मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कोण येथे गुरुवर्य ?

गणेशा · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
कोण येथे गुरुवर्य ? खितपत पडले शौर्य अहिंसेचे पुतळे मानतो मौनात दडले क्रौर्य झाकोळला स्पष्ट अंधार मुखवट्यात गळले धैर्य स्त्रीत्वाची ताकद जाणतो खुऱाड्यात लुटले कौमार्य घुंगूरपाण्यात डुबले नेत्र कळले कोणास सूरगांभिर्य दगडात ईश्वर जाणतो देवत्व शोधतो सूर्य भावनांचा गच्च बाजार मनात हरवले माधुर्य वैराग्यात निरपेक्षता मानतो अहंकारातून घडते कार्य ---- शब्दमेघ

वाचने 2975 वाचनखूण प्रतिक्रिया 9

प्रकाश१११ Wed, 03/23/2011 - 22:17
गणेशा -निव्वळ अप्रतिम झाकोळला स्पष्ट अंधार मुखवट्यात गळले धैर्य स्त्रीत्वाची ताकद जाणतो खुऱाड्यात लुटले कौमार्य हे खूपच छान ,नि मस्त सूर लागले

In reply to by प्रकाश१११

गणेशा गुरुवार, 03/24/2011 - 13:13
काका धन्यवाद .. रिप्लाय या कारणासाठी की खरे तर हे कडवे सर्वात शेवटी या कवितेत आले ... तसे मला पहिले कडवे बरे वाटत होते .. नंतर आपोआप सुचलेल्या या कडव्यामुळे मात्र कविता छान जमली असेच वाटले होते ..

ज्ञानराम गुरुवार, 03/24/2011 - 13:42
अप्रतिम जमली आहे कवीता... भावनांचा गच्च बाजार मनात हरवले माधुर्य वैराग्यात निरपेक्षता मानतो अहंकारातून घडते कार्य आवडले

कच्ची कैरी गुरुवार, 03/24/2011 - 15:43
गणेशा मी तुमच्या कवितेची फॅन झाले आहे प्रत्येक शब्दन शब्द कवितेच्या माळेत असा गुंफला आहे कि वाचतच र्रहावेसे वाटत आहे .मस्त :)