मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

पूर्णब्रह्म!

असुर · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
खाण्याचा विषय निघाला आणि पुणेकरांनी तिथे आपले मत व्यक्त केले नाही असं आजपर्यंत झालं नाहीये. आणि मीही अस्सल पुणेकर आहे, त्यामुळे जाईन तिथे, आणि जमेल तिथे मतप्रदर्शन करणे हा माझा जन्मसिद्ध हक्क आणि आद्यकर्तव्य आहे. असो, पुणेकरांचे हक्क आणि त्यांचे कर्तव्यपालन हा एक चर्चेचा वेगळा विषय होऊ शकतो, तूर्तास आपण खाण्याकडे वळूयात. मुळात आपण भारतीय लोक चवीच्या बाबतीत अतिशय लकी आणि सुखी आहोत हा शोध मला भारतात होतो तेव्हा लागला नव्हता हे करंटेपण मान्य करूनही मी हे सांगू इच्छितो की आपली खाद्यसंस्कृती ही आंग्लभूमीला खरोखर भयभीत करून सोडणारी आहे. एखादा इंग्रज खाण्याचे असे किती प्रकार सांगू शकेल? मी खाण्याचे प्रकार म्हणतोय, पदार्थ नाही. सांगून सांगून किती सांगणार? १०,२० फारतर ५०! आपल्याकडे अक्षरश: हजारो खाद्यप्रकार आहेत, अस्सल सुगरिणी आणि बल्लवाचार्य गणपा रोजच्यारोज नवनवे पदार्थ शोधून काढतायेत. माझ्यासारखा खाण्याच्या बाबतीत अतिशय अडाणी मनुष्यसुद्धा इथल्या कुठल्याही एक्स्पर्ट माणसाला बोलून झोपवून टाकेल. आता काही इंग्रजांचं असं म्हणणं आहे की 'चटणी' हा 'ओरिजिनल इंग्लिश' पदार्थ आहे. अरे, पण मग इंग्लिश जेवणात चटणी का नाहीये? येडे कुठले!!! गो-ब्राह्मण प्रतिपालक राजाधिराज शिवाजी महाराजांची तलवार ढापली, शहाजहानचं मयूर-सिंहासन ढापलं, कोहिनूर ढापून झाला, एवढंच काय पण टिपू सुलतानाच्या महालाचे खांब देखील सोडले नाहीत यांनी. आता चटणी ढापायला निघालेत, चोर लेकाचे! इंग्रज चोर आहेत की नाहीत यावर चर्चा होऊच शकत नाही, कारण ते आहेतच. असो! मूळ विषय 'खाणे आणि त्याच्या गप्पा' हा आहे, आणि आपण लोक पट्टीचे खाणारे आहोत. सण-उत्सव हे आपोआप आलेले नसून, ते त्या-त्या सणाच्या 'नैवेद्य स्पेशल' पदार्थासाठी 'अ‍ॅरेंज' केलेले आहेत, असा माझा पक्का समज आहे. उदाहरणार्थ, मोदक! कधीही करा, चव बदलत नाही, पण गणपतीत करा, आहाहाहा! पुरणपोळीचा बेत असेल आणि वाट्टेल तितक्या पुरणपोळ्या करून वाढणारी आई असताना जेवणाच्या पंगतीत साक्षात स्वर्ग अवतरतो! पण ऐन होळीच्या दिवशी पुरणपोळीच्या ऐवजी मोदक केले तर बेत जमून येत नाही राव. 'तेव्हा असावे पुरणपोळीचे, कुणा मोदकाचे ते कामच नव्हे!' चकली हा पदार्थ कधीही टाईमपास करण्यासाठीच बनवला गेलाय! पण दिवाळीच्या दिवसात चिवडा, लाडवाच्या संगतीत चकली कशी शोभून दिसते. शिरा एरवीही आवडेल, पण चतुर्थीच्या नैवेद्याला केलेला शिरा एकदम सात्विकच बनवून टाकतो! त्यातही केळं,वेलची वगैरे घालून केलेला शिरा असेल तर एकदम सारसबागेचाच गणपती आठवणार बघा! कालच मी आणि माझा मित्र 'मर्‍हाटी खाद्यप्रकार' यावर जरा गप्पा मारत बसलो होतो. जरा म्हणजे ऑफिस मध्ये जेवण करून सुस्ती येते त्या वेळी. थोडक्यात दुपारी २ ते ४:३०! दोन-अडीच तास आम्ही फक्त 'मिसळ' वर गप्पा मारल्या. पुण्याची रामनाथ, बेडेकर, श्रीकृष्ण, श्री इत्यादी अतिशय फेमस आणि बाकी नॉर्मल पुण्यातली वर्ल्ड फेमस 'मिसळ' नावाचं पूर्णब्रह्म पुरवणारी केंद्र, आणि ठाण्याचं 'मामलेदार'! (मित्र मुंबैकर आहे, थोडा मान ठेवावा लागतो!) अशी मैफिल जमलीये म्हणून सांगू! बास, त्याच्या नंतर फक्त एक प्लेट मिसळ, ४ पाव, एक जोरदार लालभडक तर्री आणि नंतर गार गार ताक ऑर्डर करायचं राहिलं होतं. पण हाय रे हाय, आम्ही बसलो होतो गोर्‍या साहेबाच्या ऑफिसात; तिथे बर्गर, बिन्स, आणि पास्ता याच्या पलीकडे कोणी काही गिळेल तर शपथ आहे. डुक्कर खायला सांगा यांना, डुक्कर मेले! आणि सगळ्यात विशेष म्हणजे इथल्या 'इंडियन' हॉटेलात गोर्‍यांची जितकी गर्दी असते तितकी गर्दी त्या हॉटेलच्या आजूबाजूच्या ४ इंग्रजी हॉटेलात मिळूनदेखील नसते. म्हणजे चव वगैरे कळते यांना थोडीफार, पण तिथेही नाक वर! त्या हॉटेलात खाणार आणि मग 'करी' इथेच कशी 'भारी' बनते याच्या बाष्कळ बाता मारणार. त्यांचं जाऊद्या. आमच्या गप्पांचे २ तास फक्त मिसळीवर गेले, वडापावबद्दल तर चकार शब्दही बोललो नाही आम्ही. पुरणपोळी आणि मोदक तर अजून लिस्ट मध्ये यायचेत. खीर, बासुंदी, खव्याच्या पोळ्या, शिरा, झणझणीत भरीत, बटाट्याची रस्सा भाजी, भरली भेंडी हे तर मिडल-ऑर्डर बॅट्समन आहेत. स्वीकारचे पोहे, अण्णाचा चहा, अप्पाची खिचडी, वैशाली, रुपाली, सोलकडी, दुर्गाची कॉफी वगैरे तर एक्स्ट्रा मधेच! बाकीच्यांचं सोडा, इथे सलामीचा पहिला फलंदाजच दुसर्‍याला बॅटिंग करू देत नाहीये अजून. तसं पाहायला गेलं तर मला भारतीय पदार्थांचा अगदीच उपास वगैरे घडलेला नाहीये. देवाच्या कृपेने मी जिथे राहतो ते स्वत: 'मुंबै' कर आहेत, आणि मालकीणबाईंच्या जेवणाला झकासच चव आहे. अहो, होळीच्या दिवशी एकदम अस्सल साजूक तुपातली पुरणपोळी मिळाली आहे मला! रोजच्यारोज वरण-भात, कढी/आमटी, २ भाज्या, गरमागरम पोळी असा साग्रसंगीत आणि सणसणीत बेत असतो. भरपूर वेळ, मोकळ्याढाकळ्या गप्पा आणि त्या जोडीला मस्त जेवण. अजून काय हवं? पण कधीतरी अचानकच 'पुणेरी' पदार्थ डोक्यात रुंजी घालायला लागतात, स्वत:ची महती सांगायला सुरुवात करतात आणि आमचा कलेजा पार खलास होऊन जातो. आम्ही आमचे रहात नाही, कश्शाकश्शाचं भान उरत नाही, 'देह इथे आणि मन थेट पुण्यात, स्वयंपाकघरात' अशी अवस्था होऊन जाते. आईच्या हातची चव, आत्त्याने केलेली चिंच-गुळाची आमटी, बहीणीच्या हातचे मोदक, स्पेशल 'दादा' साठी बनवलेले पोहे - सतराशे साठ पदार्थ आठवतात, आणि खरोखर हळवं होऊन जायला होतं. आपले लोक आणि आपल्या पूर्णब्रह्माची चव यांचं महत्व बाहेर राहिल्याशिवाय कळत नाही म्हणतात हेच खरं!!! (अन्यत्र पूर्वप्रकाशित)

वाचने 5007 वाचनखूण प्रतिक्रिया 25

प्राजु 27/12/2010 - 06:27
तर्रीसारखाच चमचमीत, चकलीसारखा खमंग आणि केळं-वेलची घालून केलेल्या तूपातल्या साजूक शिर्‍यासारखाच सात्विक लेख..! एकदम छान! (बाकी ईंडियन हॉटेलात गोरे लोक ज्या पद्धतीने जेवतात ते बघून असे वाटते की किमान महिनाभर यांना ट्रेनिंग द्यावं भारतीय जेवण कसं जेवायचं असतं ते. सगळ्या भाज्या एकत्र त्या पुलाव्/स्टीम्डराईस वर घालून सगळा गचका करून, शेवटी ती नान्/रोटी हातात घेऊन पिझ्झा सारखी नुसतीच खातात.. ! हाय रे कर्मा! त्या बिचार्‍या आचार्‍याने खपून केलेल्या अन्नाची वाट लावायची आणि मग खायचं!!)

In reply to by प्राजु

रेवती 27/12/2010 - 21:15
सहमत. एकदा एक अमेरिकन जोडपं नान हातात घेऊन 'ग्रीन डिप' म्हणजेच पालक पनीरला फक्त टेकवून खात होतं. आम्ही भरपूर भाजी आणि रोटी असं खाताना पाहून त्यांना कसं खायचं ते समजलं. ;) बरेच अभारतीय नैवेद्याच्या वाटीभर भाजीला $ १३ देतात म्हणून इथले एक हाटेलवाले फसवतात.

सहज 27/12/2010 - 06:33
जाऊ दे! खाणं हा बोलण्याचा विषय नाही!.. - संत तात्याबा महाराज तात्या अरे कुठे आहेस रे बाबा? जरा दर्शन दे की!

In reply to by सहज

टारझन 27/12/2010 - 10:17
तात्या अरे कुठे आहेस रे बाबा? जरा दर्शन दे की!
सहमत ! तात्याबा , होऊन जाऊदे साऊथसाईड इलियाना वर एक अभ्यासपुर्ण चित्रपुर्ण वर्णनपुर्ण संगितापुर्ण लेख. (इलियाना प्रेमी) e-टालियाना

विंजिनेर 27/12/2010 - 06:58
डुक्कर खायला सांगा यांना,
बा असुरा: जिथे आपले म्हर्‍हाठी पदार्थ मिळत नाही तिथे मिसळ आणि उकडीचे मोदक इ. आठवण काढून कशाला मनाला त्रास करून घ्यायचा? ते जाउदे. डुक्कराला आजाबात नावं ठेवायची नाहीत बरका... हा प्राणी अत्यंत चविष्ट असतो. विषेषतः (हो आम्ही असंच लिहीणार - अधिक माहिती साठी "गुगल" नाहीतर "बिंग" करा ;) ) बेबी बॅक रिब्स किंवा कोळशावर भाजलेली पोटाजवळची चरबी केवळ अफलातूनच लागतात. तेव्हा मुद्दा असा की डुक्कर/पास्ता इ, त्यांच्या त्यांच्या जागी ठीक. उ. मोदक/मिसळ आपाप्ल्या जागी. आपण जे समोर येईल त्याचा आस्वाद घेत राहिलं पाहिजे. डावे उजवे करून चालणार नाही. कसें?

In reply to by विंजिनेर

गणपा 27/12/2010 - 07:16
असुरा एकदम चमचमीत लेख. आणि डुक्कराच्या बाबतीत विंजिनेराशी सहमत. (पोर्क चीली आणि सर्पोतेल प्रेमी)

In reply to by विंजिनेर

रानडुक्कराची चरबी शेकोटीत भाजल्यावर खोबर्‍यासारखी कुरकुरीत लागते असं ऐकून आहे. अगदी या लेखासारखीच खमंग. - रानडुक्कर खाण्यास उत्सुक् आणि ससाप्रेमी

In reply to by अप्पा जोगळेकर

आमच्या येथे ते प्रमुख अन्न आहे . स्वस्त नि मस्त त्याच्या आख्या पायात पण लई ताकद असते त्याची मोठी तंगडी हि जर्मन पारंपारिक डिश आहे .आमचे कुटुंबाच्या आवडती मी अजून धीर केला नाही .आमची मजल सॉसेज पर्यत .

In reply to by विंजिनेर

स्वाती२ 27/12/2010 - 21:14
>> डुक्कर/पास्ता इ, त्यांच्या त्यांच्या जागी ठीक. उ. मोदक/मिसळ आपाप्ल्या जागी. आपण जे समोर येईल त्याचा आस्वाद घेत राहिलं पाहिजे. डावे उजवे करून चालणार नाही. कसें?>> सहमत!

Nile 27/12/2010 - 07:12
ये भो#*@()@!! !(!@!* #$)$- #)@#)@#(_@#!!! साला इथे सिरीयलवर दिवस काढायची वेळ आहे सद्ध्या, हे सगळं आत्ताच टंकायचं होतं का? "सागरा प्राण तळमळला" की इथं! तसं आम्ही सगळं (चांगलं) खातो, पण आपल्या "इंड्यात खाण्याची चैन बरंका" ह्या बाबतीत दुमत नाही.

सूड 27/12/2010 - 08:30
आहाहा !! असुरभौ खीर, बासुंदी, खव्याच्या पोळ्या, शिरा, झणझणीत भरीत, बटाट्याची रस्सा भाजी, भरली भेंडी एवढ्या पदार्थांची आठवण करुन दिलीतच तर एखादा पदार्थ या आठवड्यात करावाच म्हणतो. तुमच्या खव त त्याचा फोटु टाकेन, नक्की !! :D

चरचरीत लिखाण असुर शेठ. आणि त्यात नेमका जेवणाच्या वेळी हा लेख वाचला म्हणुन बरे ;) अवांतर :- 'ओरिजिनल इंग्लिश' ह्यातील योग्य शब्द ओरिगिनल असा आहे. भयानक पाठलाग.

@होळीच्या दिवशी एकदम अस्सल साजूक तुपातली पुरणपोळी मिळाली आहे मला! रोजच्यारोज वरण-भात, कढी/आमटी, २ भाज्या, गरमागरम पोळी असा साग्रसंगीत आणि सणसणीत बेत असतो. माझे लंडन आणि अबुधाबीचे दिवस आठवले बिन दक्षिणेचा ब्राम्हण म्हणून किती तरी माउलीच्या घरी उदरभरण केले होते त्याची आठवण झाली . त्यांचे ह्या निमित्ताने आभार मानतो .

लेख छान. जीभेचे चोचले पुरवणे कठिण काम. पुरवावे तेवढे वाढतात. जाऊ द्या... खाण्यावर बोलण्यावर माझाही विश्वास नाही. ;) बाकी, मामलेदार मिसळ केवळ मुंबईचा मान ठेवायचा म्हणून? हात् लेका, भो***. जगातली एक नंबर फर्मास मिसळ आहे. साक्षात तात्याने खायला घातली होती... ( http://www.misalpav.com/node/3343 ). त्या नंतर अजून तरी दुसरी कोणतीही मिसळ त्याहून जास्त आवडलेली नाहीये.

In reply to by बिपिन कार्यकर्ते

१००% सहमत बाकी डोंबिवलीत वेस्ट ला मुनमुन मिसळ हि मामलेदारच्या बहिणीची आहे .त्या आजी स्वतः गल्ल्यावर असतात .त्याच्या मायेमुळे झणझणीत मिसळ व सुट्टे पैश्याच्या एवजी लिमलेत किंवा श्रीखंडाची गोळी खातांना लई बर वाटते .

धमाल मुलगा 27/12/2010 - 21:10
कसं रे व्हायचं असं? इतका जीव गुंतणं बरं नव्हे. ;) >>आता काही इंग्रजांचं असं म्हणणं आहे की 'चटणी' हा 'ओरिजिनल इंग्लिश' पदार्थ आहे. येडे तिच्यायला! गोळाभर लसणाची चटणी खाऊन दाखिव म्हणावं! आमच्याकडं निदान गेले तीन-चारशे वर्षं अशीच बनते. मग बोल. >>सण-उत्सव हे आपोआप आलेले नसून, ते त्या-त्या सणाच्या 'नैवेद्य स्पेशल' पदार्थासाठी 'अ‍ॅरेंज' केलेले आहेत, असा माझा पक्का समज आहे. समज? वेड्या, खरं तेच आहे की. :) >>डुक्कर खायला सांगा यांना, डुक्कर मेले! अंय! डुकराबद्दल बोलायचं नाय हां....तू ये इकडं, आपुन रानडुक्कर खायला जाऊ..एकदम झकास. :) >>पण तिथेही नाक वर! त्या हॉटेलात खाणार आणि मग 'करी' इथेच कशी 'भारी' बनते याच्या बाष्कळ बाता मारणार. त्यांना म्हणावं, भडव्यो, या एकदा कोल्लापूरात..एकेक वाटी तांबडा-पांढरा रस्सा भुरका...मग बोला...अर्थात, बोलायला शिल्लक राहिलात तर. :)
त्यांचं जाऊद्या. आमच्या गप्पांचे २ तास फक्त मिसळीवर गेले, वडापावबद्दल तर चकार शब्दही बोललो नाही आम्ही. पुरणपोळी आणि मोदक तर अजून लिस्ट मध्ये यायचेत. खीर, बासुंदी, खव्याच्या पोळ्या, शिरा, झणझणीत भरीत, बटाट्याची रस्सा भाजी, भरली भेंडी हे तर मिडल-ऑर्डर बॅट्समन आहेत. स्वीकारचे पोहे, अण्णाचा चहा, अप्पाची खिचडी, वैशाली, रुपाली, सोलकडी, दुर्गाची कॉफी वगैरे तर एक्स्ट्रा मधेच! बाकीच्यांचं सोडा, इथे सलामीचा पहिला फलंदाजच दुसर्‍याला बॅटिंग करू देत नाहीये अजून.
आवरा!
पण कधीतरी अचानकच 'पुणेरी' पदार्थ डोक्यात रुंजी घालायला लागतात, स्वत:ची महती सांगायला सुरुवात करतात आणि आमचा कलेजा पार खलास होऊन जातो. आम्ही आमचे रहात नाही, कश्शाकश्शाचं भान उरत नाही, 'देह इथे आणि मन थेट पुण्यात, स्वयंपाकघरात' अशी अवस्था होऊन जाते.
लवकरात लवकर लग्न करुन टाकणे हा आपुलकीचा सल्ला. कंडीक्शन बिघडत चाललीये तुमची. ;)

तुम्ही दमदार सुरूवात केली त्यावरून चांगली चारपाच लेखांची पंगत उठणार असं वाटलं होतं. पण खमंग लिंबू, खोबरं कोथिंबीरवाल्या कांदेपोह्यांवरच बोळवण केलीत. कदाचित लिहिता लिहिता तोंडाला सुटलेलं पाणी अनिवार झालं असेल. मात्र डुकराला असे बोल लावू नयेत. तुम्हाला बेकन, सॉसेजेस व हॅमची शपथ. आणि प्रोश्युतोपुढे तर बोलणंच खुंटतं.