही झरण पाटी
तुमचे लिखाण
!
असेच म्हणतो. +१००१
In reply to ! by बिपिन कार्यकर्ते
छान
सुंदर लेख.... नेहमीप्रमाणेच.
रामदास काका एक नंबरी ..... श
असेच म्हण्तो...
In reply to रामदास काका एक नंबरी ..... श by स्पा
झरण
वाह छान झरणाबद्दल माहीती नाही
क्या बात है
पूर्ण सहमत.
In reply to क्या बात है by श्रावण मोडक
सहमत
In reply to क्या बात है by श्रावण मोडक
पूर्ण सहमत
In reply to क्या बात है by श्रावण मोडक
अगदी सहमत !!
In reply to क्या बात है by श्रावण मोडक
मस्त खिळवुन ठेवणारा लेख !!!
+१
+२
व्वा..
चूकांचा बादशहा!!
अ प्र ति म
रामदासकाका, मस्तच लेख!!
लेखन भारी! अजूनही त्या भागाला
रामदास्रकाका एकदम भारी लिखाण,
क्या बात है!
काका अगदीच हळवे केले
सलाम!
+१
In reply to सलाम! by ऋषिकेश
असं झरण तुम्ही झर झर लिहिता
मस्त!!
कहां गए वो लोग ?
तुम स्वामी, हम दासा...
मस्तच
इतक्या साहजिक गप्पागोष्टी
In reply to मस्तच by धनंजय
हेच म्हणतो..
In reply to मस्तच by धनंजय
जुन्या आठवणींनी आधीच
भूतकाळाची सफर घडवलीत
सहमत. २० वर्षांपूर्वी गेले
In reply to भूतकाळाची सफर घडवलीत by हुप्प्या
इतक्या बाहेर फारशी कधी गेले
लेख आवडला
रामदासपंथी
क्लास १ लिखाण...
अहा हा ! थंडी हवा का झोका
अफलातुन!
आवडले
फार सुंदर लिखाण !
मस्तं !
निशब्द
मस्त
परत थोडं उत्खनन.
आदुबाळ, उत्खननाबद्दल लक्ष लक्ष धन्यवाद!
__/\__
अप्रतिम.. कसदार लेखन
झरण...!!!!!