लढत ! दोन पिढ्यांची.
विशेष



वाचने
12493
वाचनखूण
प्रतिक्रिया
30
जय हो! आपल्याला कोणी मदत करील म्हणून हे लोक वाट बघत बसले नाहीत, की रडत बसले नाहीत. गाव स्वावलंबी केल्यामुळे ते कर्नाटक सरकारकडे पूर्ण दुर्लक्ष करतायत हे महत्त्वाचं.
अपर्णा, इतकी छान ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद!
In reply to हे खरे मराठीचे वारकरी! by पैसा
आपल्याला कोणी मदत करील म्हणून हे लोक वाट बघत बसले नाहीत, की रडत बसले नाहीत.
असेच म्हणतो. सदैव त्रात्याची वाट पाहत कर्माला दोष देणारी बहुसंख्या असलेल्या समाजात असे गाव म्हणजे वाळवंटातील ओअॅसिसच. सर्व येळ्ळूर निवासींना त्यांच्या लढ्यात यश येवो ही शुभेच्छा.
In reply to +१ by रमताराम
(सहमत)बेसनलाडू
In reply to हेच म्हणतो by बेसनलाडू
अगदी हेच म्हणतो.
In reply to हे खरे मराठीचे वारकरी! by पैसा
एकुण ११००० लोकसंख्येच्या या गावात सर्व रस्त्यांचे डांबरीकरण झालेले आहे. जलनिर्माण योजने मुळे घरोघरी पाण्याची सुविधा आहे. प्रत्येक घराचे वेगळे शौचालय असल्याने उघड्यावर जाण्याची गरज भासत नाही, अन गाव मुळता:च स्वच्छता प्रिय असा आहे. बेळगाव बस स्थानका पासुन उत्तम बस सेवा असल्याने वाह्तुकी साठी ही गैरसोय जाणवत नाही.कुठे कर्नाटक सरकारकडे दुर्लक्ष आहे? यातली कुठली गोष्ट सरकारी नाही? उलट हा विचार मनात येतो कि गेली ५० वर्षे इतकी आक्रमक भुमिका असतानाही कर्नाटक सरकारने रस्ते, पाणी, शौचालये, बस सेवा सगळ्या उत्तम सुविधा दिल्या आहेत या गावाला ? यात कुठे आहे स्वावलंबन? यळ्ळूरकरांचं कौतुक आहेच पण दोन्ही बाजूंचा विचार व्हावा असं वाटतं..
In reply to कर्नाटक सरकार by मैत्र
नौ द्याट ऐ थिंक अबौटिट, तुम्चं म्हण्णं पट्तंय्.
सर्वप्रथम सार्या येळ्ळुरकरांना मानाचा मुजरा!
इतक्या प्रतिकुल परिस्थितीतही झुंज देऊन गर्दन खडी ठेवण्याची ही जिद्द नुसत्या कौतुकालाच नाही, तर आदरालाही पात्र आहे.
सीमाप्रश्नाचं बहुचर्चित गाव बेळगाव, त्यापासून केवळ आठ कि.मी.वर असलेल्या गावाच्या वेशीलाच 'महाराष्ट्र राज्य, येळ्ळूर' असा ठसठशीत फलक चढवून स्वतःच्या अस्तित्वाची कडक जाणिव करुन देणं ही काही खायची गोष्ट नाही. अशा पवित्र्यानंतर येणार्या अडचणींना हिमतीनं सामोरं जाणं...स्वतःचं मराठीपण टिकवणं ह्या एकमेव जिद्दीसाठी...किती कौतुकाची गोष्ट आहे!
मला तर हे सगळं मूठभर मावळ्यांनी जीवाचा कोट करुन गनिमाशी गड भांडता ठेवण्याचीच आठवण करुन देतं.
आपण पाहतो, साध्यासुध्या गोष्टीतही ग्रामपंचायत, जिल्हा परिषद इ.इ.ठिकाणी कशी राजकीय गणितं चालतात. इथंतर एका ग्रामपंचायत असलेल्या गावानं आख्ख्या राज्याशी वाकडं घेतलं! स्थानिक स्वराज्य संस्था आणि त्यांच्या कामातल्या गोमा ह्या ज्यांना ठाऊक आहेत, त्यांना ह्या गोष्टीचं गांभिर्य पटेल.
प्रचारकी थाटाची मराठीची कणव आणि उमाळे येणार्या संमेलनी, राजकीय आणि अगदी जालीय मराठी भाषिकांना सांगावसं वाटतंय, लेको, ज्जा! मराठीपण म्हणजे काय ते एकदा शिकून या येळ्ळूरात जाऊन!
पुन्हा एकदा येळ्ळूरकरांना मानाचा मुजरा!!!
अपर्णा,
खूप छान काम केलंस.
तुझ्या सासूबाईंना, श्री.उदय जाधव, श्री. प्रभाकर पाटील ह्यांना माझे मनापासून आभार कळव. अशा स्वाभिमानी भावांची ओळख झाली ह्याचा आनंद वाटला.
धन्यवाद!
आणि हो, ते माझे आभार वगैरे कसले म्हणे? येळ्ळूरबद्दल सुचवलं ते आपल्या श्रावण मोडकांनी. खरे आभार त्यांचे. ज्यांच्यामुळं ह्याबाबत माहिती मिळाली.
In reply to गर्जा जयजयकार.... by धमाल मुलगा
बर परत एकदा, रा. रा. श्रावण मोडक यांचे धन्यवाद.
बाकि वारकर्याचे पाय पकडले तरी पंढरीला जाउन आल्याच भाग्य लाभत म्हंटल धमु!
काय लेखणी उसळली तुझी हा प्रतिसाद देताना! जणु म्यानातुन तरवार! एक अन एक शब्द आवडला भाउ!
In reply to बर परत एकदा, रा. रा. श्रावण by स्पंदना
सलाम!!!!
In reply to गर्जा जयजयकार.... by धमाल मुलगा
प्रचारकी थाटाची मराठीची कणव आणि उमाळे येणार्या संमेलनी, राजकीय आणि अगदी जालीय मराठी भाषिकांना सांगावसं वाटतंय, लेको, ज्जा! मराठीपण म्हणजे काय ते एकदा शिकून या येळ्ळूरात जाऊन!
एकदम भिडलं हे वाक्य. कोणत्याही सोम्या नि गोम्या साहेबांची गरजच नाही.
इतक्या प्रतिकुल परिस्थितीतही झुंज देऊन गर्दन खडी ठेवण्याची ही जिद्द नुसत्या कौतुकालाच नाही, तर आदरालाही पात्र आहे.
+१००
येळ्ळूरचा जयजयकार.
येळ्ळूरकरांना तमाम मराठी बांधवांचा मानाचा मुजरा.
येळ्ळूरकरांनो तुम्ही एकटे नाही आहात. महाराष्ट्रातले मराठी बांधव तुमच्या पाठिशी आहेत.
जय महाराष्ट्र!
मी सध्या बंगळुरात राहतोय पुढच्या वेळी कोल्हापूर ला येताना बेळगावात उतरून येळ्ळूर ची फेरी नक्की .....................
बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, या घोषणेची आठवण करून दिलीस.
यळ्ळूर आणि त्या व त्या परिसरातील इतर काही गावांचा साराबंदीतील त्याग असाच थोर आहे (ही साराबंदी महाराष्ट्रातच आम्हाला जायचं आहे, यासाठी झाली होती).
In reply to वा... by श्रावण मोडक
बेळगाव, कारवार, निपाणी, ग्वाल्हेर, इंदूर, लंडन, न्यू जर्सी, कॅलिफोर्निया, मस्कत सहीत संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे!!
आश्वस्थमाची भळभळती जखम आजही वाहते आहे !
येळ्ळुरकरांना मानाचा मुजरा!
जय महाराष्ट्र !!
पैसा, ररा, प्री-मो, पाभे, जयदीप आणी शँपेन प्रतिसादाबद्दल आभार. तुमचे हे शब्द त्यांच्या पर्यंत नक्की पोहोचतील अन त्यांचे बळ वाढेल.
येळ्ळुरकरांचा झुंजारपणा पाहून ऊर भरून आले. त्यांचा लढा यशस्वी होवो हीच सदिच्छा!
In reply to येळ्ळुरकरांचा झुंजारपणा पाहून by नगरीनिरंजन
असेच म्हणतो !!
In reply to येळ्ळुरकरांचा झुंजारपणा पाहून by नगरीनिरंजन
येळ्ळुरकरांचा झुंजारपणा पाहून ऊर भरून आले. त्यांचा लढा यशस्वी होवो हीच सदिच्छा!
लेख आवडला.
-दिलीप बिरुटे
वा... उत्तम माहिती, उत्तम लेख !!!
लेख लिहणारीचे आणि त्यास सहाय्य करणार्यांचे मानावे तेव्हढे आभार कमीच आहेत...
"....अशी २६५ खेडी महाराष्ट्रात जाण्यासाठी आसुसलेली आहेत. ...."
~ हे विदारक सत्य आहे सीमाभागातील 'मराठी' जनतेचे. बेळगांव जिल्हाच नव्हे तर अगदी थेट धारवाड आणि हुबळी या दोन जोड जिल्ह्यातीलही अनेक खेडी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्याकडे आशेने पाहात आहेत. माझा जन्म धारवाड शहरातीलच असल्याने तेथील 'मराठा कॉलनी'...(अन् तिही अगदी एस.टी.स्टॅण्ड परिसरासारख्या गजबजलेल्या ठिकाणी आहे) किती सडेतोड वृत्तीने "महाराष्ट्र धर्म वाढवावा" हे सूत्र सांभाळत आहे याची माहिती आहे. पण दुर्दैवाने केन्द्र सरकारकडे एकीकरण समितीचा आवाज ना कधी गेला ना कधी जाईल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
~ अशा बिकट स्थितीतही 'येळ्ळूर' वासीयांचा लढा तर आदर्शवत वाटतो (विशेषतः गावजत्रेबाबत त्यानी पाळलेली प्रथा). सरकारी निर्णयाच्याविरूद्ध जाऊन धाडसाने 'महाराष्ट्र राज्य' असा जाहीर बोर्ड लावणे या कृतीबद्दल त्या मंडळीना सलाम !
इन्द्रा
अतिशय जबरी माहिती.. मला हे माहितीच नव्हते ..
आजच लेख वाचनात आला ..
खुप छान वाटले ..
लवकर काहि तरी अशय गावांचे कल्यान झाले पाहिजे ..
पुन्हा ही मायमराठी गावे महाराष्ट्रात आली पाहिजेत ..
जय महाराष्ट्र
सलाम या मराठीच्या सैनिकांना! :)
एक अत्यंत सरस /सकस लेख आहे हा .
भटांची कविता आठवली .
हा लेख खर तर वृत्तपत्रात यायला हवा .
येळ्ळुरकरांचा झुंजारपणा पाहून ऊर भरून आले. त्यांचा लढा यशस्वी होवो हीच सदिच्छा!
लेख वाचनिय
भारी लेख... येळ्ळूर वासीयांना सलाम
मराठी नाणं हे अस्सल आहे, खणखणीत आहे. येळ्ळूरकरांचा लढा बघून अगदी मनापासून वाटलं लवून त्रिवार मुजरा करावा.
एक दिवस बेळगाव, कारवार, निपाणी, भालकी, बिदरसह संयुक्त महाराष्ट्र होणारच...
अपर्णा, धम्या, श्रामो व अपर्णांच्या सासूबाईंसह श्री. उदय जाधवसाहेब व श्री. प्रभाकर पाटीलसाहेब यांना सलाम व आभार.
(बिनकण्याच्या आंतरजालीय मराठी समुदायातील) एक कट्टर मराठीप्रेमी
आयला हे यळ्ळूर प्रकरण माहितीच नव्हतं!!!! मानलं बघा यळ्ळूरकरांना. हे खरे मराठीचे धारकरी!
साष्टांग दंडवत _/\_
विशेषतः तो महाराष्ट्र राज्य वाला फलक म्हणजे तुफान दबंगगिरीचे उदाहरण आहे :)
लेख आवडला. त्यानंतर अधोरेखित करायची एक गोष्ट तूच सांगितली आहेस, ती म्हणजे सर्व गोष्टींच योग्य नियोजन केल्यानच ....... छानच.
मायला तेज्या !!
प्रेषक, aparna akshay, Mon, 28/02/2011 - 20:21
हा लेख लिहीलास तेव्हा तिथच होतो की काय ??
पिण्याच्या पाण्याची टाकी बसविली की नाही अजुन ???
हे खरे मराठीचे वारकरी!