मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

३१ डिसेंबर : मदत : हॉली-डे रिसॉर्ट ( माहिती )

छोटा डॉन · · जनातलं, मनातलं
नमस्कार मिपाकरांनो, मागच्या काही दिवसात खादाडीच्या चर्चेत जे भरभरुन प्रतिसाद आले तेच पाहुन ( असो, पण टीआरपीचा आम्हाला मोह नाही ) ही चर्चा टाकण्याचे धाडस करतो आहे. विषय : पुण्यापासुन ५०-६० किमी अंतरापर्यंत असणारे एखादी हॉलिडे रिसॉटची माहिती सांगणे अंदाजे ८-९ लोकांसाठी बजेट : नो बार ! अपेक्षा ( कमीत कमी ) : १. शहरापासुन, गर्दीपासुन, गोंगाटापासुन दु ऽऽऽऽऽ र असावे २. जंगलात, तळ्याच्या काठाशी ( मराठीत : लेक नियर ) किंवा हिल-स्टेशनवर असलेले चालेल. ३. रहाण्यास एकच मोठ्ठी डॉर्मेट्री वगैरे असलेलेच रिसॉर्टच हवे. ४. २४ तास रुम सर्व्हिस असणे अपेक्षित आहे ५. बाकी इतर टीटी टेबल, स्नूकर, बास्केटबॉल आदी तत्सम खेळ असले तरी चालतील नसले तरी चालतील. ६. त्या ठिकाणी शक्यतो 'मोबाईल रेंज नसल्यास उत्तम'. ७. पार्टी गेम्स, डीजे म्युझिक, रेन डान्स आदी तत्सम प्रकारात रुची / शौक / आवड / उत्सुकता नाही. शक्य असल्यास 'संपर्क क्रमांक' दिल्यास उत्तम. सोबत थोडक्यात तिथली माहिती आणि उपलब्ध / अनुपलब्ध सोईसुविधांविषयी टिप्पणी अपेक्षित आहे. धन्यवाद ! अवांतर : योग्य माहिती पुरवणार्‍याचा 'योग्य सन्मान' केला जाईल :)

वाचन 11229 प्रतिक्रिया 50