मेल्टिंग मोमेन्ट्स (कोकोनट कुकीज)
साहित्यः
मैदा - १२० ग्रॅम
बटर - १०० ग्रॅम
साखर - ९० ग्रॅम
अंडे - १/२ (पांढरे+बलक)
व्हॅनिला इसेन्स - २-३ थेंब
बेकिंग पावडर - १/४ टि स्पुन
डेसिगेटेड कोकोनट - ५० ग्रॅम
कृति :
१. रुम temperature ला आलेले बटर व साखर एकत्र फेटुन घ्यावे.
२. १/२ अंडे व्हॅनिला इसेन्स टाकुन फेटावे.
३. हे अंडे बटर व साखर मधे टाकुन मिक्स करावे.
४. मैदा व बेकिंग पावडर एकत्र चाळुन घ्यावे.
५. मैदा बटर मधे टाकुन त्याचा rubber spatula वापरुन गोळा करुन घ्यावा.
६. हा गोळा १५-२० मिनिटे फ्रिज मधे ठेवावा.
७. १५-२० मिनिटांनी गोळा बाहेर काढुन त्याचे समान आकाराचे छोटे छोटे गोळे करुन घ्यावेत.
८. प्रत्येक गोळा गार पाण्यामधे बुडवुन डेसिगेटेड कोकोनट मधे घोळवुन बटर लावलेल्या बेकिंग ट्रे मधे ठेवावा. प्रत्येक गोळ्यामधे १ इंचाचे अंतर ठेवावे, कारण ते बेक होत असताना मोठे होतात.
९. ओवन १८० degree celcius ला १० मिनिटे preheat करावा.
१०. ओवन preheat झाल्यावर बेकिंग ट्रे आत मधे ठेवुन कुकीज १५-२० मिनिटे किंवा सोनेरी रंग येइस पर्यंत बेक कराव्यात.
११. बेक झाल्यावर थोडा वेळ गार होउन द्याव्यात.
१२. चहा किंवा कॉफी सोबत serve कराव्यात.
वाचने
6628
वाचनखूण
प्रतिक्रिया
30
झकास!
शेवटचा फोटू छान आलाय.
In reply to झकास! शेवटचा फोटू छान आलाय. by रेवती
कॅप्टन धोनी !
मी प्रतिसाद देत नाहिये.
फोटो हि सुरेख आहे असे म्हणत नाहि.
( जबरदस्त घाबरलेला )
In reply to कॅप्टन धोनी ! मी प्रतिसाद देत by वडिल
आत्ता पर्यन्तचे फोटो आवड्ल्या बद्दल धन्यवाद! :)
एक नारीयल पेड से टुटा
गिरतेही वो बिचसे फूटा
सेकताप कर उसे पकाया
खुब कुरकूरा उसे बनाया
मृणालिनी कोकोनट कुकीज!
सहज आगा
In reply to निशांतसर फोटो भारी! by सहज
हाहाहा!!
सहज राव... खूप जुन्या जाहिरातीची आठवण करून दिलीत.
मृणालिनी,
खूप सुंदर दिसताहेत कुकीज. अप्रतिम. शेवटचे दोन्ही फोटो जीवघेणे आहेत. :)
In reply to निशांतसर फोटो भारी! by सहज
फोटो आवडल्या बद्ल धन्यवाद ! :)
In reply to निशांतसर फोटो भारी! by सहज
फोटो आवड्ल्या बद्दल धन्यवाद! :)
पटकन तोंडात टाकाविशी वाटतेय..
म्रुणालिनी,
खुप मस्त फोतो अनि पाक्रु
पन पुन्हा डेसिगेटेड खोबरे आलेच :(
पन ते न टाकता ही करता येइल ना नुसते कुकीज?
In reply to म्रुणालिनी, खुप मस्त फोतो अनि by मुलूखावेगळी
@ मुलूखावेगळी
तुम्ही कोकोनटच्या जागी बदामाची पुड वापरु शकता. :)
In reply to @ मुलूखावेगळी तुम्ही by Mrunalini
म्हणजे महाग आणि डायट मधे न बसनारा ऑ कठीण आहे ;)
In reply to म्हणजे महाग आणि डायट मधे न by मुलूखावेगळी
:) :)
हो. पण मग कधीतरी एकदा try करायला चालते. ;)
In reply to हो. पण मग कधीतरी एकदा try by Mrunalini
नक्किच
अच्छा मग बदाम द्या बरे पाठवुन .पत्ता व्यनी करते ;)
In reply to नक्किच अच्छा मग बदाम द्या बरे by मुलूखावेगळी
हो, चालेल ना. slovakia मधे असाल तर नक्की पाठवते. आणि मग बदाम कशाला, डायरेक्ट कुकीजच पाठवते. :)
In reply to हो, चालेल ना. slovakia मधे by Mrunalini
:)
धन्यवाद म्रुणालिनी
वा काय मस्त दिसताय !आत्ताच डाऊनलोड करुन घेते .
छान दिसत आहेत कुकीज,
@सहजराव, खूप जुनी जाहिरात- आठवण ताजी केलीत,:)
स्वाती
In reply to छान.. by स्वाती दिनेश
छान दिसत आहेत कुकीज, @सहजराव, खूप जुनी जाहिरात- आठवण ताजी केलीत,:)शेम टु शेम बोल्तो. :)
In reply to छान दिसत आहेत कुकीज, @सहजराव, by गणपा
अगदी असेच म्हणतो :)
खुप छान दिसत आहेत कुकीज. पण १ प्रश्न आहे - अंडी न घालता कशा करायाच्या कुकीज.प्लीज सांगाल का?
माझाही हाच प्रश्न
खुप छान दिसत आहेत कुकीज. अंडी न घालता कशा करायाच्या कुकीज.प्लीज सांगाल का?
खुप छान दिसत आहेत कुकीज.
अंडी न घालता कशा करायाच्या कुकीज.प्लीज सांगाल का?
ह्यात अंड न वापरता बाकीचे साहित्य आहे तेवढेच घेउन होतील का हे कुकीज...
In reply to ह्यात अंड न वापरता बाकीचे by निवेदिता-ताई
सगळ्यांचे आभार. :)
हो, निवेदिता-ताईंचे बरोबर आहे. हेच प्रमाण घेउन व अंड न टाकता, तुम्ही ह्या कुकीज करु शकता.
मस्तंच दिसताहेत कुकीज :)
>>>>अंडी न घालता कशा करायाच्या कुकीज.प्लीज सांगाल का?
हे वाक्य अगदी सरळ वाचले आणि फुटलो.
स्वारी बर्का काकवांनो.
मस्त! मस्त! मस्त!
माझ्याकडे मायक्रोवेव्ह आहे त्यात या कुकीज कश्या करायच्या ते सांगू शकाल का?.
बाकी फोटू मस्तच.
In reply to माझ्याकडे मायक्रोवेव्ह आहे by ज्योति प्रकाश
microwave मधे confectionary mode वर तुम्ही ह्या कुकीज करु शकता.
झकास! शेवटचा फोटू छान आलाय.