उपवासाचे पदार्थ १) सुरणाचे काप
लागणारे साहित्य:
सुरण
मिठ
तुप
चिंच कोळ
पाककृती:
सुरणाच्या चकत्या पाडून साल काढा म्हणजे साल काढायला सोप्पे जाते.
सुरणाची पातळ चकती काढून घ्या.
चकतीचे कापुन त्रिकोण करा. तुम्हाला डिझाईन येत असतील दुसर्या त्या काढल्यात तरी चव एकच राहणार आहे.
ह्या त्रिकोणांना चिंचेचा कोळ करुन त्यात पाणी घालुन सुरण उकडून घ्या.
उकडल्यावर भांड्यातले पाणी काढून सुरणाच्या फोडी ताटात काढा. त्याला मिठ चोळा जखमेवर चोळतात तसे.
पॅनवर तुप किंवा तेल टाकुन खरपुस तळून घ्या.
पाहीजे असल्यास्/वेळ असल्यास्/आवड असल्यास सजावट करा.
अधिक टिपा:
तुम्ही मिठाबरोबर मिरचीपुडही घालु शकता. उपवास नसेल तर मिरपुडही लावता येते. मिरपुडचे काप खुप छान लागतात.
उपवासासाठी करताना जर शिंगाडापिठ असेल तर भजी करु शकता. वरीच्या तांदळात काप घोळवुन शॅलोफ्राय करु शकता. तेल टाकुनही करु शकता.
वाचने
8336
वाचनखूण
प्रतिक्रिया
16
चतुर्थी कधी आहे ? हा प्रकार
In reply to चतुर्थी कधी आहे ? हा प्रकार by परिकथेतील राजकुमार
चतुर्थी कधी आहे ? हा प्रकार घरी करायला लावलाच पाहिजे.
In reply to चतुर्थी कधी आहे ? हा प्रकार by परिकथेतील राजकुमार
जखमा
तुला ग फार अनुभव हो मासे
मस्त सुरणं मटणात टाकुन
आहा.. कुरकुरीत आणि खुसखुशीत
वांग्याचे काप मला दर
In reply to वांग्याचे काप मला दर by जागु
वांग्याचे काप मला दर
In reply to वांग्याचे काप मला दर by परिकथेतील राजकुमार
म्हणजे रविवारी करता येतील
माझा आज उपास आहेच्..जागु ताया
मस्तंच गं जागु . लवकरच करेन
चुचु मेल ने पाठवु का ग ?
मस्तच..! वेगळा प्रकार.
छान छान.
सुरण पण !!
सुरणाचे कबाब थोड्या दिवसांत