(--अन् एकमुखान बोला बोला जयजय मिस्सळपाव )
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
मिसळपाव ला सादर अर्पण -
( चाल- अंजनीच्या सुता तुला रामाच वरदान अन एकमुखान बोला बोला जयजय हनुमान)
-----------------------------------------------------------------------------
हे मराठीच्या दुता, तुला तात्यांचे वरदान
अन् एकमुखान बोला बोला जयजय मिस्सळपाव!!
दाही दिशा तुझे भक्त, करुनी मुक्काम
नुकताची पार केला अकडा हजार
हादरली वेब दुनिया, बिथरले मान्यवान!
अन् एकमुखान बोला बोला जयजय मिस्सळपाव!!
विडंबन, पाककृती काव्य आणी चर्चा
साद -प्रतिसादांचारे जोरदार दणका
विचार मांडू सारे, घेऊनी 'गमभन' !!
अन् एकमुखान बोला बोला जयजय मिस्सळपाव!!
आले कुणी,गेले कुणी तुला नाही पर्वा
तुझ्यापरी नावाचा रे राहील दरारा
पाहुणेही येती, गाती तुझे गुणगान !!
अन् एकमुखान बोला बोला जयजय मिस्सळपाव!!
धन्य तुझी वेबसाईट, धन्य तुझी सेवा
तुझे भक्त आम्ही सारे, तुच आमचा ठेवा
घे उंचावुनी आता, या महाराष्ट्राची शान !!
अन् एकमुखान बोला बोला जयजय मिस्सळपाव!!
कांदा, लिंबु अन् पापडी जय बोला मिसळपाव की !!
कांदा, लिंबु अन् पापडी जय बोला मिसळपाव की !!
वाचने
3902
वाचनखूण
प्रतिक्रिया
9
हादरली वेब दुनिया, बिथरले मान्यवान!
......
आले कुणी,गेले कुणी तुला नाही पर्वा
हे जरा जास्तच होत नाही का?
अतिशयोक्ती अलंकार म्हणून वापरला आहे का?
In reply to मजेदार by अरुण मनोहर
मुळ गाण्यात
हाधरली ही धरणी , थरथरले आसमान हे शब्द आहेत
त्याला अनुसरुन वरील रचना आली आहे
हवसे, नवसे, गवसे येती, गावकरी महान
कवी येती, लेखक येती, कार्यकर्ते छान
पुढाकर तात्या घेती, संत पुण्यवान!
अन् एकमुखान बोला बोला जयजय मिस्सळपाव!!
In reply to वा! फारच सुरेख. by नरेंद्र गोळे
जास्त चांगली रचना
धन्यवाद
(कल्पक)बेसनलाडू
धन्य आहे तुमची केळकरसाहेब!
साध्या सज्जन गोळे साहेबांचेही आभार..!
स्वगत : हा भला माणूस नाठाळांच्या टोळक्यात काय करतोय कुणास ठाऊक! :)
असो,
आपला,
(मायबाप मिपावासियांपुढे नतमस्तक!) तात्या.
केळकर साहेब मस्त विड॑बन केले आहे .
धन्यवाद.
सुधीर कांदळकर.
मनी नाही भाव्,म्हणे देवा मला मिसळपाव
मजेदार