ओल्या काजूंची उसळ

यशोधरा पाककृती

50 टिप्पण्या 10,373 दृश्ये

Comments

विंजिनेर नवीन

वा! अस्सल कोकणी पाकृ! @ अवलिया - ओले काजू आणि पॉलिश्ड काजू - दोघांच्या किमतीत बराच फरक असतो

गणपा नवीन

In reply to by विंजिनेर

वा! अस्सल कोकणी पाकृ!
अस्स्च म्हणतो. ओल्या काजुची असो वा फणसाची या भाज्या म्हणजे कोकणच्या खाद्य परंपरेची शान आहे. दुर्दैवाने आज वर नुसत ऐकुनच आहे. :(

यशोधरा नवीन

In reply to by असुर

बघ म्हंजे झालं रे असुरा :D तो गणप्याला बोलावतोय कारण मग त्यालाच सांगेल हे बनव अन् ते बनव, आणि हे महाशय हादडतील! तुला जमतंय का गणप्याभौ सारखं पाकनिष्पत्ती करायला? आलं का काही ध्यानात?

यशोधरा नवीन

In reply to by गणपा

अरेरे, येवा, पुणेही आपलाच आसा. फक्त येताना तू जेवढ्या पाकृ टाकल्या आहेत, तेवढ्या सगळ्या बनवून आणणे. :P

स्वाती दिनेश नवीन

In reply to by यशोधरा

फ्राफु पण आपलाच असा... फक्त ओले काजू इथे मिळत नाहीत,:( तेवढे घेऊन येवा... आणि टिन मधल्या फणसाची भाजी नको असेल तर तो ही घेऊन येवा.. ;) दोन्ही भाज्या करुन मिळतील..( सोबत इतर काही केकृच्या कलाकृती ही मिळतील..) यशो.......... आता इथे कुठे आलेत ग ओले काजू...? आता कधी खायला मिळणार काय माहित..:( टारुच्या भाषेत पाकृ वाचून तोंड लाळावले..:) स्वाती

सखी नवीन

In reply to by स्वाती दिनेश

मीही खूप ऐकलं आहे ह्या उसळीबद्दल. पण इथेही ओले काजू इथे मिळत नाहीत :( त्यामुळे यशो पुण्यात आले की मीही तुला नक्की कळवतेच गं - कसे :)

विजुभाऊ नवीन

In reply to by स्वाती दिनेश

स्वाती तै......... तिकडे येताना नाना काखेत कच्चा फणस आणि काठीला बांधलेल्या गठुड्यात ओले काजू घेउन इमानात मुन्डासे घालून बसलाय . तो फणस शेजारच्या शूमाखर ला टोचतोय हे चित्र डोळ्यापुढे आले. ( "म्हैस "कथा थोडी मॉदीफाईड करून बघा )

ज्योति प्रकाश नवीन

In reply to by गणपा

मार्च एप्रिलच्या दरम्यान कोकणात या म्हणजे सर्व प्रकार खायला घालण्याची सोय करता येईल.

कच्ची कैरी नवीन

मला हीच पाकृ हवी होती.आता ओले काजु बाजारात येण्याची वाट पहावी लागेल.

स्वाती दिनेश नवीन

In reply to by रेवती

अगदी खरं ग रेवती...ओल्या काजूच्या उसळीच्या फोटोला इनोची बाटली पुरली नसती... खूप मस्त लागते ही उसळ... ओले खोबरे + कोथिंबिर भरपूर हवे.. आम्ही अळूच्या भाजीत पण ओले काजू घालतो.. झक्कास लागत. काय ग यशो, एका काजूच्या उसळीवरुन तू अजून किती पदार्थांची आठवण करवलीस...:( स्वाती

ज्योति प्रकाश नवीन

In reply to by स्वाती दिनेश

मसाल्याचे वान्गे पण ओले काजू घालून छान लागते.तसेच गोव्यात याच काजुचे म्हवल म्हणून गोड पदार्थ करतात त्याची पाककृती नन्तर टाकेन.

प्राजु नवीन

यशो.. कोंकणी गो ही पाकृ.!! फोटू नसल्यान... प्रतिक्रिया काय देणार?? या उसळीमध्ये काळे वाटाणे घालतात ना. कारण तशी मी सावंतवाडीला खाल्ली आहे.

यशोधरा नवीन

In reply to by प्राजु

प्राजू, काळे वाटाण्यांची जागा केळफुलांच्या भाजीत.मी तरी नाही पाहिले काजूच्या उसळीत घातलेले. भाजी वाढवायला घातले असतील कदाचित, वा घालतही असतील हां,मला कल्पना नाही. करु तितके प्रकार गं.

असुर नवीन

रेवतीतैशी अगदी जोरात सहमत! असली जीवघेणी पाकृ दिल्याबद्दल यशोआत्येचा झाईर णीसेद! :-) आणि फटू न टाकल्याबद्दल हार्दिक्क अभिनंदन!!! वाचलो आत्मिक जळजळीतून!! पोटाच्या जळजळीवर इनो घेता येऊ शकेल एक वेळ, पण आत्मिक जळजळीवर उपाय नाही! =)) =)) यशोआत्या, मी पुण्यास आलो की हा बेत नक्की कर हो! ओल्या काजूची उसळ, ही हा हा हा हा हा हा!!! -- (हावरट) असुर

मेघवेडा नवीन

In reply to by निवेदिता-ताई

शेवयांची खीर करायची असली आणि शेवया नसल्या तर काय करता? गव्हाची/तांदळाची/कसलीही खीर करता ना? तसंच. मुगाची/मटकीची/वाटाण्याची/कसलीही उसळ करायची! शिंपल!!

यशोधरा नवीन

In reply to by निवेदिता-ताई

बाजारातून आणायचे. मुंबैला मिळतात. ताजे नव्हे, सुकवलेले ओले. किंवा नुसतेच चरफडायचे :P

पैसा नवीन

आमच्या बागेत काजू व्हायला अजून २ महिने अवकाश आहे, आणि आता पाकृ देतेस काय?

पिवळा डांबिस नवीन

चला! पुढल्या खेपेच्या भेटीतला एक वार लागला!!!!:) बाकी फोटो बघायचीसुद्धा जरूरी पडली नाही, यशो! तुझी रेसेपी वाचतांना आजीच्या हातची काजूची उसळ मनःपटलावर उमटली. आणि त्या उसळीबरोबर आजीचीही आठवण दाटून आली....

टारझन नवीन

मन मे काजु फुटे :) लै भारी ... वर सगळ्या पोरी प्रतिसादांतुन मस्त धमाल करत आहे .. मज्जाय बॉ :) - काजुभाऊ उसळवाले

चित्रा नवीन

उसळ आवडली. :) आता काजू नाहीत तेव्हा काय भिजत टाकू, असा विचार करते आहे.

पिवळा डांबिस नवीन

In reply to by विसोबा खेचर

अरे तिच्या ब्लॉगची लिंक वर दिल्येय ना, तिथे बघ की!! कमाल आहे बुवा या नव्या मिपाकरांची!!!;) सगळं कसं रेडिमेड इथ्थेच पाहिजे!!!!;) आणि म्हणे आम्ही देवगडकर!!!! साधी काजूची उसळ डोळ्यापुढे येत नाही!!!! तुझे पूर्वज रडत असतील स्वर्गात!!!!!!! :)

टारझन नवीन

In reply to by पिवळा डांबिस

ह्या दोन पोरांना नको तिथे अवांतरपणा करण्याचा कसला णाद लागलाय अलिकडे ... संपादक मंडळातल्या पोरी खपवुन घेतात म्हणुन काहीही करतात हे :) हॅहॅहॅ

टारझन नवीन

In reply to by पिवळा डांबिस

णव्हे णव्हे ... वाटाणा नव्हे .. काळा मिरु आहे मी :) एकदा दाताखाली आला की समजतं मी कोण ते .. खि खि खि ... काजु च्या उसळीच्या चर्चे चा मान फक्त विजु आणि प्राजु ह्या मुला-मुली ला आहे .. कारण फक्त हे दोघेच वृत्तात बसतात. बाकी सगळे वालाच्या आणि शेवग्याच्या शेंगा .. -(ओढुन ताणुन वृत्तात बसलेला) टार्जु

विजुभाऊ नवीन

In reply to by पिवळा डांबिस

आणि म्हणे आम्ही देवगडकर!!!! डाम्बीसकाका त्या देवगड वाल्याना फार डिवचू नका चिडलेबिडले तर एकदम रागावून "हापूसच्या ओल्या कोयीचा कुर्मा" असली पाककृती हाणायचे टकुर्‍यात

sneharani नवीन

मस्त! फोटो पाहिला! मस्त रेसिपी. :)

दिपाली पाटिल नवीन

मस्त... मागे एक्दा तोंडली आणि ओल्या काजूची भाजी खाल्ली होती...मस्त लागत होती. ब्लॉग मस्तच आहे, अजून कोकणी पाकृत्या टाका की...