ही नैराश्यावर मात करण्याची लढाई कधी संपत नाही. नैराश्याचा विषाणू निरनिराळ्या प्रकारे वेष बदलून हल्ले करत राहतो. त्यासाठी निरनिराळे डावपेच लढवत रहावे लागतात.
नैराश्य हा सर्वांनाच ग्रासणारा विषय आहे. पण तरुण वयात हा विषय आलेला दिसला की...
माझी एक शेंडेफळ भाची आहे. बी एस सी बायो-टेक्नॉलॉजी करून आता एम सी ए करते आहे.
ही मुलगी ठरवले की करणारी आहे, असे मी पाहतो आहे. पण कधी कधी तिला निराश वाटते.
नुकत्याच एका परीक्षेनंतर तिने असे विचार प्रकट केले. त्यावर मी तिला उत्तर लिहिले. हे उत्तर लिहिल्यावर मला वाटले की कदाचित यातले काही भाग सगळ्यांनाच उपयोगी पडतील म्हणून ते येथे देतो आहे. शिवाय हे उत्तर मलाच परिपूर्ण वाटले नाही. यात अजून भर घालायला हवी आहे असेही वाटले.
आशा आहे की, तरुण वयातले नैराश्य या विषयावर येथे चर्चा होईल.
पत्रोत्तरातला हा सल्ला तुटक वाटण्याची शक्यता आहे पण तुम्ही समजून घ्याल ही आशा आहे.
---
प्रिय दीप्ती,
परिक्षा चांगली आणि वाईट गेल्याची तुझी मेल वाचली. असे दिसते आहे तू अभ्यास चांगला केला होता. अवघड विषयांचे चार्टस वगैरे बनवले होते म्हणजे तू तुझ्याकडून उत्तम प्रयत्न केला होतास. पण परीक्षेत जंबलींग झाले. याचा अर्थ असा की. तू त्याला फायनल टच दिला नसावा. - म्हणजे परीक्षेत तू हे कसे लिहीशील याचा विचार बहुदा केला नव्हता? मला वाटते की येथे अभ्यासापेक्षा परीक्षार्थी होणे जरुरीचे आहे. जुने पेपर्स आण आणि घड्याळ लाउन घरीच पेपर्स दे! परीक्षेला बसण्याच्या वातावरणाची सवय व्हायला हवी.
पेपर्स चांगले न जाण्याचे एक कारण तुला सापडले आहे ते म्हणजे, तुला परीक्षेत सिनेमाचे डायलॉग आठवत होते!
परीक्षेमध्ये जब वी मेट चे डायलॉग आठवण्यात काही गैर नाही. मलाही नेहमी असे होते - व्हायचे. मॅट्रीकच्या परीक्षेला मला किशोर कुमारचा हाफ टिकट सिनेमा आठवत होता. म्हणजे चक्क स्टार्ट टू एंड डोळ्यासमोर दिसत होता! आपला मेंदू ताण बाजूला ठेऊन रिलॅक्स होण्याचा प्रयत्न करत असतो. हा त्याचा परिणाम होता. परीक्षेचा ताण असणार - कदाचित तुला जाणवला नाही तरी असेलच!
मग यावर उपाय काय?
एक प्रश्न स्वतःला विचारायचा - माझे मन मला आता नक्की काय सांगते आहे?
जब वी मेट चे डायलॉग हे बाह्य स्वरूप झाले. पण मनाकडून येणारा नक्की मेसेज काय आहे?
मेसेज हा की, " बापरे परीक्षा चालली आहे. मला काही धड आले नाही तर?
मी परीक्षेत नापास झाले तर? एम सी ए पूर्ण झाले नाही तर...? आई ... बाबा? मामा काय म्हणेल...? आज्जी ला काय वाटेल...? माझे कसे होईल?"
म्हणजे मूळ मुद्दा नक्की काय आहे? इन सिक्युरीटी आहे का?
आपले मन आपल्याला काय सांगते आहे हे उलगडून पाहिले तर बरेचदा ताण गायब होतो.
कारण आपण त्या ताणाच्या कारणाच्या मुळाशी पोहोचतो!
आता मी तुला काही मंत्र देणार आहे. मला या मंत्रांचा नेहमीच उपयोग झाला आहे.
- अभ्यास करतांना म्हणायचा मंत्र "मी जे वाचते आहे ते मला परीक्षेत १००% आठवणार आहे"
- परीक्षेला जातांना म्हणायचा मंत्र "मला ही परीक्षा उत्तम जाणार आहे. मला योग्य वेळी सगळे निश्चित आठवेल"
- परीक्षा झाल्यावर म्हणायचा मंत्र " मी माझ्या कडून शक्य ते केले. आता जे होईल ते होईल - स्साला गेला उडत!"
- सगळे पेपर्स पुर्ण झाल्यावर म्हणायचा मंत्र "आता जे होईल ते होईल नापास तर नापास! हु केअर्स? स्साला चोच दिली आहे तर चारा पण देईलच!"
वाचने
4780
प्रतिक्रिया
30
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान
धन्यवाद
नैराश्य / फस्ट्रेशन कोणाला
जाताजाता :--- हे जग जर
In reply to नैराश्य / फस्ट्रेशन कोणाला by मदनबाण
जग जर गुंता असेल तर? तर त्या
In reply to जाताजाता :--- हे जग जर by विजुभाऊ
पत्र आवडले. अवांतर: मला आधी
धन्यवाद ,
गुंडोपंत
पंतांनु पत्र एकदम झ्याक हो
<<आपला तर एक एकदम साधा फंडा
In reply to पंतांनु पत्र एकदम झ्याक हो by परिकथेतील राजकुमार
नोकरी नसल्याने जमतंय असं करा
In reply to <<आपला तर एक एकदम साधा फंडा by शिल्पा ब
ते आणि कशाला? आम्हीसुद्धा
In reply to नोकरी नसल्याने जमतंय असं करा by परिकथेतील राजकुमार
अरे रे ! काय हे परावलंबी
In reply to ते आणि कशाला? आम्हीसुद्धा by शिल्पा ब
काय हे परावलंबी जिवन... चालु
In reply to अरे रे ! काय हे परावलंबी by परिकथेतील राजकुमार
तुम्ही कोण सहानुभुती देणारे?
In reply to अरे रे ! काय हे परावलंबी by परिकथेतील राजकुमार
मराठी माणुस
In reply to ते आणि कशाला? आम्हीसुद्धा by शिल्पा ब
पर्या : काही भांडवल लागले तर
In reply to मराठी माणुस by कुंदन
काय रे वनमानवा ? टारावलंबी
In reply to पर्या : काही भांडवल लागले तर by परिकथेतील राजकुमार
तू काय
In reply to पंतांनु पत्र एकदम झ्याक हो by परिकथेतील राजकुमार
सुंदर
+१ सुरेख !
In reply to सुंदर by नितिन थत्ते
+२
In reply to +१ सुरेख ! by अवलिया
जमलंय
आवडल तुमच पत्र अन उहापोह!
हे पिक्चरचे डायलॉग ना..
माफक प्रमाणात नियमित
kalyani B आणि मन्द्या all the
अवांतर....
In reply to kalyani B आणि मन्द्या all the by गुंडोपंत
अं...?
In reply to अवांतर.... by सूर्यपुत्र
पत्र आवडले