फायनान्सची तोंडओळख (भाग ०): जादूगार राम कुमार आणि जादुच्या छड्या
रामपूर हे एक छानसे छोटेखानी गाव होते. त्या नगरात राम कुमार नावाचा जादूगार राहत होता.राम कुमारला भाऊ तीन-- लक्ष्मण कुमार,भरत कुमार आणि शत्रुघ्न कुमार. तर सीता कुमारी ही त्याची पत्नी.
राम कुमारकडे एक विलक्षण कौशल्य होते.त्याला जादुच्या छड्या तयार करता येत असत.आणि या छड्या साध्यासुध्या नव्हत्या.तर ती छडी ज्या मालकाकडे असेल त्या मालकाच्या बॅंक खात्यात ती छडी जगाच्या अंतापर्यंत दर वर्षाच्या १ जानेवारीला १०० रूपये आपोआप जमा करत असे. राम कुमारकडे अशा अनेक छड्या होत्या आणि त्यातून त्याला भरपूर पैसे मिळत असत. छड्या कशा बनवायच्या याचे रामने गुपित पाळले होते आणि ते त्याने आपल्या भावांना किंवा पत्नीलाही शिकविले नव्हते.तसेच एकही छडी रामच्या बंगल्याबाहेर कधीही गेलेली नव्हती की इतर कोणीही त्या छडीला कधीही हातही लावला नव्हता.
राम कुमारला अचानक एक लहर आली आणि त्याने डिसेंबर २०१० मध्ये पेपरमध्ये जाहिरात देऊन केवळ १ जानेवारी २०११ रोजी आपण त्या छड्या लोकांना विकायला तयार आहोत असे जाहिर केले. कोणी आपली छडी रामकडून विकत घेऊन ती इतर कोणालाही विकली तरी ते चालण्यासारखे होते. छडी नव्या मालकाच्या बॅंक खात्यात पैसे जमा करू लागणार होती.
रामकडून विकत घेतलेली छडी १ जानेवारी २०१२ पासून दर वर्षी जगाच्या अंतापर्यंत मालकाच्या बॅंक खात्यात १०० रुपये आपोआप जमा करणार! छडी विकत घेताना एकरकमी पैसे रामला द्यायचे आणि राम त्या बदल्यात तुम्हाला छडी देणार ही बोली होती. छडी विकत घेणाऱ्याला रामने घेतलेली रक्कम राम कधीही परत करणार नाही. केवळ छडी दर वर्षी १०० रुपये मालकाच्या बॅंक खात्यात जमा करणार! सुमारे दोनशे छड्या विकल्या जातील असा रामचा अंदाज होता. आपल्याला या उद्योगातून किती पैसे मिळतील याचा हिशोब करायला राम बसला तेव्हा त्याच्या लक्षात आले की जाहिरातीत छडीची किंमत द्यायला तो विसरलाच! मग नफ्याचा हिशोब कसा करावा? इतके दिवस राम छड्या स्वत:साठीच बनवत असल्यामुळे त्याला छडीची किंमत किती हा विचार करायची गरज लागली नव्हती.
राम कुमार विचार करू लागला. काही केल्या त्याला उत्तर सापडेना. तेव्हा त्याने हे वाचत असलेल्या प्रत्येकाला फोन केला आणि प्रश्न सोडवायला मदत करायची विनंती केली. त्या बदल्यात तो उत्तर देणाऱ्याला एक छडी मोफत द्यायला तयार झाला.
तेव्हा प्रश्न: तुम्ही राम कुमारचा प्रश्न सोडवू शकाल का?
हा प्रश्न सोडवायला आपण योग्य ती गृहितके धरू शकता.मात्र ती गृहितके काय हे सांगूनच उत्तर लिहावे ही विनंती नाहीतर ते उत्तर बरोबर आहे की नाही हे सांगता येणार नाही.
डिस्क्लेमर: हा भाग ’फायनान्सची तोंडओळख’ या लेखमालेची सुरवात करणारा असला तरी या भागात फायनान्सचे कोणतेही तत्व सांगितले नसल्यामुळे या भागाला ’भाग शून्य’ म्हणत आहे. हा भाग या लेखमालेची सुरवात करण्यासाठी आहे.तसेच जादूगार राम कुमार आपल्याबरोबर राहणार आहे. तेव्हा त्याचीही ओळख करून देणे हा या भागाचा उद्देश आहे.
वाचने
25409
वाचनखूण
प्रतिक्रिया
82
झकास सुरुवात.
In reply to झकास सुरुवात. by नितिन थत्ते
+१ / चांगला प्रश्न / माझी बोली
In reply to +१ / चांगला प्रश्न / माझी बोली by पंगा
काही गडबड नाही
In reply to काही गडबड नाही by क्लिंटन
माझे गृहीतक
In reply to माझे गृहीतक by पंगा
परफेक्ट मार्केट
In reply to परफेक्ट मार्केट by क्लिंटन
ठीक
मस्तच मेजवानी मिळनार आता.
ओ
In reply to ओ by श्रावण मोडक
पहिल्याच तासाला प्रश्न ??? अन तो पण एमएचा ??
५००/-
In reply to ५००/- by आनंद
५०० रूपये
In reply to ५०० रूपये by क्लिंटन
दर वर्षी १०० रु च मिळत असल्या
In reply to दर वर्षी १०० रु च मिळत असल्या by आनंद
तुम्ही योग्य मार्गावर आहात
मालकाचा मृत्यू?
In reply to मालकाचा मृत्यू? by सुनील
वारस
In reply to वारस by क्लिंटन
सहा लाख
In reply to सहा लाख by सुनील
गडबड
In reply to गडबड by क्लिंटन
बरोब्बर!
In reply to सहा लाख by सुनील
तुलना
In reply to मालकाचा मृत्यू? by सुनील
रूपक
In reply to रूपक by पंगा
स्पष्टीकरण
In reply to स्पष्टीकरण by क्लिंटन
बॉंड की अन्यूईटी
In reply to बॉंड की अन्यूईटी by उदय
दुसरी थोडीशी सारखीच संकल्पना
In reply to स्पष्टीकरण by क्लिंटन
एक (शेवटचा) प्रयत्न
In reply to एक (शेवटचा) प्रयत्न by पंगा
you are almost there
In reply to स्पष्टीकरण by क्लिंटन
जादुची छडी = बाँड
चांगली सुरुवात! पुढील भाग
In reply to चांगली सुरुवात! पुढील भाग by नगरीनिरंजन
तुम्ही योग्य मार्गावर आहात
५२१.६९९
In reply to ५२१.६९९ by लॉरी टांगटूंगकर
तुम्हीपण योग्य मार्गावर आहात
In reply to ५२१.६९९ by लॉरी टांगटूंगकर
बँकेचे व्याज
आजची किंमत
In reply to आजची किंमत by उदय
१००% बरोबर
विकत घेतल्या जाणारी छडी जरी
In reply to विकत घेतल्या जाणारी छडी जरी by अनामिक
महत्वाच्या गोष्टीकडे दुर्लक्ष होत आहे
In reply to महत्वाच्या गोष्टीकडे दुर्लक्ष होत आहे by क्लिंटन
व्यनी केलाय, अजून काही गृहीत
गूगल मध्ये
In reply to गूगल मध्ये by गोगोल
अतिशय उपयुक्त दुवा
मस्त
जबरदस्त सूरूवात
लेख मालीका छान होईल यात शंका
रोल नंबर ३२४ हजर.
वाचतो आहे.
रामकडे किती छड्या आहेत यावरही
In reply to रामकडे किती छड्या आहेत यावरही by नितिन थत्ते
क्लू
In reply to रामकडे किती छड्या आहेत यावरही by नितिन थत्ते
बहुदा नसावी
थॅन्क्स बट नो थॅन्क्स!!!!
जबरदस्त सुरुवात, सध्या
नमस्कार मंडळी
In reply to नमस्कार मंडळी by क्लिंटन
उत्तर पाठवले आहे.
In reply to उत्तर पाठवले आहे. by उदय
प्रतिसाद
नेहमीप्रमाणेच सुरेख लेख
गृहीतक : बाजारात व्याजदर काय आहे
In reply to गृहीतक : बाजारात व्याजदर काय आहे by धनंजय
चलनवाढीचा दर ६% धरला तर हे
In reply to चलनवाढीचा दर ६% धरला तर हे by विश्वनाथ मेहेंदळे
approach
In reply to approach by क्लिंटन
व्याजदरासाठी निरीक्षणच हवे
In reply to व्याजदरासाठी निरीक्षणच हवे by धनंजय
धन्यवाद
हे नॉन पर्टीसिपेटींग प्रेफरड
छडी ची म्यान्युफॅक्चरिम्ग
In reply to छडी ची म्यान्युफॅक्चरिम्ग by विजुभाऊ
रॉयल्टी
तिन चार गोष्टींवरुन किंमत
रु. ४६९ फक्त
In reply to रु. ४६९ फक्त by विसुनाना
नफा-तोटा
In reply to नफा-तोटा by क्लिंटन
योग्य किंमतीलाच विकले गेले तर
In reply to योग्य किंमतीलाच विकले गेले तर by नितिन थत्ते
स्पष्टीकरण
छडीचा खरा फायदा विकत
In reply to छडीचा खरा फायदा विकत by विजुभाऊ
खरेदी विक्री
In reply to छडीचा खरा फायदा विकत by विजुभाऊ
Please stay tuned
हे ते परपेच्युटी सारखे वाटते.
झकास सुरूवात !
एक प्रयत्न
क्लिटंन भाउ.. तुमच्या
केवळ सोपे होण्यासाठी उदाहरण
बरं
In reply to बरं by क्लिंटन
संकल्पना सोप्या करून सांगता
In reply to संकल्पना सोप्या करून सांगता by गवि
बाँड
In reply to बाँड by गवि
थोडा धीर धरा
In reply to बाँड by गवि
थोडा धीर धरा
In reply to थोडा धीर धरा by क्लिंटन
ओक्के..
In reply to ओक्के.. by गवि
माझी ही असव्था असीच आहे
फायनान्स चा 'फ' ही कळत नसताना
In reply to फायनान्स चा 'फ' ही कळत नसताना by गणेशा
धन्यवाद