मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

निमंत्रण

प्रकाश घाटपांडे · · काथ्याकूट
मिपावर लोकांना वादविवाद घालायला अथवा काथ्याकूट करायला फार आवडते. अशांसाठी आज एक कार्यक्रम आहे आज दि. ९ एप्रिल २०११ रोजी राजीव साने यांची पहिली मांडणी खालील विषयावर असेल. “युक्तिवाद म्हणजे क्लुप्तिचातुर्य नव्हे!” (वादविवादातील हमखास भरकटवणारे प्रकार, फॅलसीज) वेळ: संध्याकाळी ६.०० वाजता मांडणीला सुरुवात होईल. त्यापूर्वी पोचावे ही विनंती. स्थळ: मनीषा सोसायटीचे सभागृह, नवसह्याद्री जवळील अलंकार पोलीस चौकीकडून प्रतिज्ञा मंगल कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर `देवेश, (चितळे बंधू अधिकृत विक्रेते)” या दुकानाच्या रस्त्याला वळावे. व त्यानंतर लगेच उजव्या रस्त्याला वळून लगेचच्या डाव्या गल्लीत सभागृह आहे. पार्किंग : अलंकार पोलीस चौकीकडून प्रतिज्ञा मंगल कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर पार्किंग करणे सोयीचे ठरेल. येणार असल्याची सूचना व्यनी अथवा खरड वही तुन दिल्यास संयोजकास सोयीचे जाईल.

वाचने 2691 वाचनखूण प्रतिक्रिया 8

पक्का इडियट Sat, 04/09/2011 - 11:24
>>>>>“युक्तिवाद म्हणजे क्लुप्तिचातुर्य नव्हे!” (वादविवादातील हमखास भरकटवणारे प्रकार, फॅलसीज) सध्या वादविवाद करतांना ज्या व्यक्तीच्या मतांचा विचार चालू आहे त्या व्यक्तीच्या कार्य किंवा विचारांपेक्षा सदर व्यक्त्ती समलैंगिक होती की काय अशा पद्धतीच्या चर्चांना भरकटवणार्‍या युक्त्यांचा वापर केला जात आहे.

राजीव साने हे पुण्यातील मुक्त विचारवंत आहेत. ते कामगार चळवळीचे विश्लेषक असुन तत्वज्ञान व समाजशास्त्राचे अभ्यासक आहेत. पुण्यात ज्ञानप्रबोधिनीत चालणार्‍या जनतंत्र - उद्बोधन मंच ( राषट्रवाद अभ्यास मंडळ) हे विचारव्यासपीठाचे संयोजक आहेत. आजचा सुधारक तसेच अन्य वैचारिक विषयांना वाहिलेल्या नियतकालिके. वर्तमानपत्र यात सामाजिक विषयावर सातत्याने लेखन करतात

In reply to by प्रकाश घाटपांडे

श्रमपरिहार हा अल्प आहे की उप आहे की साग्रसंगीत आहे ? श्रमपरिहार नेमका काय वेळेला सुरु होईल हे सांगता येईल का ? धन्यवाद.