केवढी गरज असते व्यक्तीला समाजाभिमुख रहाण्याची, अन्य लोकांशी निकट स्नेहसंबंध वृद्धींगत करण्याची. आपण जेव्हा गप्पा मारतो, मन उघडं करतो तेव्हा, कोणीतरी आपलं बोलणं सहानुभूतीपूर्वक ऐकावं असं आपल्याला वाटतं. कोणाबरोबर तरी विचारांची देवाण्-घेवाण व्हावी, वादविवाद व्हावेत आणि विरंगुळ्याचे ४ क्षण आपल्या वाट्याला यावेत , आपल्या बरोबर समोरच्या व्यक्तीचादेखील विकास व्हावा हीच प्रत्येकाची इच्छा असते. तीच गोष्ट भेटवस्तूंची. मला भेटवस्तू मिळाली तर मी आनंदतेच पण मी जेव्हा कोणाला भेटवस्तू देते आणि ती व्यक्ती, ती भेट स्वीकारते तेव्हा, त्या व्यक्तीचा आनंद पाहूनच, माझा आनंद द्विगुणीत होतो.
नोकरी करणार्या व्यक्तींबद्दल मला नेहमी एक जाणवतं ते म्हणजे केवळ नोकरीच्या निमित्ताने त्यांना मिळणारी - समाजाभिमुखता आणि लोकसंग्रह. नोकरीमुळे पैसा मिळणे हा फयदा होतोच होतो पण मला विचाराल तर अजून एक महत्त्वाचा फयदा होतो तो म्हणजे - मानसिक स्वास्थ्य उत्तम रहाणे. अर्थात हे जर चांगले सहकारी मिळाले आणि बाँडींग झालं तरच. परस्पर-संबंध (सोशल इंटरॅक्शन) ही अर्थातच दुधारी तलवार असते. "वळलं तर सूत नाही तर भूत" असे सहकारी देखील क्वचित मिळतात. पण प्रत्येक संबंधामधून सामाजिक पैलू (सोशल नॉर्म्स) हे शिकायला मिळतातच मिळतात.
समाजात वावरताना, आपल्या नकळत आपण समोरच्या व्यक्तीला जोखत, मापत असतो, त्याचवेळेला तिचे चांगले गुण आत्मसात करत असतो, वाईट गुणांवर शिक्कामोर्तब करून त्या व्यक्तीचे गुणांकनही करत असतो. खरच आपला मेंदू या सर्व क्रिया एकाच वेळी, भरभर, सुसूत्र रीतीने पार पाडत विधायक कामात गुंतून रहातो ही मोठी नवलाची गोष्ट नाही का?
आज हे सर्व आठवण्याचं कारण आज, एकीचा वाढदिवस आम्ही साजरा केला. तिने आम्हाला पार्टी दिली वगैरे वगैरे पण त्याहूनही- आज अजून एका मैत्रिणीच्या मुलीला डिसलेक्सिया आहे ही बातमी कळली. अनेक महीन्यांनी ही मैत्रिण ओपन अप झाली. तिचे हे दु:ख ऐकून आम्हाला खूप वाईट वाटले. पण अर्थात तिला बोलायला तर आम्ही आहोत हाच त्यातल्या त्यात दिलासा. दुसर्या एकीला मूलच नाही. तिला हवं आहे पण होत नाही. प्रत्येकीचं काही ना काही.
तर असे हे निकटचे स्नेहसंबंध, अपल्या गरजेचे आणि कामाच्या ठिकाणी सहज रीत्या फलद्रूप होणारे. प्रत्येकालाच याची गरज असते नाही का?
वाचने
7092
प्रतिक्रिया
32
मिसळपाव
प्रतिक्रिया
हो ग्...शुचि छान लिहिलयस. आणि
अगदी खरंय!! आपण आपल्याही नकळत
अनुभवाचे गाठोडे
केवढी गरज असते व्यक्तीला
सामंतकाकांची उणीव भरुन निघत
+१
In reply to सामंतकाकांची उणीव भरुन निघत by अवलिया
+१ & -१
In reply to +१ by टारझन
+२
In reply to +१ by टारझन
शुचे मस्त लिहितेस ग
नाना कडे ????
चांगलं लिहिलं आहेस शुचि.
लेख चांगला.
नॉडीरिडींग ~!!! ;-)
In reply to लेख चांगला. by गवि
माणसांच्या मनाची कवाडे बंद झाली..
कैच्याकैच उदाहरण
In reply to माणसांच्या मनाची कवाडे बंद झाली.. by योगप्रभू
मला जे वाटलं ते सांगितलं...
In reply to कैच्याकैच उदाहरण by ३_१४ विक्षिप्त अदिती
प्रसंगाच्या वर्णनावरून मला जे सुचलं तेच मी पण लिहीलं.
In reply to मला जे वाटलं ते सांगितलं... by योगप्रभू
छान लिहिलयस शुचि
बरोबर आहे
लकी
कार्यालयात
+१ कीतने अजीब रेश्ते है यहाके..
In reply to कार्यालयात by ५० फक्त
ईमोशन आणि प्रोफेशन ह्यामध्ये
ती चैन नाही हो परवडत इथे
In reply to ईमोशन आणि प्रोफेशन ह्यामध्ये by रन्गराव
हे लक्षातच नाही आलं. असो
In reply to ती चैन नाही हो परवडत इथे by शुचि
सोनं - २१०००/-
In reply to ती चैन नाही हो परवडत इथे by शुचि
पटलं.
In reply to ईमोशन आणि प्रोफेशन ह्यामध्ये by रन्गराव
लेख आवडला. शुचिताई छान
ह्म्म... हल्ली चांगले मित्र
व्वा! बाणा. मस्त लिहीलं
+१
In reply to व्वा! बाणा. मस्त लिहीलं by स्वानन्द
सहमत. मी तर म्हणतो सोनेरी
In reply to +१ by टारझन