पालक आणि कोबी पराठा
साहित्यः
कोबी - दिड कप (किसुन)
पालक - १ कप (बारीक चिरुन)
बेसन पीठ - ३ चमचे
गव्हाचे पीठ - १ कप
ओवा - १/२ चमचा
आले लसुण पेस्ट - १/२ चमचा
लाल तिखट - १ चमचा
हळद - १/२ चमचा
तेल - २-३ चमचे
मिठ चवीनुसार
बटर किंवा तुप - भाजण्यासाठी
कॄती:
१. एका बाउल मधे किसलेला कोबी, बारीक चिरलेला पालक घ्यावा. त्यात ओवा, आले लसुण पेस्ट, लाल तिखट, हळद, बेसन पीठ, तेल व मिठ टाकुन मिक्स करावे. हे बाउल १० मिनिटे झाकुन ठेवावे.
२. १० मिनिटां नंतर कोबी व पालकला मिठा मुळे पाणी सुटलेले असेल. ह्या मधे बसेल एवढे गव्हाचे पीठ टाकुन, घट्ट गोळा मळुन घ्यावा.
३. मळलेल्या कणके मधुन एक गोळा घेवुन पराठ्याच्या जाडीचा लाटुन घ्यावा. हा पराठा तव्यावर चांगला भाजुन घ्यावा. भाजताना वरतुन बटर किंवा तुप लावावे.
४. हे पराठे लोणचे, छुंदा किंवा दह्या सोबत गरम serve करावे.
टिपः
१. मी खाली दिलेल्या फोटो मधे purple cabbage वापरला आहे, पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार त्या जागी साधा कोबी किंवा फ्लॉवर वापरु शकता.
वाचने
9510
वाचनखूण
प्रतिक्रिया
9
तुमच्या सर्व रेसीपी छान असतात...
फोटो बघितल्यावर भुक चाळवते....
छान दिसतोय पराठा...करुन बघते.
स्लोव्हाकियात तु ओवा कसा मागत असशील दुकानदाराला याचा विचार करतोय.
'हे पराठे लोणचे, छुंदा किंवा दह्या सोबत गरम serve करावे' - बाकी सर्व जमेल पण हे जमेल की नाही शंका आहे, याच्या ऐवजी ' कट्ट्यावरच बसुन हादडावे' असा बदल माझ्यासाठि करुन घेत आहे.
असो, बाकी इतर सर्व उत्तम नेहमीप्रमाणेच , पण पराठ्याच्या फोटोत पर्पल कॅबेज कसा अॅड करायचा हे कळाले नाही.
In reply to स्लोव्हाकियात तु ओवा कसा मागत by ५० फक्त
:) आभारी आहे.
मला इथे ओवा नाहिच मिळत. मी भारतातुन घेउन आले होते.
अरे वा छान दिसताहेत पराठे !!!
सहि दिसत आहेत पराठे
आपल्या सर्वच पाकक्रियेमध्ये कल्पकता आणि रुची दिसुन येते.
थालीपीठाची आठवण झाली . छान.
जबरा !!
मस्त!!