रविवारी आजी आजोबा गेले ऑस्ट्रीयन आल्प्स मध्ये हिंडायला. त्यांना अशा ट्रीपमध्ये च्यावम्याव खायला म्हणून नेहमी
खारे शंकरपाळे आवडतात.(रेड वाइन बरोबरचा त्यांचा आवडता चकणा आहे तो..)
ह्या वेळी मी थोड्या वेगळ्या प्रकारे हे शंकरपाळे केले. ह्यावेळी थोडे वेगळे मसालेही त्यात घातले. हे शंकरपाळे जास्त पटकन होतात, कुटायला लागत नाही, मेहेनत कमी असे लक्षात आले म्हणून ही रेसिपी तुम्हा सर्वांसाठी..
साहित्य- १ वाटी डाळीचे पीठ (बेसन),२ वाट्या मैदा, २ चमचे रवा, २ मोठे चमचे दही किवा अर्धी वाटी ताक,
१ चमचा लाल तिखट, १/२ चमचा हळद, १/२ चमचा जिरे, १/२ चमचा ओवा, १ चमचा धनेजीरे पूड,१ मोठा चमचा ड्राय बेसल लिव्ज,चवीनुसार मीठ, तळणीसाठी तेल
कृती- वरील सर्व पदार्थ एकत्र करा. २ चमचे तेलाचे मोहन घालून घट्टसर भिजवा.
१५-२० मिनिटे झाकून ठेवा. नंतर पोळी लाटून, शंकरपाळे काता आणि मध्यम आचेवर तळा.


वाचने
8904
प्रतिक्रिया
23
मिसळपाव
प्रतिक्रिया
वा
हाये मार डाला.. माझा वीक
चहा बरोबर मस्त लागतात.
अरे वा!
खुप छान आहेत .फोटो खुप छान
खातो की..
+१
In reply to खातो की.. by धमाल मुलगा
+१ दे पार्सल धाडून. व्हाया
In reply to +१ by कुंदन
झकास!
वा !
धन्यवाद, मैदा आहे घरी करुन
मस्त
स्वातीताई, मी तुमच्या शेजारी
मस्त आहे आयडीया..मी ही येईन
In reply to स्वातीताई, मी तुमच्या शेजारी by रेवती
मस्तच ह
मस्त दिसतात
स्वाती ताई, लई भारी, माझ्या
:)
किती जाड?
धन्यवाद
मस्त मस्त मस्त ! आवड्या एकदम.
आ हा हा! पाहुनी डोळे धन्य
फोटो लय म्हंजे लईच भारी...