तिच्या मनातून.....................
लेखनप्रकार
आज या अथांग उत्तुंग हिमालयाच्या पायथ्याशी येऊन पोचलेय...
त्याचे अस्तित्व अगदी एखाद्या गंभीर पण आश्वासक मुनींसारखे भासतंय ...
असे वाटतंय की कितीतरी काळापासून प्रवास करतेय, करतेय ....... ते शेवटी या इथे पोचण्यासाठीच.
आत्तापर्यंत सोबत असलेले सगळेच निघून गेलेत पुढे, कधीचेच.
पण मला भीती वाटत नाहीये, कसलीच नाही, कधीच वाटली नाही, ना माणसांची, ना संकटांची, ना परिस्थितीची, ना जगण्याची, ना मरणाची!
पण मला आता अजून पुढे मात्र जाता येत नाहीये.... खरें तर माझी तशी इच्छाही नाही.
मला खरोखरच कधी कसली इच्छा होती का?
मला तरी आता आठवत नाही.
होती ती फक्त आग, प्रचंड आग!
माझ्यासकट सगळे काही जाळणारी आग. जन्मापासून माझ्या सोबत असलेली सूडाची आग.
खरें तर मला कधी कळले नाही, त्या जगद्म्बेनी कशासाठी मला जन्माला घातले.
माझ्या भावाच्या जन्माला तरी काहीतरी निमित्त होते. त्याला एक काम करायचंच होते. माझ्या वडलांच्या मनातला धगधगता सूड पूर्ण करायचा होता.
पण मी कशासाठी आले? मी काय केले? मी काय मिळवले? मी कुणाला काय दिले?
या शेवटच्या क्षणांमध्ये मी या मूळ कारणांचा विचार करतेय, हे किती विचित्र आहे.
किती अलगद रहात होते मी लहानपणी..... पुढच्या सगळ्याच गोष्टी कल्पनातीत घडल्या...
इतकी वर्षे झाली, अजूनही तो प्रसंग आठवला की अंगावर काटा येतो, भीतीनी, आश्चर्यानी....
असा अपमान होऊ शकतो, असे कधी स्वप्नातही वाटले नव्हते मला.
ज्याबद्दल कृतज्ञता वाटावी, अशी प्रत्येक गोष्ट अचानक भोगवस्तू कधी ठरली, कळलेच नाही.
राज्यसत्ता ही उत्तरदायित्व ना ठरता उपभोग्य ठरली,
भूमाता आणी स्त्री आदरणीय ना ठरता उपभोग्य ठरल्या!
तो फक्त माझाच नाही, माझ्याच कुळातल्या अनेक मातांचा देखील अपमान होता.
सृजनशक्तीचा असा अपमान होऊ शकतो, असे खरेच कधी वाटले नव्हते....
'त्या' सोळाहजार जणींचे दु:ख एकाच वेळेस अंगावर कोसळले.
लहानपणापासून ऐकत आले होते, की आता कलियुग सुरु होणार आहे, घोर कली पसरणार आहे, अंध:कार येणार आहे,... हेच का ते कलीयुग?
खरोखरच तेंव्हा असे भासत होते, माझ्या सभोवताली काळाकभिन्न धुरासारखा कली मला कोंडून टाकत होता, आणि मी एकटीच धगधगत त्याला जाळू पहात होते.
त्या क्षणी मला स्वत:लादेखील माहित नव्हते, की या आगीत पुढे काय काय होरपळून निघणार आहे!
......................................................
पुढचे संपूर्ण आयुष्य जगले ते केवळ त्या एका करुणेच्या आधारावर.
माझ्याकडे पाहताना त्याच्या नजरेतून उतरलेले ते कारुण्य आणी त्यानंतर माझ्या जीवनातली सगळीच आसक्ती जाळून टाकणारे ते त्याच्या डोळ्यातले वैराग्य.
त्याच्या नजरेतूनच मला जाणावले, हे सगळे मला भोगावच लागणार होते,... दुसरा इलाजच नव्हता!
जणू काही तो सांगत होता, कणखर हो, अलिप्त हो!
बास्स.......इतकीच एक मौल्यवान गोष्ट आहे माझ्या उभ्या आयुष्यात.....
आज इथे हे शेवटचे श्वास मोजत शांतपणे मृत्यूची वाट बघतेय........ खरें तर हे विचारही नको वाटतायत...
खरें तर जगणे कधीच संपले होते, माझी मुले, माझा भाऊ काळानी ओढून नेले, त्याच क्षणी मीदेखील संपले.
ज्याच्या करुणेवर पुढची ओझी ढकलली, तो तर असा अचानक, ना सांगताच निघून गेला.
माझ्या संपूर्ण जगातलाच प्राणच संपला. आम्ही सगळेच हतबल झालो.
केवळ त्याचे एक हसू, एक नजर, एक शब्द, आम्हाला जगण्याची ताकद देत होते.
एरवी माझ्यावर सतत कसल्या ना कसल्या नात्यांचे ओझे होते, कन्या, बहीण , पत्नी,सून, आई, सम्राज्ञी,....संपतच नाहीत अपेक्षा कुठल्या नात्यांच्या.
फक्त त्याच्यासमोर असल्यावरच जाणवायचे, की मी मी आहे, एक अस्तित्व.
या अथांग विश्वासमोर जरी क्षूद्र भासले, तरीही, एक एकमेवाद्वितीय सुंदर अस्तित्व. जगदंबेची निर्मिती!
आता तो नाहीसा होणे ही कल्पना देखील इतकी सैरभैर करते मनाला.
त्याच्या आठवणीन्वरच आतापर्यंत तग धरला जीवानी.
त्यानंतर फक्त सावली वावरत होती माझी.... आता काही वेळात ती सावली देखील संपेल.
बास्स.. याचीच वाट पहात होते मी कितीतरी वर्षे.
आपलेच आयुष्य असे ओझे होऊ शकते हे मला कधी माहीतच नव्हते.
आज या इथे अचानक पायातले त्राण संपले, आणि मनानी सुटकेचा श्वास सोडला.
...आता मात्र नक्की संपतोय हा प्रवास.
आता फक्त आठवणीत तडफडणे संपेल....
हा यज्ञ संपेल, ही याज्ञसेनी संपेल, फक्त राख उरेल मागे.
मी मात्र मोकळी होईन....त्याच्याभोवती फेर धरायला.....
वाचने
20072
वाचनखूण
प्रतिक्रिया
67
बापरे .. घामाघुम करणारे
>>'त्या' सोळाहजार जणींचे दु:ख
मस्तच!!
माऊ
In reply to माऊ by पैसा
+१
मी आहे, एक अस्तित्व- सुंदर शब्दशिल्प.
In reply to मी आहे, एक अस्तित्व- सुंदर शब्दशिल्प. by शशिकांत ओक
>>विमानप्रवासात
भिती वाटली आधिच घरात बसुन ४
जबर्या !माझ्या भावाच्या
In reply to जबर्या !माझ्या भावाच्या by परिकथेतील राजकुमार
आपण जो काही वाचतो, तो
सुंदरच!
In reply to सुंदरच! by बिपिन कार्यकर्ते
+१
In reply to सुंदरच! by बिपिन कार्यकर्ते
एक्झॅक्टली!! बिपिनदा.. हेच
In reply to एक्झॅक्टली!! बिपिनदा.. हेच by प्राजु
@ बिपिनदा.. आपण कधी उपास
_/\_
सुरेखच आहे हे मुक्तक, कधी कधी
In reply to सुरेखच आहे हे मुक्तक, कधी कधी by ज्ञानोबाचे पैजार
थोडेशे अवांतर : उत्तर असे
In reply to थोडेशे अवांतर : उत्तर असे by गणेशा
पांडव समाधानी होते हे काही
In reply to पांडव समाधानी होते हे काही by ज्ञानोबाचे पैजार
पैजार बुवांचा जास्तच गोंधळ
In reply to सुरेखच आहे हे मुक्तक, कधी कधी by ज्ञानोबाचे पैजार
अवांतर .
मसत आवडले एकदम ..पण हे
खुप छान लिहिल
सुंदर... अप्रतिम...!!!!
छान !!
छानच लिहिलय.
पॅलेस ऑफ इलुजन !
लिमाउ, फार छान लिहिलंय,
वा! मस्त लिहीलंय!
__/\__ काय लिहु कळत नाही.. अ
"सलाम"
वा माऊ! छान लिहिलंय!
सह्हीच लिहिलयस माउ, >>>हा
मुक्तक आवडले माउ
'कृष्णा' वाचलीय मी. खुप आवडल
खूप छान
छानच
मुक्तक आवडले ....पणपुढचे
छान.
करुण आणि भव्य....आत्मकथानाची
छान !
भन्नाट..
हे वाचायचंच राहिलं...
लिमे कठीण आहे ग तुझं.. काय
खुप भनायक लिहिले आहे. पन राग
भनायक म्हणजे काय हे मलादेखिल
In reply to भनायक म्हणजे काय हे मलादेखिल by कवितानागेश
ohh sorry, मला भयानक असे
In reply to ohh sorry, मला भयानक असे by नरेशकुमार
अगदी मलाही...शेवटच्या दोन
ही कविता आहे हे मला देखिल
In reply to ही कविता आहे हे मला देखिल by कवितानागेश
सांगत होतो!
जडबुदुक लिहिलंय...झेपलं नाही
काहीच न कळल्यामुळे प्रतिसाद
छान लिहीले आहे.
माऊ, हे कसं कोण जाणे वाचायचं
मीपण फार दिवसांनी वाचतेय हे.
In reply to मीपण फार दिवसांनी वाचतेय हे. by कवितानागेश
नुसतचं
In reply to नुसतचं by मिसळलेला काव्यप्रेमी
ब्वॉर्र.
अरे! मी तर प्रतिसादपण दिलाय?
माऊ लयच भारी!!! नमस्कारिले
सुंदर !!
हे काय सुरेख लिहिले होतेस तू
मुक्त्तक छान लिहीले आहे.
आव्डले. पटलेच असे नाही. पण
In reply to आव्डले. पटलेच असे नाही. पण by मृत्युन्जय
+१
ज्याची सुरुवात तिने केली...
लिमाउलि _/\_
माउ
वामा असताना वाचले होते