चोरटा मुरारी - गौळण
लेखनविषय:
चोरटा मुरारी - गौळण
शिंके हा तोडी, माठ हा फ़ोडी
सांगा याला कोणी
कान्हा रे माझ्या माठात नाही लोणी... ॥धृ०॥
शेला पागोटा काठी हातात
अवचित येवुनिया घुसतो घरात
खिडकी हा तोडी, काचा हा फ़ोडी
बांधा याला कोणी
कान्हा रे माझ्या माठात नाही लोणी... ॥१॥
यमुनेचा चोरटा, मथुरा मुरारी
पकडाया जाता, होतो फ़रारी
चव हा चाखी, ओठ हा माखी
टांगा याला कोणी
कान्हा रे माझ्या माठात नाही लोणी... ॥२॥
व्दारकेचा व्दाड, ऐकेना कुणाशी
अरविंद मागे लोणी, हरी चरणाशी
कमरेशी बांधा, पायाशी टांगा
कोंडा याला कोणी
कान्हा रे माझ्या माठात नाही लोणी... ॥३॥
गंगाधर मुटे
............................................................
१९८०-८५ च्या सुमारास लिहिलेली गौळण
...........................................................
वाचने
3015
वाचनखूण
प्रतिक्रिया
11
वा! मस्तच!
मस्तच वाटले गीत गायला .. आताच
सुंदर आहे गवळण! खिडकी हा
In reply to सुंदर आहे गवळण! खिडकी हा by प्राजु
धन्यवाद
निषेध
In reply to निषेध by नितिन थत्ते
घ्या उठाव.
In reply to घ्या उठाव. by गंगाधर मुटे
गंगाधर सायेब दिलपे मत लेयो.
मागच्या ही गौळणीत ' अरविंद'
धन्यवाद.
गौळण छानच! पण द्वारकेचा
In reply to गौळण छानच! पण द्वारकेचा by राघव
खरेय