एकविसाव्या शतकातली कहाणी
लेखनविषय:
एक आहे ही गोष्ट, आटपाट नगरीची
यामद्धे आहेत अर्थातच, एक राजा- एक राणी !
पूर्वी सारखं नव्हे बरं,एकच राजा आणि एकच राणी,
एकविसाव्या शतकांत असते,
प्रत्येकाची स्वतंत्र नगरी,स्वतंत्र कहाणी!
आपल्या गोष्टितल्या राजाला,राणी आवडली अगदी सहजच
आणि राणीनेही संमती दिली,थोड्या हित्गुजांताच !
दोघांची मग सुरु झाली स्वतंत्र कहाणी,
दोघांची नगरी,
हिच्या मनाचा "तो" राजा,
त्याच्या मनाची "ही" राणी,
उघड्या डोळ्यानी दोघांनी,संसाराची स्वप्नं रचली,
आई-बाबा वगैरे ठीक,पण बाळाची सुद्धा नावे ठरली !
प्रत्येक गोष्ट दोघांच्या मताप्रमाने,मनासारखी घडत होती,
राजा-राणी आणि त्यांची दुनिया एकमेकाताच गुरफतात होती !
राजाच्या घरी दोघांच्या नात्याची कुणकुण लागली,
आणि स्वप्नात सुद्धा विचार न केलेली वेळ आली !
घर की राणी? राजाच्या निर्णयाचा क्षण आला,
दोन प्रेमांच्या वेड्या चक्रात राजा बिचारा अड़कुन पडला!
२ वर्षांच प्रेम की २० वर्षांच नातं?
जन्मभराची साथ की कर्त्तव्य महत्तावाच?
नाजुक हळवे मन, की मेंदुतल्या विचारांचा पसरा?
"काय निवडू?" वेडा विचारे स्वताला...
ताजं कोवळ पान झाडा पासून गळाल,
आणि राजा-राणीच स्वप्न ही धुळीला मिळाल !
तिच्या नाजुक हातातून, हात सोडवत नाही
मग त्याने हातच कापून ठेवला,
आणि मनातून तिचा विचार जात नाही
म्हणून मनाचा कप्पा अलगद बंद केला!
राणीला हा निर्णय सांगताना ,
अदृश्य रक्ताच्या चिळ्कान्द्या उडाल्या ,
तिला सावरताना मात्र ,
त्याच्या प्रेमाचाच पूर्ण कस लागला!
वातावरण निवळल, दोघही सावरली !
मग दोघांनी समंजसपणे,
वेगवेगळी नगरी स्वीकारली !
एकमेकांच्या आठवणीना जपत,
तो बनला "त्याच्या" विश्वाचा राजा,
ती बनली "तिच्या" नगरिची राणी,
एकविसाव्या शतकातली,
स्वतंत्र नगरी,
स्वतंत्र कहाणी !!!
वाचन
3352
वाचनखूण
प्रतिक्रिया
14
......
In reply to ...... by आत्मशून्य
......
ही तर पुरातन काळापासूनची
In reply to ही तर पुरातन काळापासूनची by अवलिया
तेच म्हणावयाचे होते. पण
In reply to ही तर पुरातन काळापासूनची by अवलिया
राजा-राजा किंवा राणी-राणी अशी
In reply to राजा-राजा किंवा राणी-राणी अशी by परिकथेतील राजकुमार
>>>'लोक प्रेम वगैरे सारखे
In reply to राजा-राजा किंवा राणी-राणी अशी by परिकथेतील राजकुमार
माझीच आहे
घर की राणी? राजाच्या
In reply to घर की राणी? राजाच्या by नरेशकुमार
घर की राणी?
तेरे ख्वाबो मै अब दम घुटता
कविता छान .. कवितेमागील व्यथा
विस वयात कशाला हवित नसती
In reply to विस वयात कशाला हवित नसती by गुड्डु
प्रतिसाद
कविता पोचली !