मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

पूर आठवणींचा

जयवी · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
आठवणी साचलेल्या काळजात ओथंबलेल्या आठवणी पेटलेल्या होरपळून निघालेल्या आठवणी भरजरी मखमली पेटीत जपलेल्या आठवणी हळूवार अलगद हातांनी वेचलेल्या आठवणी पहिल्या स्पर्शाच्या नकळत लाजलेल्या आठवणी मीलनाच्या हृदयात साठलेल्या आठवणी पावसाच्या मनात कोसळणार्‍या आठवणी सरींच्या चिंब चिंब भिजवणार्‍या आठवणी थंडीतल्या उबदार कुशीतल्या आठवणी पहाटेच्या गार गार वार्‍यातल्या आठवणी विरहाच्या पिळवटून निघालेल्या आठवणी भेटीच्या मोहरून निघालेल्या आठवणींचे मोहळ भावनांचा कल्लोळ आठवणींचे वादळ अनावर तो कोसळ आठवणींचा वावर ओला गहिवर आठवणींचा आसरा मनाचा गाभारा जयश्री अंबासकर

वाचने 5175 वाचनखूण प्रतिक्रिया 13

आनंदयात्री 04/06/2008 - 14:12
आठवणींचे मोहळ भावनांचा कल्लोळ आठवणींचे वादळ अनावर तो कोसळ कवितेने इथे एकदम गती पकडली इथे असे वाटले ! सुंदर आठवणींच्या आठवणी.

प्राजु 04/06/2008 - 15:02
आठवणींचे मोहळ भावनांचा कल्लोळ आठवणींचे वादळ अनावर तो कोसळ आठवणींचा वावर ओला गहिवर आठवणींचा आसरा मनाचा गाभारा सुंदर.. इथे कविता एकदम झक्कास वळण घेते. आठवणींचा पूर भावनांचं वहाणं.. आठवणींचा धूर हृदयाचं जळणं... आठवणींचं आभाळ पापणीत दडलेलं आठवणींचं पाखरू गवतावर पहुडलेलं.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

वरदा 04/06/2008 - 19:49
आठवणी पहिल्या स्पर्शाच्या नकळत लाजलेल्या आठवणी मीलनाच्या हृदयात साठलेल्या खुप सुंदर.... (आठवणीत बुडुन गेलेली) वरदा

ईश्वरी 04/06/2008 - 22:14
सुरेख कविता. आवडली. आठवणींची विविधता छान मांडली आहे. ईश्वरी

विसोबा खेचर 05/06/2008 - 09:27
क्या बात है जयू! नेहमीप्रमाणेच सुंदर कविता...! आठवणी पावसाच्या मनात कोसळणार्‍या आठवणी सरींच्या चिंब चिंब भिजवणार्‍या हे कडवं सर्वाधिक आवडलं! :) आपला, (पावसाच्या आठवणींतला) तात्या.

जयवी 05/06/2008 - 17:07
मनापासून आभार ! अशाच कितीतरी आठवणी मनात रेंगाळत असतात .....थोडंसं कुणी छेडलं तर लग्गेच झंकारतात ना :) प्राजु, तु़झी पण कविता खूप आवडली :)