भाजीचे साहित्य
मटार दाणे अर्धा किलो
कांदे २ छोटे चिरुन
आल लसुण पेस्ट
टोमॅटो १ बारीक चिरुन
राई, जिर, हिंग, हळद, मसाला
१/२ चमचा गरम मसाला
मिठ
तेल
ओल खोबर
कव्हरसाठीचे साहित्य:
१ किलो बटाटे चांगले उकडून
मिठ
रवा किंवा बटरचा मिक्सरमधुन काढलेला चुरा.
तळण्यासाठी तेल
पाककृती:
प्रथम वरील भाजीचे साहित्य घेउन तेलावर राई, जिर, हिंग ची फोडणी देउन कांदा गुलाबी रंगावर परतवायचा. नंतर त्यावर आल लसुण पेस्ट, हळद व मसाला घालून मटार टाकायचा. आता वरती झा़कण ठेउन त्यावर पाणी ठेउन मटार वाफेवर शिजुन घ्यायचा. शिजला की बारीक चिरलेला टोमॅटो, ओल खोबर, गरम मसाला, मिठ घालुन थोडावेळ वाफवुन त्यावर खोबर घालुन गॅस बंद करायचा.
भाजी होत असतानाच बटाटे कुकरला किंवा टोपात चागले शिजवुन घ्यायचे व गरम असतानाच त्याची साल काढून स्मॅश करुन घ्यायचे. गरम असताना चांगले स्मॅश होतात. अगदी पिठाप्रमाणे बटाटा करुन घ्यायचा. पिठामध्ये चविपुरते मिठ घालुन एकदा हा लगदा चांगला मळून घ्यायचा.
पॅटीस करताना लिंबाएवढा बटाट्याचा लगदा घेउन त्याची मोदकासाठी करतो तशी वाटी करायची.
मग त्यात १ चमचा भाजी भरुन घ्या
आता ही भरलेली वाटी मोदक वळतो त्याप्रमाणे वळा
वळत वळत वरुन बंद करुन हलक्या हाताने दाबुन चपटी करायची.
आता हा पॅटीस रवा किंवा बटरच्या चुर्यामध्ये घोळवुन घ्या.
आता हे पॅटीस गरम तव्यावर मंद फ्लेम ठेउन शॅलोफ्राय करत ठेवा. आधी ५-६ पॅटीस करुन घ्यायचे मग तव्यावर टाकायचे म्हणजे गॅस व वेळ वाचतो.
हे घ्या तयार आहेत गरमा गरम पॅटीस. सॉस सोबत चांगले लागतात.
वरील पध्दतीने करताना वेळ जास्त लागतो. जर कमी वेळात करायचे असतील तर बटाट्याच्या लगद्यातच भाजी मिक्स करुन घ्यायची.
त्याचे कटलेट करुन मंद गॅसवर तळावेत. २ तास वरचा प्रकार चालु होता. कारण आमची फॅमिली मोठी तशी कॉन्टिटी ही मोठी. मी शेवटी कंटाळा आल्यावर खालचा प्रकार केलाय. ह्यांचा रंग छान आला पण चव ती नाही येत.
अधिक टिपा:
बटाट्याच्या लगद्यात ब्रेडचा चुरा करुनही पिठ मळतात. त्यामुळे पॅटीस तुटत नाहीत. पण मी नेहमी नुसतेच करते कारण चवीत फरक पडतो.
हे पॅटीस मका, तुरीचे दाणे तसेच इतर कडधान्य घालुनही करता येतात.
जर मांसाहारी असाल तर हेच पॅटीस खिमा, करंदी घालुन करता येतात. तसेच रव्या ऐवजी अंड्यामध्ये घोळवुन तळता येतात.
वाचने
12355
प्रतिक्रिया
31
मिसळपाव
प्रतिक्रिया
मेलो ! मेलो ! मेलो !!
अरे ह्या जागुतैचा आयडी रद्द
कावेरी ???? पुनम्ला
In reply to अरे ह्या जागुतैचा आयडी रद्द by परिकथेतील राजकुमार
प्र का टा आ
In reply to कावेरी ???? पुनम्ला by गणपा
कावेरी ???? पुनमला सोड्चिठ्ठी
In reply to कावेरी ???? पुनम्ला by गणपा
यम! यम !!! यम !!!
सुंदर..
अवलिया अमृत मारते जिवंत
ते पाणवठ्याचे नाव आहे ग
In reply to अवलिया अमृत मारते जिवंत by जागु
एकदम.. खल्लास.. आम्ही पहिल्या
+१
In reply to एकदम.. खल्लास.. आम्ही पहिल्या by मेघवेडा
पाकृ व फोटू छान दिसतायत. तू
रंग आणि आकारावरुन तरी
In reply to पाकृ व फोटू छान दिसतायत. तू by रेवती
मटारच आहेत ते.
In reply to रंग आणि आकारावरुन तरी by परिकथेतील राजकुमार
सध्या सिजन आहे मटाराचा.
In reply to पाकृ व फोटू छान दिसतायत. तू by रेवती
ये हुवी ना बात !! या पाकृ
पॅटिस
In reply to ये हुवी ना बात !! या पाकृ by सुहास..
वडापावाऐवजी पॅटिसचीच गाडी
In reply to पॅटिस by गवि
गॅस दोघे मिळुन भरणार का?
की हाताची ही जादू ? नि करामत
व्वा मस्तच
जीव गेला पाहून.. आता काय
एकदम मस्त ....मुलीला फ़ार
मस्त किलर ....
भन्नाट!
मस्तं !
वा वा... रविवारी असे पॅटीस
मस्त
वा!
मस्त! टोन्डाला पाणी सुटले!
जागुताई ...