खाटिक
लेखनविषय:
खट खट खट
आवाज करत खाटिक
समोरचं गिर्हाईक पाहून
तोडून देत होता
आणि
मिळालेले पैसे
गल्ल्यात जमा करत होता.
त्याला पाहून मला "तो" आठवला.
फरक असलाच तर एवढाच ...
तो रंगवलेल्या स्वप्नांचे
तुकडे करत होता
आणि
आक्रंदित प्रार्थना ऐकत होता.
वाचने
4462
वाचनखूण
प्रतिक्रिया
25
लाईक इट.
नानाची कविता नानासारखीच गुढ आहे :(
काय कळेल काय ?
व्हेजिटेरियन णकु
छान ह्रुदयाला ड्रिलमशीन ची आठवण करुन देणारी कविता .
>>
त्याला पाहून मला "तो" आठवला.
फरक असलाच तर एवढाच ...
तो रंगवलेल्या स्वप्नांचे
तुकडे करत होता
आणि
आक्रंदित प्रार्थना ऐकत होता.
नाना अगदी माझ्या मनातलं बोललात ... तुलना आवडली ....
:(
In reply to आता 'तो' कोण हे पण सांगुन टाका by लवंगी
+१
'तो' म्हणजे देव गं..! आता देव म्हणजे देव आनंद का नको विचारु?? :)
नानुस.. कविता आवडली.
भीषण.
अवलिया - एकदम मस्त जमलीय कविता
पु.ले.शु.
मस्त रे नाना.
-दिलीप बिरुटे
फरक असलाच तर एवढाच ... तो रंगवलेल्या स्वप्नांचे तुकडे करत होता आणि आक्रंदित प्रार्थना ऐकत होता.कोणाची स्वप्ने? की त्याचीच? अन् प्रार्थना कोणाच्या?
...नाय पटत! :(
- खाटकाची लेक
In reply to ...नाय पटत! - खाटकाची लेक by कवितानागेश
सहमत आहे. कविता पटली नाही.
भारी!
झकास तुलना रे नानुड्या !!
अवांतर : देव करो आणि ही 'आपबिती' नसो ;)
काय पण विरोधाभास आहे ना अवलियाजी?
ज्यान तुकडे पाडले त्याचीच प्रार्थना करत रहातो आपण.
क्षणभर का असेना पण विश्वास उडला साहेब.
__/\__
आम्हाला साष्टांग नमना ची एक स्मायली तयार करुन मिळेल का?
In reply to काय पण विरोधाभास आहे ना by स्पंदना
__/\__ आम्हाला साष्टांग नमना ची एक स्मायली तयार करुन मिळेल का?या मागणीला आमचा पण दुजोरा.... विचार करावा.
In reply to काय पण विरोधाभास आहे ना by स्पंदना
>>ज्यान तुकडे पाडले त्याचीच प्रार्थना करत रहातो आपण.
ह्यावरूनच ती म्हण प्रचलित झाली असावी: कसायाला गाय धार्जिणी ...
हम्म्म्म्म्म
In reply to हम्म्म्म्म्म by परिकथेतील राजकुमार
हूं...
:)
हं...
लाईक इट.