आपल्या आईवडिलांना क्षमा करा !
आपल्या आईवडिलांना क्षमा करा !
चिगोंची मार्गाथा व वपाडाव यांची व्यथा , त्यांच्या कथा ह्रुदयद्रावक आहेतच पण आईवडिलांची बाजू पण समजून घेतली पाहीजे.
सर्वसाधारणपणे असे दिसते की थोरली मुले जास्त मार खातात. मी पण थोरला, व बापाचा मजबुत मार खाल्लेला. त्यामानाने धाकटी पोरे फारशी शिक्षेला सामोरी जाता दिसत नाही. मला वाटायचे की धाकटे लाडके व आम्ही दोडके. पण स्वतः बाप झाल्यावर अपत्यसंगोपनाची पारंपारीक सत्ये व त्यांची पॉवर लक्षात आली. आमच्या तीर्थरुपांचे एक लाडके तत्त्व होते. इंजीन रुळावर नीट असले की बाकीचे डबे पण नीट येतात. त्यामुळे रुळावर नीट रहाण्यासाठीच्या सर्व यातना आमच्याच वाटेस आल्या, पण त्यामुळे धाकट्या दोघांना माराची वेळ क्वचितच आली. वडिलांनी नुसता आवाज लावला की चिडीचुप, ही वेळ येण्यासाठी मला बलीदान द्यावे लागले.
शिवाय थोरल्या पोराच्या बाबतीत एक महत्वाचा फॅक्टर म्हणजे अननुभव. पोरगे नवीन असते तसेच आईबाप पण नवीनच असतात. किंबहुना ते आईबाप, आईबाप म्हणून त्या मुलाच्याच वयाचे असतात व हे सर्वजण चुकतमाकत, एकमेकांना सहन करीत मोठे होत असतात. साधारणपणे सरासरी २५ व्या वर्षी लग्न होते, आणि पूर्वपरिचय असो वा नसो, नवराबायको म्हणून एकमेकांना समजून घेईपर्यंत बाळराजे यायचे म्हणतात. त्यात विभक्त कुटुंब आणि दोघेही नोकरी करणारे असतील तर प्रॉब्लेम्स विचारूच नका. दुसर्याच्या वेळेस अडचणी त्याच असल्या तरी अनुभवामुळे आता एवढी चिडचिड होत नाही. बरं अशा अननुभवी आईबापांना पोरांनी तरी सांभाळून घ्यावे की नाही? पण ती आपापल्या परीने प्रॉब्लेम वाढण्यास मदतच करतात. साधारण पालथे पडण्यापर्यंतचे तीनेक महीनेच जरा सु़खाचे असतील. एकदा डोके उचलून जगाकडे यांनी पाहीले की यांचे खोड्यांचे प्लॅनींग सुरु होते व रांगता येवू लागले की एक्झीक्युशन. कुकरमध्ये डोकेच अडकव (मी फोटो काढून ठेवला आहे), अंगावर काहीही सांडून घे, गरम वस्तूच ओढून घे इथपासून ते थोडे मोठे झाल्यावर नाकात शेंगदाणा अथवा पेन्सील घाल इत्यादी. नाकात एकदा तरी काहीतरी घालणे हा तर जवळ जवळ प्रत्येक पोराचा हातखंडा खेळ असतोच. आणि वर अगणित हट्ट. प्रत्येक दिवस अॅक्शनपॅक्ड. त्यात आजारपणांची वेगळीच तर्हा. यांना काय दुखते ते सांगता येत नाही, नव्या आईबापांना कळत नाही. (तरीही मुलांच्याप्रती यांची सेन्सेटीव्हीटी जबरदस्त. थोरला लहान असताना कॉटवरुन पडला तर तो ढिम्म, पण बायकोच रडली. कालांतराने धाकटा जिन्यावरुन गडगडला, मला वाटले आता ही पुढचे आठ दिवस रडणार, तर ती शांतपणे त्याला उचलून घेवून आली. अनुभव दुसरे काय?)
साधारणपणे शालेय कालखंडात ही पोरे तर कहर करतात (दोन स्वानुभव -स्वत:चा व पोरांचा). आईबापांना शेंड्या लावून छोट्या मोठ्या खोड्या करणे, न ऐकणे यांचा अतिरेक झाला की मार्गाथेत एका व्यथेची भर पडते. त्यात पहील्या पोराच्या वेळी तर आईबाप तरुणच असतात, अंगात अजून रग असते. त्यामुळे जस्ट टॅप केले तरी पोरगं चुकून पडू शकते. (टार्या, लक्षात घे रे बाबा.) डोक्याला खोक पाडणे हा उद्देश नसतो तर तो एक अपघात असतो. जर पुन्हा पुन्हा खोक पाडण्याचा इतिहास नसेल तर त्याचे कडे अपघात म्हणूनच पाहीले जावे, लगेच आईबापांना आरोपीच्या पिंजर्यात उभे करू नये असे वाटते.
बालमानसशास्त्र काहीही म्हणो, मुलांना फार समजावून सांगणे हे मुलांना पालकांच्या दुर्बलतेचे लक्षण वाटते व त्याचा फायदा मुले फार चटकन उठवतात. त्यातून जर पन्नास पन्नास वयाच्या माणसांना पण समजावून सांगितलेले कळ्त नाही व आडमुठेपणा करतात तर अननुभवी लहान मुले कशी समजून घेणार? त्यामुळे ढूंगणावर वेळीच दिलेले दोन सणसणीत रट्टे हे इफेक्टीव्ह स्टॉपर म्हणून काम करतात व आईबापांचे आणि मुलांचे श्रम वाचवितात. जर मागण्या योग्य असतील तर मुलांना फार हट्ट न करता त्यांची पुर्तता होते व अवाजवी मागण्या मान्य केल्या जात नाहीत हे ठामपणे कळायला हवेच. जर आईबापांकडून लाड करून घेताना तक्रार नसेल तर शिस्तीसाठी दिलेले दोन दणके पण घ्यायलाच हवेत. विपश्यनेत गुरुजी सांगतात - वेळी दोन फटके देण्यात गैर काही नाही. मारा, पण कुंभारा सारखे. घटाला आकार यावा म्हणून कुंभार थापटण्याने मारतो, पण एक हात आतून ठेवतो. हा प्रेमाचा एक हात आतून असेल तर आकार देण्यासाठी अवश्य मारा.
माझ्या लहानपणी वडीलांनी मला चांगले बुकलले. (आणि माझ्या वडीलांनी मला मारले किंवा काहीही इतर कारणांमुळे सुद्धा मी माझ्या बायकोला अजून पर्यंत तरी मारलेले नाही. किंबहुना गेल्या चोवीस वर्षात साधी चापट बायकोला मारली नाही म्हणजे माझे बायकोवर खरे प्रेमच नाही, असे आमच्याकडे शेतीकामाला येणार्या बायका (आपापल्या नवर्यांचा मनसोक्त मार खावून) माझ्या बायकोला सांगतात.) (टीप : हा विनोदाचा क्षीण प्रयत्न आहे. लगेच पाशवी शक्तींनी हल्लाबोल करु नये)
तेव्हा बाप राक्षस वाटायचा. त्यावेळी त्यांचा आतुन असलेला प्रेमाचा हात समजून घेण्याचे वय नव्हते पण आज समजते आहे. माझ्या वडीलांची तत्त्वे मला योग्य वाटली म्हणून माझ्या मुलांच्या वेळी मीही ती वापरली आणि प्रसंगी दोन सणसणीत रट्टे देताना अजिबात हयगय केली नाही. हे सांगताना कोणताही गर्व अथवा अपराधी भावना नाही तर फक्त त्यावेळी बाप म्हणून जे कर्तव्य वाटले ते केले एवढीच भावना आहे. हे करताना कधी अपघात घडले असतील मात्र आतून हात प्रेमाचा होता हे नक्की. त्यामुळे जरी मला माझ्या वडिलांचा त्यावेळी संताप आला असला तरी आज मी त्यांच्या भूमिकेत गेल्यावर त्यांनी केले ते योग्यच केले असे वाटते आहे. आज ते नाहीत, नाहीतर त्यांना सांगायला मला आनंद झाला असता की, माझ्या बर्याच प्रमादांना तुम्ही क्षमा केलीत, तशीच आज मीही तुम्हाला क्षमा करुन तुमच्यावरचा राग विसरुन जात आहे. कदाचित माझी मुलेही मी त्यांना दु़खावलेले विसरुन जातील व मला क्षमा करतील हि आशा. नाहीतरी मोठ्यांना क्षमा करायची संधी आपल्याला नेहमीच मिळत नसते.
वाचने
10702
वाचनखूण
प्रतिक्रिया
43
शेवटचे ४ वाक्य भिडले हो !!!
लेख आवडला. धाकटा असुन लहान
जबरी लेखण !! आवडलेच नाही तर
लेख उत्तम जमलाय!
चांगलं लिहिलं आहे. मारा, पण
सहमत
ह्म्म बरोबर आई-वडील दुश्मन
In reply to ह्म्म बरोबर आई-वडील दुश्मन by मुलूखावेगळी
पाठीशी उभे राहील्याबद्दल
तुमच्या विचारांशी
In reply to तुमच्या विचारांशी by विजुभाऊ
अश्या कोणत्या ठीकाणी राहत
In reply to अश्या कोणत्या ठीकाणी राहत by वपाडाव
का नेहमीच असं अपवादात्मक
क्या बात..क्या बात..
पंख्याचे उदाहरण उगीच निव्वळ
In reply to पंख्याचे उदाहरण उगीच निव्वळ by गवि
तिचा अक्ष काही वजन पेलण्यासाठी सक्षम नसतात
In reply to तिचा अक्ष काही वजन पेलण्यासाठी सक्षम नसतात by नेत्रेश
yes.
चिगोंची मार्गाथा व वपाडाव
In reply to चिगोंची मार्गाथा व वपाडाव by वपाडाव
हेच तर ना भौ...
In reply to हेच तर ना भौ... by चिगो
आणखी एक...
In reply to चिगोंची मार्गाथा व वपाडाव by वपाडाव
+२
सुन्दर लेख. पटलच एकदम! लेखाचा
लेख आवड्ला
सातबारा तुम्ही मनातली गोष्ट लिहीलीत
पोरगे नवीन असते तसेच आईबाप पण
लेख नि प्रतिसाद लै टेरिफीक.
आवडले !
लेखन आवडले.
रसल पीटर चा 'सम्म्बडी गोन्ना
लेख आवडला. पण मोठी मुले जास्त
आभार
वळण लावण्यासाठी मारायची वेळ
In reply to वळण लावण्यासाठी मारायची वेळ by पक्या
वळण लावण्यासाठी मारायची वेळ
छानच लेख आहे.
वळण लावणे,चुकीच्या सवयींपासून
पुन्हा पुन्हा वाचावा असा लेख
लेख मस्त झालाय . आई वडील हे
मस्त लेख..
लेख आवडला.
मस्त लेख
साला विलासरावांचा लेख वाचुन
" बारकी असली तरी बेरकी असतात"
आम्हाला मारण्याचा अधिकार
In reply to आम्हाला मारण्याचा अधिकार by अर्धवट
बॉक्सिंग किट
लेख खुपच आवडला. पण, आपल्या