नमसाकर मित्रांनो/मैत्रीणींनो..
बरेच दिवस म्हणजे खरंतर मिपाचा सदस्य झालो, तेव्हापासुन हा विषय मनात घोळत होता; आज म्हणलं लिहुन टाकु..
साधारणपणे वय वर्षे १४-१६ पासुन आपल्या मनात किशोरसुलभ भावना यायला सुरवात होते, म्हणजे ते साहित्यीक वगैरे जे शब्द वापरतात ना, मोरपंखी इ. तश्या. पण आपण नक्की ठरवु शकत नाही की आपल्याला नेमकं कोण आवडतंय ते.. म्हणजे त्या वेळेला सर्वच भिन्नलिंगी (आणि समवयस्क) लोकसंख्या आपल्याला आवडत असते अस म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. दर १५ दिवसांनी आपण प्रेमात पडत असतो.. पण सहसा ते फक्त आर्कषण असतं.
पण जस जसे आपण मोठे व्हायला लागतो तेव्हा आपल्या भावना, स्वत: आणि इतरांबद्दलची जाणीव तीव्र होते. तारुण्याचे गुलाबी रंग देखील आपल्या मनात फुलत असततात, ज्याला शास्त्रज्ञ मंडळी संप्रेरक म्हणतात. सहसा आपण आपल्या सामाजिक व मानसिक पात्रतेला शोभुन दिसेल अशी व्यक्ती साथीदार (पार्टनर) म्हणुन निवडतो.
पण प्रेमाची ही प्रोसेस दरवेळेला अशी मुद्देसुद असेलच असं नाही, म्हणुन काही प्रश्न आपल्या समोर उभे राहतात:
१.किती तरी असे लोक असतात त्यांची एकंदर बौद्धिक/मानसिक पात्रता, अवस्था पाहिली तर तारुण्यसुलभ भावना वगरे तर दुरच राहिलं, साधी आपुलकी पण आपल्याला वाटत नाही. पण ते कमिटेड असतात.
अतिसामान्य मुलांना गर्लफ्रेंडस कश्या मिळतात? अतिसामान्य मुलींना बॉयफ्रेंडस कसे मिळतात?
२. या उलट कितीतरी लोक इअतके हुशार, चारित्र्यसंप्पन्न असतात की त्यांच्यांत नाव ठेवायला जागा शोधुन सापडत नाही. पण बिच्यार्यांना तसं कोणी भेटतंच नाही.. शेवटी मग कांदेपोहे नामक सण किमान २-३ वेळा तरी साजरा करणे यांच्या नशीबी येते.
इतके ऑलराऊंडर लोकं का सिंगल राहतात?
३. यशस्वी प्रेम प्रकरण म्हणजे काय?
४. ज्या दुर्दैवी जीवांचा कधी ब्रेक ऑफ होतो, त्यांना खाजगीत 'कॅरेक्टरलेस' हे लेबल का लावले जाते?
५. माननीय मिपाबांधवांचे या बाबतीत काय अनुभव आहेत? आयुष्याचा जोडीदार कांदेपोहे खाऊन ठरवणे योग्य की स्वत: ठरवुन?
वरील मुद्द्यांना अनुसरुन चर्चा करण्याची मी विनंती करतो.
वाचने
10765
प्रतिक्रिया
41
मिसळपाव
प्रतिक्रिया
सिंगल रहाण्यामागे २ कारणं
>>सामान्य मुलामुलींना जोडीदार कसा मिळतो?>> हा प्रश्न नाही आहे
In reply to सिंगल रहाण्यामागे २ कारणं by शुचि
वाह! वाह!
In reply to >>सामान्य मुलामुलींना जोडीदार कसा मिळतो?>> हा प्रश्न नाही आहे by वाहीदा
इंट्या धागा वाचला रे मित्रा.
+१
In reply to इंट्या धागा वाचला रे मित्रा. by परिकथेतील राजकुमार
+२
In reply to +१ by अवलिया
हार्मोन्स्चं सोड, बट, डेविल
In reply to +२ by टारझन
छान रे इंत्या ..... एकदम
अनुभवी सदस्य म्हणजे काय? जे
सिंगलत्व... जोरदार शब्द..
In reply to अनुभवी सदस्य म्हणजे काय? जे by विजुभाऊ
जे बरीच वर्षे सिंगल राहीलेत
प्रेमाची प्रोसेस? प्रत्येक
खरे आहे..प्रेमाचे गणीत
आयला...
अतिसामान्य...
अल्पमती ध्येयहीन? कसं व्हायचं
In reply to अतिसामान्य... by सूर्यपुत्र
त्याचे काय आहे माहीतीये का....
In reply to अल्पमती ध्येयहीन? कसं व्हायचं by शिल्पा ब
मँगल्ड
प्रेम!
पर्फेक्ट उपमा!
In reply to प्रेम! by पिवळा डांबिस
संप्रेरके
एवढीच माहिती हवी आहे
काही प्रश्नांची उत्तरे...
In reply to एवढीच माहिती हवी आहे by स्पा
स्वतः सिंगल नसलेले लोक
इंट्या
आणि अजून...
In reply to इंट्या by पैसा
तसंच, एखादं जोडपं केवळ सर्व
In reply to इंट्या by पैसा
हे प्रश्न इचार्ताय म्हंजी..
सामान्य?
१.अतिसामान्य मुलांना
हेच म्हणते!
In reply to १.अतिसामान्य मुलांना by रेवती
प्रत्येकाची
माझे मत...!
Smart Man + Smart Woman =
लय भारी
In reply to Smart Man + Smart Woman = by कानडाऊ योगेशु
इंद्राभौंनी इतकं नीट लिहीलंय,
आभारप्रदर्शन
Gift of the gab
वावा.. साधकबाधक चर्चेमुळे
माझा अतिशय आवडता धागा!
५. माननीय मिपाबांधवांचे या