सोयाबीन मंचुरीयन (Soyabean manchurian)
साहित्यः
सोया चंक्स - १ कप
अंडे - १
कांदा - १/२ कप बारीक चिरुन
कोबी - १/४ कप बारीक चिरुन
ढोबळी मिरची - १/४ कप बारीक चिरुन
कांद्याची पात - १/४ कप बारीक चिरुन
लसुण - १ मोठा चमचा बारीक चिरुन
आले - १ मोठा चमचा बारीक चिरुन
हिरवी मिरची - १ मोठा चमचा बारीक चिरुन
काळी मिरी पावडर - १ मोठा चमचा
सोया सॉस - १ मोठा चमचा
व्हिनेगर - १ मोठा चमचा
रेड चिली सॉस - १ मोठा चमचा
कॉर्नफ्लोअर - २ मोठे चमचे
साखर - १/२ चमचा
तेल - १/२ कप
मिठ चवीनुसार
कॄती:
१. पातेल्यामधे ३ कप पाणी उकळावे. त्यात सोयाबीन टाकुन २ मिनिटे उकळावे. हे सोया चंक्स गाळुन त्यातले पाणी पिळुन काढावे.
२. ह्या चंक्स मधे १ चमचा कॉर्नफ्लोअर, १ अंडे, १/२ चमचा आले, लसुण, काळी मिरी पावडर, सोया सॉस, व्हिनेगर, रेड चिली सॉस व मिठ टाकुन मिक्स करावे.
३. कढईत ३ चमचे तेल गरम करावे. त्यात हे चंक्स टाकुन high flame वर ३ मिनिटे परतावेत व दुसर्या भांड्यात काढावेत.
४. कढईत २ चमचे तेल टाकुन गरम करावे. त्यात आले, लसुण व हिरवी मिरची टाकुन परतावे. त्यात बारीक चिरलेला कांदा, कोबी, ढोबळी मिरची टाकुन परतावे.
५. हे सर्व २ मिनिटे high flame वर परतल्यावर त्यात सोया सॉस, व्हिनेगर, रेड चिली सॉस टाकावा. हे परतल्यावर त्यात सोया चंक्स टा़कुन मिक्स करावे. त्यात कांद्याची पात, साखर व चवीप्रमाणे मिठ टाकुन मिक्स करावे.
६. तयार झालेले सोयाबीन मंचुरीयन प्लेट मधे घेउन, वरती बारील चिरलेली कांद्याची पात टाकुन गरम serve करावे.
वाचने
14568
वाचनखूण
प्रतिक्रिया
12
मृणालताई, यातील अंडे वगळून
In reply to मृणालताई, यातील अंडे वगळून by पिंगू
thank you अंड्याच्या जागी
In reply to thank you अंड्याच्या जागी by Mrunalini
तुमचे णाव आज पासुन
इटिंग सोयाबीन चंक्स इज नॉट मच
In reply to इटिंग सोयाबीन चंक्स इज नॉट मच by विंजिनेर
मृणालिनीताईंना
In reply to इटिंग सोयाबीन चंक्स इज नॉट मच by विंजिनेर
हो.. तसे आपण ह्या जागी सोयाचे
मस्त :)
परत एकदा पिंगूशी सहमत... बाकी
In reply to परत एकदा पिंगूशी सहमत... बाकी by मदनबाण
हो, मला पण सोयाबीन आवडत. मला
अरे हा काय छळ मांडला आहे,
In reply to अरे हा काय छळ मांडला आहे, by ५० फक्त
हा हा हा... नाही हो... इथे
लय भारी..