विक्रोळीच्या संपतला मी म्हटले
तु रूळावर काय शी करायला बसतोस?
अरे केवढी मोठी गाडी आणि माणसे जातात या रूळावरून?
तु संस्कृतीवर अशी घाण काय उडवतोस?
अरे सरळ शौलायात जावे सुसंकृतपणे
तशी संपत म्हणाला -
साहेब, शी काय म्हंता? सरळ हागाय बसतो म्हणाना
म्हणजे किती मराठी वाटतं, पोट कसं साफ झाल्यासारखं वाटतं
मी त्याला म्हटलं अरे दादरसारख्या ठिकाणी आता किती सुंदर, देखणी, सुलभ शौलालयं निघालीत
तिथे जावं
मग मी सरकारकडून त्याला आणि त्याच्या कुटुंबाला
शौचालयाचा वार्षिक पास दिला मोफत
आता ते सर्वजण गाडीने दादरला येतात - सुलभ शौचालयात !
आणि रात्री झोपताना संपत मनात म्हणतो,
च्यायला सरकारनं जगायची नाय, जगायची नाय
हागायची तर सोय केली!!!
कवितेची खरी मजा घ्यायची असेल तर क्लिप जरूर ऐकाच!!!!!!
************
जे न देखे रवि, ते ते देखे कवि किंवा जे जे न देखे रवि ते ते देखे कवि असं अथवा ते मूळ जसं असेल तसं काहीसं आहे! तर मुद्दा एवढाच की कवीकडे सर्वव्यापी नजर असते. बा.सीं. मर्ढेकरांची "पिपात मेले ओल्या उंदीर" या कवितेवर आजही त्या कवितेतून नेमकं, म्हणजे अगदी पक्कं काय व्यक्त होतं त्यावर चर्चा चालू आहेत. काही असो, कवी काहीतरी नेहमीच नवं दाखवून जात असतो. कधी आपल्या ते नजरेत येतं कधी येत नाही. लोकप्रिय, हास्यस्फोट्क, महाराष्ट्राचे अत्यंत लाडके कवी श्री. अशोक नायगावकरांची "सुलभ शौचालय" (खरं म्हणजे नायगावकरांनी तिला शीर्षक दिलेलं नाहीय, नुसताच सकाळच्या वेळचा अनुभव म्हटलंय) ही कविताच पहा ना. अगदी साध्यासुध्या शब्दांत सामान्य माणसाची अतिसामान्य तरिही तेवढी कळीची (!) समस्या त्यांनी या कवितेत मांड्ली आहेच; पण त्याच सामान्य माणसाला झालेली खुशी शासनाला शालजोडीतले मारून मोठ्या समाधानाच्या, अतिशय भोळ्याभाबड्या टोनमध्ये व्यक्त केलीय.
त्यांची शाकाहार ही कविता सर्वप्रथम ऐकली होती तेव्हा मी अक्षरश: जमीनीवर खाली पडून गडाबडा लोळत हसलो होतो आणि रडतानाही डोळ्यात पाणी येणार नाही एवढं पाणी डोळ्यांतुन निघालं होतं. श्री. अशोक नायगावकरांच्या शैलीबद्दल इथल्या शक्य त्या सगळ्यांची मतं वाचायला आवडेल.
वाचने
10956
प्रतिक्रिया
20
मिसळपाव
प्रतिक्रिया
नायगांवकर या महान कवीची "सुलभ
खोल बोललात..
In reply to नायगांवकर या महान कवीची "सुलभ by परिकथेतील राजकुमार
व्वा..
णायगावकर म्हणजे एकदम भारी
विक्रोळीहून दादरपर्यंत कसा दम
स्नायुंना रोज ची प्रॅक्टिस
In reply to विक्रोळीहून दादरपर्यंत कसा दम by अवलिया
स्नायुशक्तिवर्धन आसनांबद्दल
In reply to स्नायुंना रोज ची प्रॅक्टिस by टारझन
टारझन व अवलिया, आपण दिलेले
In reply to स्नायुशक्तिवर्धन आसनांबद्दल by अवलिया
सॉरी शक्तिमान. येथुन पुढे
In reply to टारझन व अवलिया, आपण दिलेले by संपादक मंडळ
+१
In reply to टारझन व अवलिया, आपण दिलेले by संपादक मंडळ
विक्रोळीहून दादरपर्यंत कसा दम
In reply to विक्रोळीहून दादरपर्यंत कसा दम by अवलिया
असे धागे विनोदी न राहता
धागाकर्त्याने नोंद घेणे
In reply to असे धागे विनोदी न राहता by संपादक मंडळ
अशोक नायगावकांच्या सादरीकरणात
In reply to धागाकर्त्याने नोंद घेणे by यकु
>>आपला विषयच असा आहे कि
In reply to अशोक नायगावकांच्या सादरीकरणात by रेवती
सहमत आहे. या संकेतस्थळावर एका
In reply to >>आपला विषयच असा आहे कि by स्वानन्द
नायगांवकर महान पण आम्ही
ही घ्या - पण नुसती वाचून मजा नाही येणार - नायगावकरच हवेत
In reply to नायगांवकर महान पण आम्ही by शाहरुख
नायगावकर् इज सिंपली ग्रेट
हास्यकवी