व्यवस्थापनाबद्दलचा विशेसषतः संगणक क्षेत्रातील व्यवस्थापनाबद्दल खूप मस्त लेख वाचनात आला. यामध्ये कोणत्याही आय टी कंपनीमधील डेव्हलपर्स ची प्रमुख ३ व्यक्तीमत्वे अधोरेखित केलेली आहेत. त्यांचा कंपनीवर होणारा परीणाम आणि दुष्परीणाम टाळण्याचे उपाय सुचविले आहेत. लेख मूळातून वाचण्यासारखा आणि उल्लेखनिय आहे.
प्रथम व्यक्तीमत्व - वेठीस धरणारे डेव्हलपर्स
या पठडीत येणारे डेव्हलपर्स हे बरेचदा स्ट्रॅटेजिक प्रॉड्क्टवरती अनेक मुख्य निर्णय स्वतःचे स्वतः घेतात मग भलेही त्यांना परवानगी असो वा नसो. स्वतःच्या चूकीच्या निर्णयांनी ते कंपनीला तसेच ग्राहकाला वेठीस धरतात. जॉनचच उदाहरण घ्यायचं तर जॉनला एक अतिशय दोषपूर्ण (डिफेक्टीव्ह) असे वेब टेस्टींग टूल दिले होते. हे टूल जुन्या परिभाषेत होते आणि जॉनला यातील दोष दूर करण्याचे काम सोपविले होते. पण जॉनच्या मते या टूलमधील दोष (डिफेक्टस) ही वरवर दिसणारी कणकण होती, मूळात रोग अतिशय गंभीर होता. आणि या रोगावर एकच उपाय होता तो म्हणजे संपूर्ण प्रॉडक्टच्या प्रॉडक्ट नव्या परिभाषेत लिहून काढणे. आता समजा जॉनचे म्हणने खरे असले तरी ते व्यवहार्य नव्हते कारण ग्राहक हे टूल वापरत होता आणि त्यांच्याकडे तितका वेळ नव्हता. पण जॉन आता एक वेगळीच खेळी खेळू लागला ती म्हणजे तो दोष दूर करण्यात मुद्दाम विलंब लावू लागला. कंपनीचे वेळापत्रक ढासळू लागले, कंपनीने ग्राहकाचा रोष ओढावून घेतला आणि सरतेशेवटी जॉनची हकालपट्टी झाली.
तर मूळातच अशा वेठीस धरणार्या डेव्हलपर्स ना कसे ताळ्यावर आणायचे त्या परामर्ष या लेखात येतो.
द्वितिय व्यक्तीमत्व - महाराजे/महाराण्या डेव्हलपर्स
हे डेव्हलपर्स ज्यांना नवनवीन कोड लिहीण्याची दांडगी हौस असते परंतु तोच् स्वतः लिहीलेला कोड पुढे राखण्याची (मेंटेन) तितकीच नावड असते.हे लोक एकामागे एक निर्मीतीक्षम प्रकल्प (क्रिएटीव्ह असाइनमेन्ट्स) स्वतःपुरते निर्माण करत जातात, शोधत जातात पण नंतर अपेक्षा ही की उरल्या सुरल्या प्रकल्पाची जबाबदारी अन्य कोणीतरी खांद्यावर घ्यावी. आरंभशूर!!! अशा लोकांचे सहकारी या लोकांवर खार खाऊनच असतात कारण यांचे प्रकल्प नंतर बिचारे सहकारीच राखत (मेंटेन) बसलेले असतात.
अशा डेव्हलपर्स बरोबर कसे वागायचे याचा उहापोह या लेखात छानच केला आहे.
तृतिय व्यक्तीमत्व - झडप घालणारे डेव्हलपर्स
हे डेव्हलपर्स बहुसंख्य वेळा एखाद्या प्रॉडक्टवर नवशिके असल्यापासून लागतात, नंतर त्याच प्रॉडक्टबद्दल स्वमेहनतीवर एकूण एक शिकून घेतात. त्यातील खाचाखोचा, गुण-दोष यांचे पूर्ण द्न्यान मिळवतात. पण मुख्य म्हणजे स्वतः कमावलेलं द्न्यान नंतर दुसर्या कोणालाही देत नाहीत. याबद्दल समर्थन काय तर- दुसर्याला शिकवण्यात जास्त वेळ जाईल त्यापेक्षा मी चुटकीसरशी समस्या सोडवेन. अशा रीतीने त्या प्रॉडक्टचा संपूर्ण ताबाच हे लोक घेऊन टाकतात. आणि मग यांचे पद अढळ पद बनते. ना यांना कोणी काढू शकते ना या लोकांना हलायचे असते.कंपनीत अशी स्वतःची जागा बनवली की व्यवस्थापन यांच्यापुढे दात आणि नखं काढलेल्या सिंहासारखे हतबल होऊन जाते.अशी वाईट परिस्थितीच येऊ नये म्हणून काय करावे हे या लेखात आले आहे.
मला हा लेख खूप आवडला. अशी व्यक्तीमत्व आजूबाजूला पाहीली आहेत. कंपनी आणि व्यवस्थापनाला त्रास होताना पाहीला आहे. त्या दृष्टीने हा लेख वास्तववादीच आहे. लेखिकेला अनेक दशकांचा मौल्यवान अनुभव आहेच.
वाचने
3547
प्रतिक्रिया
14
मिसळपाव
प्रतिक्रिया
अरे वा शुचि तै ..मस्त लेखाची
धन्यवाद लालसा.
In reply to अरे वा शुचि तै ..मस्त लेखाची by डावखुरा
छान लेख आहे.
बरोबर आहे तुमचं मिली, कंपनीने
In reply to छान लेख आहे. by मीली
तुमचे म्हणणे चूक नाही. पण
In reply to बरोबर आहे तुमचं मिली, कंपनीने by शुचि
.
In reply to बरोबर आहे तुमचं मिली, कंपनीने by शुचि
छान अॅनालिसिस अजुन ४ आनि ५
शुचितैंचे आभार. १)हा तसा
+१ सहमत
In reply to शुचितैंचे आभार. १)हा तसा by कानडाऊ योगेशु
स्वागतार्ह
छान लेख
खुपच छान
खूप छान लेख!!
मस्त