ए मालिक तेरे बंदे हम! (रौशनी - अवांतर..!)
राम राम मडळी,
आज रौशनी -५ हा भाग शैलेन्द्र यांनी प्रतिसाद देऊन वर आणला आणि मी पुन्हा एकदा रौशनीच्या आठवणीत गुंतलो. दिवस थोडासा अपसेटच गेला. मंडळी, रौशनीचं लेखन बरंच म्हणजे बरंच लांबलं आहे हे अगदी कबूल! तसं माझं लेखन सुरू आहे, पूर्णही होत आलं आहे आणि मी ते वेळोवेळी सेव्हही करून ठेवलं आहे. आता लेखन जेव्हा पूर्ण होईल तेव्हाच ते प्रसिद्ध करीन म्हणजे वाचकांची गैरसोय होणार नाही.
असो..
मंडळी, रौशनी हा माझ्या आयुष्यातील एक वेगळाच अनुभव. ही बया खूपच वेगळी होती. 'वेश्याबाजारातल्या इतर चार मावश्यांसारखी एक मावशी' एवढीच फक्त ओळख नव्हती तिची, नक्कीच नव्हती! तिच्यात आणि माझ्यात एक भावनिक नातं निर्माण झालं होतं. मी तिला नेहमीच खूप समजून घ्यायचा प्रयत्न केला. आणि मुंबईच्या त्या भयाण बाजारात हा एकटाच माणूस आपलं म्हणणं ऐकतो, समजून घेण्याचा प्रयत्न करतो याचं तिला नेहमी खूप समाधान वाटे आणि आमच्या ज्या काही मोजक्या भेटी घडल्या त्यात ती माझ्याशी अगदी भरभरून बोले.
रौशनी गाणं शिकलेली होती आणि अतिशय उत्तम गायची याचा उल्लेख मागील भागात आला आहेच. आज रौशनीची आठवण झाली आणि तिचे काही फोटो माझ्याकडे होते ते मी शोधून काढले!
एकदा बोलण्याच्या ओघात,
"तात्यासाब एकदा वेळ काढून अवश्य या, आपको मुजरा सुनाउंगी. तसं मी आता मुजर्यात गाणं केव्हाच सोडलं आहे पण तुमच्याकरता एकदा नक्की गाईन!"
असं रौशनी मला म्हणाली होती!
हो, ना करता करता एक रविवार ठरला. फोरासरोडच्या बनारसी चाळीत दिदीकडे (या दिदी प्रकरणाविषयी रौशनीच्या येत्या भागात विस्तृत लिहिणारच आहे,) रौशनी मुजर्याला बसणार होती. नेमका त्याच दिवशी आमच्या फ्यॅमिलीत कुणा एका अगदी जवळच्या नातेवाईकांत दादरला साखरपुडा होता त्यामुळे माझ्यापाशी कॅमेराही होता. साखरपुडा झाल्यावर, 'जरा हापिसचं अर्जंट काम आहे!' ही सबब सांगून मी तिकडून सटकलो आणि सिध्धा फोरासरोडच्या बनारसी चाळीत पोहोचलो. रौशनीचा मुजरा ऐकला, फोटू काढले.
अख्तरीबाईची काफी रागातली एक ठुमरी रौशनीने खरंच खूप छान रंगवली. अजूनही एकदोन ठुमर्या म्हटल्या आणि शेवटी लतादिदीचं 'ए मालिक तेरे बंदे हम' हे गाणं फारच सुरेख म्हटलंन! क्या बात है...
आज मुद्दामून वेळात वेळ काढून ते फोटू शोधले. माझ्याकडे स्कॅनर नाही त्यामुळे मोबाईलवरून पुन्हा मी त्या फोटूंचे फोटू काढले आणि ते आज इथे चढवत आहे. रौशनीचं पुढचं लेखन मी लवकरात लवकर पूर्ण करायचा प्रयत्न करीनच, तूर्तास मध्येच हा 'अवांतर' भाग आज अचानक प्रसिद्ध करत आहे.
बघा तरी आमची रौशनी तुम्हाला आवडते का ते! कदाचित हे फोटू पाहून आपल्याला रौशनीच्या सौंदर्याची कल्पना येणार नाही परंतु प्रत्यक्षात मात्र ती दिसायला अतिशय सुरेख, अन् खानदानी होती एवढंच मी सांगू शकेन! मनानंही तेवढीच सुंदर होती. दैवाच्या फेर्यात सापडली आणि तवायफबाजारात आणि वेश्याबाजारत पोहोचली!
अख्तरीबाईची ठुमरी सुरू आहे!
ए मालिक तेरे बंदे हम!
बडा कमजोर है आदमी,
अभी लाखो है इसमे कमी
पर तू जो खडा, है दयालू बडा,
तेरी किरपा से धरती थमी!
दिया तूने हमे जब जनम,
तूही झेलेगा हम सबके ग़म,
नेकी पर चले, और बदीसे टले,
ता की हसते हुए निकले दम!
ए मालिक तेरे बंदे हम!
हे गाणं ती खूप मन लावून गायली. वेदनेपोटी खूप चांगलं गाणं जन्माला येतं याचा पुन्हा एकदा अनुभव आला!
-- तात्या अभ्यंकर.
ए मालिक तेरे बंदे हम!
बडा कमजोर है आदमी,
अभी लाखो है इसमे कमी
पर तू जो खडा, है दयालू बडा,
तेरी किरपा से धरती थमी!
दिया तूने हमे जब जनम,
तूही झेलेगा हम सबके ग़म,
नेकी पर चले, और बदीसे टले,
ता की हसते हुए निकले दम!
ए मालिक तेरे बंदे हम!
हे गाणं ती खूप मन लावून गायली. वेदनेपोटी खूप चांगलं गाणं जन्माला येतं याचा पुन्हा एकदा अनुभव आला!
-- तात्या अभ्यंकर.
वाचने
36958
वाचनखूण
प्रतिक्रिया
62
वा तात्या
In reply to वा तात्या by वरदा
सहमत
In reply to सहमत by लिखाळ
सहमत
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
जोहार !
In reply to जोहार ! by मुक्तसुनीत
असेच वाटते
कमी पडलात तात्या
In reply to कमी पडलात तात्या by प्रियाली
प्रियाली,
In reply to प्रियाली, by विसोबा खेचर
जरब आणि करार
प्रियाली
सत्य
खरोखर किती
किती सुंदर
In reply to किती सुंदर by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
+१
उमराव जान
In reply to उमराव जान by मानस
विश्वास बसणार नाही..
In reply to विश्वास बसणार नाही.. by विसोबा खेचर
क्या बात है!!
In reply to क्या बात है!! by मानस
हिराबाई बडोदेकर...
In reply to हिराबाई बडोदेकर... by विसोबा खेचर
इर्षाद
In reply to इर्षाद by मानस
नक्की! :)
खुप छान लिहिलं आहे तात्या...
तात्या,
रौशनी
परवानगी...
In reply to परवानगी... by भडकमकर मास्तर
>>सार्वजनिक
In reply to परवानगी... by भडकमकर मास्तर
निश्चिंत रहा..
In reply to निश्चिंत रहा.. by विसोबा खेचर
ओके.. आपल्य
In reply to ओके.. आपल्य by भडकमकर मास्तर
नवल वाटले...
तात्यांच्या हातचा मळ
किती सुंदर
सुंदर!
सलाम
फोटो....
In reply to फोटो.... by मनिष
धन्यवाद,
वाइट वाटलं
रौशनी..
In reply to रौशनी.. by स्वाती दिनेश
सहमत
भयाण वास्तवाचं दर्शन घडवलंत तात्या..!
रौशनी..
In reply to रौशनी.. by काळा_पहाड
पहाडराव,
तात्या, रोश
जरब आणि करारीपणा
िव्कास०१५
तात्या,
In reply to तात्या, by चतुरंग
हेच म्हणतो..
In reply to हेच म्हणतो.. by केशवसुमार
हेच म्हणते..
समर्थ व्यक्तीमत्व
In reply to समर्थ व्यक्तीमत्व by विसुनाना
+++१
देखणं रूप ...
खानदानी देखणेपणा
कॅलिडोस्कोपिक ......
मादक.
हे फोटू
जुलालीची
In reply to जुलालीची by डॉ.प्रसाद दाढे
वा!
रौशन जमाले यार से है अंजुमन तमाम
जमाल-सौंदर्य, आतिश-आग चमन-बाग, उद्यान, उपवन किंवा इथे मिसळपाव.कॉम असाही अर्थ घेता येईल. अंजुमन-मैफल किंवा इथे मिसळपाव.कॉम असाही अर्थ घेता येईल. पैरहन-वस्त्र
In reply to रौशन जमाले यार से है अंजुमन तमाम by चित्तरंजन भट
क्या बात है..
खानदानी
तात्या
हेच म्हणतो.
आरस्पानी ....
अतिशय सुन्दर रुप आहे
शापीत सौंदर्य !! :-(