रंगिबिरंगी पनिर बुरजी.
लागणारे साहित्य:
पनिर
लाल, पिवळी आणि हिरवी भोपळी मिरची (चिरुन)
२-३ हिरव्या मिरच्या चिरुन
१ ते २ मध्यम कांदे चिरुन
मटार अर्धा वाटी
कोथिंबीर थोडी चिरुन
मिठ
१ टोमॅटो किंवा १ चमचा लिंबाचा रस.
तेल
थोडा गरम मसाला
ह्या रंग खुलवण्यासाठी वापरलेल्या रंगित सिमला मिरच्या
हे काही लागणारे वरील जिन्नस
क्रमवार पाककृती:
पनिर सुट्टा करुन बारीक करुन घ्या.म्हणजे सोप्या शब्दात कुस्करुन घ्या हो.
तेलावर कांदा, मटार, हिरव्या मिरच्या घालुन शिजु द्या. मटार लवकर शिजावा म्हणुन फोडणीत घातला आहे.
मटार शिजत आला की त्यात टोमॅटो घालुन थोडा शिजवा.
आता सिमला मिरच्या (तिन्ही रंगाच्या), पनिर त्यात घालुन परतवा.
एक वाफ आणुन त्यात मिठ, गरम मसाला, कोथिंबीर घाला व परत एक वाफ आणुन परतुन गॅस बंद करा.

वाचन
8365
प्रतिक्रिया
20
टीप
खुप मस्त रंगिबिरंगी
पनीर आवडत नसल्याने, पनीरच्या
In reply to पनीर आवडत नसल्याने, पनीरच्या by गणपा
अंडे
In reply to पनीर आवडत नसल्याने, पनीरच्या by गणपा
वा वा अगदी मनातले बोलला रे
In reply to पनीर आवडत नसल्याने, पनीरच्या by गणपा
पनीर फक्त ग्रेव्हीत आवडते.
In reply to पनीर आवडत नसल्याने, पनीरच्या by गणपा
पनीर फक्त ग्रेव्हीत आवडते.
मुलखावेगळी, गणपा, सहज
रंगीत भाजी !!!
चीज चाल्ते का? चीज प्रेमी,
In reply to चीज चाल्ते का? चीज प्रेमी, by इंटरनेटस्नेही
फेटा चिज चालेल ह्यात. पण चेडर
वा... पनीर !!! खी खी खी.
In reply to वा... पनीर !!! खी खी खी. by मदनबाण
दोन्ही शब्द बरोबर आहेत. उगीच
एकदम
चवीला कशी लागेल याचा अंदाज
फोटो कातिल आहे.. करून
छान छान.
सगळ्यांचे धन्यवाद. चिंतामणी
वा..एकदम शाकाहारी ? पण
मस्त दिसतेय