गणपा ह्यांची बेक्ड वांग्याची रेसिपी तसेच शॅलो फ्राय भरले वांगे.
परवा गणपा यांची बेक्ड वांग्याची रेसिपी पाहीली आणि ही करायचीच असे मनाशी ठरवले. त्यांच्या सगळ्याच पाककृती म्हणा अस ठरवायला भाग पाडतात. घरी सकाळीच मोठ्या वांग्याची भेट आलेली हाही एक योगायोग होता. मग घरी जाताना भाज्या घेउन जाण्याचा खटाटोप केला. आणि खालील भरले वांगे दोन प्रकारे तयार केले एक बेक करुन आणि एक फ्राय करुन.
खालील तयारी आधी करुन ठेवली
सगळी वांग्याचे दोन उभे भाग केले.एका वांग्यातील दोन भागांचा गर सुरीने काढुन घेतला
बाकीची कापलेली वांगी मायक्रोवेव्ह मध्ये २ - २ मिनीटे करत ७ ते ८ मिनीटे भाजुन घेतली. ह्या वांग्यामध्ये भरपुर बिया असल्याने मी त्या घेतल्या नाहीत. थोडा गर होता तो भाजीत टाकला.
भाजीचे साहित्य :
वांगी
ब्रेडचा चुरा (ब्रेड मिक्सरमधुन काढून)
मटार दाणे
कांदे घेताना गणपांना आठवलेला मुद्दा लक्षात आला कांदे महाग झाल्याचा. म्हणुन नाही घेतले मी पण तेवढाच वेळ वाचला.
१ गाजर किसुन
बटाटे बारीक कांद्यासारखे चिरुन
फ्लॉवर बारीक चिरुन
सिमला मिरची बारीक चिरुन
टोमॅटो बारिक चिरुन
आल, लसुण बारीक चिरुन
हिंग, हळद, मसाला
किंचीत साखर
चविपुरते मिठ
अर्धा चमचा गरम मसाला व अर्धा चमचा गोडा मसाला (पण मला ह्यापेक्षा पावभाजी मसाला जास्त चांगला लागेल अस वाटत)
तेल
कढईत तेलावर आल लसुण टाकुन हिंग, हळद मसाला घालून त्यावर फ्लॉवर, मटार, गाजर, बटाटा, वांग्यातील गर ह्या भाज्या टाकल्या. ह्या भाज्या शिजत आल्यावर त्यात मिठ, गोडा व गरम मसाला, किंचीत साखर घालुन टोमॅटो व सिमला मिरची घातली. चांगली वाफ आल्यावर थोडा वेळ झाकण काढून शिजवली भाजी त्यामुळे ती पुर्ण सुकी झाली.
आता बेक करुन गर काढलेल्या व कच्च्या वांग्याचे गर काढलेल्या वांग्याच्या वाटीत भाजीचे पुरण भरले.
वरुन ब्रेडक्रम्ब्स लावले.
आता बेक केलेली पुरण भरलेली वांगी मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये १-१ मिनीट करत ४ ते ५ मिनीटे ठेवली. व कच्ची पुरण भरलेली वांगी तव्यात शॅलो फ्राय केली.
ओव्हन नव्हता त्यामुळे मायक्रोवेव्हमधील वांग्याला एवढा भाजका वास आला नाही. त्यामुळे बेक वांगे खास वाटले नाही. गणपांनी सांगितलेच होते के मावेत तो फिल येणार नाही. पण वेळ वाचवायचा होता व निखारे करायचा कंटाळा आल्याने मी मायक्रोवेव्ह ट्राय केला.
पण शॅलो फ्राय केलेले वांगे मात्र तोंपासु. खुच चविष्ट लागले.

वाचने
7070
वाचनखूण
प्रतिक्रिया
16
जागुताई..तोंपासु पाकृ ऊर्फ
दणकेबाज !!
In reply to दणकेबाज !! by सुहास..
जज्ज कोण आहेत ? आय मीन
गणप्या ने हीच पाककृती दिली
वा!
पण असा रिपिट मामला खटकला
सगल्यात खालचा फोटो शॅलो
गणप्या ने हीच पाककृती दिली
In reply to गणप्या ने हीच पाककृती दिली by जागु
वाद उपस्थित करणे हा हेतु नव्हता.
सगळ्यांकडे ओव्हन असतोच अस
नेहमीप्रमाणेच झ का स !
झक्कास.. एक आधी गणपा छळतो,
संपादक मंडळ
जागुतै, शॅलोफ्राय वांगे
इतक्या वांग्याच्या पाकॄ वाचुन
रेवती कालच पाहीली मी चिटुकली