आई .. मिटलेला श्वास.. १२
लेखनविषय:
आई .. मिटलेला श्वास..११
नदीचा सुन्न किनारा
पाणी वाहतेय जपून
ओल्या हिरव्या तनांवर
निळसर घाव थबकून
चांदणे हरवलेली
सुनी खिन्न गर्भरात
प्रतिबिंबित गहिरा रंग
मनावर काळसर
रंगहीन स्वप्नांचा
धुसर स्तब्ध प्रवाह
दिशाहीन नेत्रनजर अन
निशब्द आठवांचे काहूर
- शब्दमेघ
वाचने
1145
वाचनखूण
प्रतिक्रिया
1
चांदणे हरवलेली सुनी खिन्न