मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

लाल जास्वंद

धनंजय · · कलादालन
लेखनविषय:

वाचने 5883 वाचनखूण प्रतिक्रिया 10

चित्रा गुरुवार, 02/10/2011 - 05:03
नाव लाल जास्वंद आहे, पण फोटोत पिवळा रंग उठून अधिक दिसतो आहे असे वाटते.

सुनील गुरुवार, 02/10/2011 - 05:31
जास्वंदाच्या पाकळीपेक्षा मधला तुरा अधिक उठावदार दिसतो आहे. किंबहुना, तोच उद्देश असावा! अवांतर - जास्वंदीचे फुल केसात माळले जात नाही अशी माझी आजवर समजूत होती. तिला नुकताच धक्का पोचला!

सहज गुरुवार, 02/10/2011 - 06:25
'जास्वंदीचा तुरा' शीर्षक जास्त योग्य वाटते आहे. झूम, लेन्स इ. इ. तांत्रीक माहीती? मिपावर अती पाकृ वाचायचा परिणाम की काय हा काहीतरी खाद्य पदार्थ आहे, चीज असलेला व खावासा वाटतो आहे ;-)

कच्ची कैरी गुरुवार, 02/10/2011 - 15:42
मी रांगोळी काढतांना नेहमी जास्वंदाच फूल काढते ,बाकी फोटो एकदम उत्तम आहे !

In reply to by कच्ची कैरी

गणेशा गुरुवार, 02/10/2011 - 16:18
अवांतर आधी : माझी आई रांगोळी काढताना फक्त ठिपक्यांचे कासव काढायची(दुसरी रांगोळी तिला येत नाहिच हीच आमची खात्री आहे ). मग मी -ताई -पप्पा सगळे चिडवायचो तिला .. दरवेळेस काय ते कासव ग.. नंतर ताई रांगोळी काढायला लागल्यावर मग आमच्या आंगणाला शोभा आली, आणि गणपतीला वगैरे बक्षिसे पण आली घरात. आपले पण तसेच आहे का ? नेहमीच जास्वंदाचे फूल..