योगसाधना कुणाकडून आली आहे?
In reply to व्हरमाँट च्या चर्च स्ट्रीटवर by शुचि
बुद्ध धर्माचे म्हणाल तर , बुद्ध स्वतः हिंदू होता. पुढे त्याने नवा धर्म वाढवला. तेव्हा बुद्ध धर्माचा पाया हा हिंदू धर्मातच आहे असं मला वाटतं.पाकिस्तानचे म्हणाल तर, मुहम्मद अली जीना हे स्वतः हिंदुस्थानी होते. पुढे त्यांनी नवा देश स्थापन केला. तेव्हा पाकिस्तानचा पाया हा हिंदुस्थानातच आहे, असे म्हणता येईलही कदाचित. (आणि per se त्यात निश्चित काही चूक आहेच, असेही नाही.) मग? आज या विधानाला काही अर्थ, त्याचा काही उपयोग आहे का? 'तुम्ही' भले काहीही म्हणा, 'त्यांना' जर 'तुमच्या'बद्दल 'एकत्वा'ची तर जाऊचद्या, 'बंधुत्वा'/'ममत्वा'चीही सोडा, पण 'समान पाया'चीही भावना नसेल, तर 'तुमचे' म्हणणे कोणत्या भावाने? हां, आता 'त्यां'च्या प्रतिदाव्यांना 'तुम्ही' किती भाव द्यायचा, हा पूर्णपणे वेगळा मुद्दा आहे. पण 'ते'ही 'आमच्या'तूनच उद्भवलेले (पक्षी: 'आमच्या'तलेच, किंवा 'आमच्या'सारखेच), अशा मूर्खांच्या नंदनवनात राहून आपलीच फसवणूक करण्याचेही काही कारण दिसत नाही. ('त्यां'नाही 'तुमच्या'बद्दल तशाच भावना आहेत का? आणि का असाव्यात? 'त्यां'च्याबद्दल - फरकांसहित - आदर राखणे ही एक गोष्ट. पण 'त्यां'ना 'तुमच्या'तलेच मानणे ही 'तुमची'च एकतरफी मानसिक गरज तर नाही ना? असली पाहिजे का? का असावी?)
In reply to मूळ आसने पेटंट करू नये by धनंजय
In reply to मूळ आसने पेटंट करू नये by धनंजय
In reply to मूळ आसने पेटंट करू नये by धनंजय
मूळ आसने पेटंट करू नये.यातील मूळ शब्दाची व्याख्या काय? भारतात सर्वत्र एखादे आसन विशिष्ट पद्धतीनेच शिकविले, केले जाते का? कारण, येथील युक्तिवादानुसार त्यात थोडे जरी बदल असतील तर मूळ कोणते मानायचे? किंवा त्यासाठी काही प्रमाण ग्रांथीक आधार आहे का? हा प्रश्न जिज्ञासेपोटी विचारलेला आहे. आव्हानात्मक सूर नाही.
In reply to व्याख्या by श्रावण मोडक
In reply to व्याख्या by श्रावण मोडक
In reply to लै भारी मुद्दा! आता मी एक by अवलिया
आता मी एक काम करतो, योगासनाचा क्लास काढतो. अंगठा आणि बोटाने नाक बंद करुन प्राणायाम करण्याऐवजी कपडे वाळत अडकवायचा चिमटा नाकाला लावुन प्राणायम, योगासने असे क्रियेचे स्वरुप ठेवतो. पेटंट घेतो. हाय काय अन नाय काय ! कसे ?हाहाहाहा... घेतो? अहो, घ्या. मिळेलही. कारण इथं चिमटा आलाय. म्हणजे ही योगसाधना निव्वळ शारीर न राहता थोडी आर्टिफिशियल - मेकॅनिकल अशी झालेली आहे. एकूण इम्प्रोव्हायजेशन झालेलं आहे परंपरागत ज्ञान किंवा विद्येचं. त्यामुळं पेटंट मिळेलही. (हे गांभीर्याने लिहिले आहे. कारण हे शक्य आहे.) आता यालाच थोडी तात्विक - अध्यात्मिक जोड देऊया. या प्राणायामातून मानसीक शांती-समाधी कशी मिळते त्याची. बास्स. या क्लासच्या कोचिंग क्लाससारख्या शाखा दिसू लागल्या मला तरी... :) (हे ह.घ्या.) माहिती काढू का तपशिलांची? टक्केवारी बोला... ;) (गंभीर मोड) आता बाकी खवत बोलू. धागा योगासनांपुरताच राहू द्यावा म्हणतो...
In reply to व्याख्या by श्रावण मोडक
In reply to GI by सुनील
थोडक्यात Final Product की Procedure देखिल?अगदी... योगासने किंवा एकूणच पारंपरिक (सरसकट पौर्वात्य म्हणूया का?) ज्ञान किंवा विद्यांसंदर्भात हे द्वैत कितपत, आणि खोलवरचे, आहे हेही तपासण्याजोगे. कारण, अशी प्रोसिजर वेगळी आणि प्रॉडक्ट वेगळे अशा स्वरूपाची द्वैतात्मक मांडणी असावी, असे एकूण तत्वज्ञान (इथं मी द्वैत किंवा अद्वैत तत्त्वज्ञान याविषयी बोलत नाहीये, तर त्या त्या परंपरागत ज्ञान किंवा विद्या यांच्या तत्वज्ञानाविषयी बोलतोय) पाहता वाटत नाही. या दोन्ही गोष्टी त्या विषयात अंगभूतपणे एकच मानल्या असाव्यात असे दिसते. ज्ञानी सदस्य काय लिहितात ते वाचायचे आहे. जीआयचा मुद्दा विचारात घेण्याजोगा. :)
In reply to माझ्या मते by श्रावण मोडक
In reply to प्रायर आर्ट by धनंजय
In reply to मुदत by श्रावण मोडक
In reply to मूळ आसने पेटंट करू नये by धनंजय
नाहीतर याचा अतिरेक केला तर संख्यांचे आकडे "हिंदू" आहेत म्हणून संगणकाचे पेटंट नाकारावे लागतील!द्विचिन्ह पद्धतीचे मूळ "हिंदू" आहे??? त्यामुळे (बाकी चालू द्या, पण) या दाव्यात तरी फारसा दम राहीलसे वाटत नाही. (चूभूद्याघ्या.)
In reply to जग बदलयं... इथे ज्ञानाच्या by मदनबाण
In reply to संग्रह by बेभान
In reply to वाचत आहे.... मेकॉले आणि by अवलिया
In reply to ठराविक by नितिन थत्ते
In reply to वाचत आहे.... मेकॉले आणि by अवलिया
In reply to संबंध मुळीच कळला नाही by धनंजय
आणि आपण इकडे अतिशय वेगाने प्रगती करत आहोत ही दुर्दैवाची पण खरी गोष्ट आहे.
हं पेटंट वगैरे याला विरोध झालाच पाहीजे. पण ना ज्ञानेश्वरांनी ना पतंजलीनी आम्ही जे काही दिले आहे ते फक्त ठरावीक या धर्मासाठीच उपयुक्त आहे असे कुठेही सांगीतले नाही.
जसे मनात आले तसे लिहीले. लेखनात ब-याचवेळा भरकटल्याबद्दल क्षमस्व..!!
[चांगले वागणे, चांगले असणे, सुसंकृत असणे हा कुठल्याही जातीचा, धर्माचा, देशाचा मक्ता नाहीये. सर्व जातीत, धर्मात, देशात चांगली माणसे आहेत, नीचसुद्धा आहेत. गुणाला गुण म्हणताना मन मोठे करायला हवे. दोषाला दोष देतानाही हिंमत दाखवायला हवी! 'जातीसाठी माती खावी' या म्हणीसारखा आपल्या जातीच्या लोकांचा वाईटपणा झाकून ठेवण्याचा दांभीकपणा आणि हिनपणा कुठेही नसेल.]
रोजच्या व्यवहारात, म्हणजे जर तुम्ही आम्ही कुठे योगासाधना करायाला जात असलो, एकत्रित येत असलो तर बोलायची गरज देखील नाही. पण जर कोणी चुकीची माहीती देऊ लागले अथवा कोणी आपण्हून माहीती विचारली तर उत्तर देताना काचकूच करायची गरज आहे का? अशा वेळेस आपण योगसाधनेचे मूळ हिंदू संस्कृतीत आहे असे म्हणणे (जे आधी कधी म्हणायची गरज भासली नाही) हे आपल्याला योग्य आणि महत्वाचे वाटते का? का त्याची काही गरज नाही असे वाटते? का हे overt intellectual property theft वाटते?आज भारतात 'तुमच्या अमेरिकन पिझ्झासंस्कृती'च्या नावाने खडे फोडणारे महाभाग पुष्कळ सापडतात. (नाही सापडत?) आता रोजच्या व्यवहारात, म्हणजे जर तुम्ही आम्ही कुठे पिझ्झा खायला जात असलो, एकत्रित येत असलो तर बोलायची गरज देखील नाही. पण जर कोणी चुकीची माहीती देऊ लागले अथवा कोणी आपण होऊन माहीती विचारली (अथवा कोणी खडे फोडू लागले), तर उत्तर देताना काचकूच करायची गरज आहे का? अशा वेळेस आपण 'पिझ्झ्याचे मूळ इतालियन संस्कृतीत आहे' असे ठणकावून सांगणे (जे आधी कधी म्हणायची गरज भासली नाही) हे आपल्याला योग्य आणि महत्त्वाचे वाटते का? का त्याची काही गरज नाही असे वाटते? का हे overt intellectual property theft वाटते?
बर्गर संस्कृती असुंदेत अथवा आयपॉड संस्कृती, ती विश्व व्यापणार असे किमान गेल्या शतकापासुनचे पुढच्या काही शतकांपर्यंतचे तरी चित्र रहाणारच आहे. म्हणजे आज अमेरिकन्स म्हणतात म्हणून उद्या तुम्ही आम्ही देखील "योगा योगा " करत नकळत मुळं विसरणारपिझ्झासंस्कृतीचे असेच नाही काय? म्हणजे आज आम्ही अमेरिकन्स म्हणतो म्हणून तुम्ही देखील "पिझ्झा पिझ्झा" करत नकळत (इतालियन) मूळ विसरणार... (सोनियाचे नव्हे (काश!). पिझ्झ्याचे.) मग अशा वेळी इतालियनांनी बोंब मारायची, की (शेवटी पिझ्झ्याची मूळ कल्पनासुद्धा मार्को पोलोने की कोणीशीशी चिन्यांकडून उचलली, म्हणून) चिन्यांनी? पिझ्झा मुळात कोणाचा का असेना, आज त्याचा जगभर प्रसार, लोकप्रियता, फार कशाला, निकटची ओळख कोणामुळे आहे? डॉमिनोज़, पिझ्झाहट वगैरे असल्याच मंडळींमुळे ना? मग 'कोणाचा आहे' याने फरक काय पडतो? (फार कशाला, हल्लीच्या दिवसांत क्रिकेटचा खेळसुद्धा हिंदुस्थानइतका इतर कुठे प्रस्थापित नसेल. आजकाल जगभरचे खेळाडू येऊन हिंदुस्थानातल्या लीग्ज़मध्ये खेळू पाहतात. पूर्वी आपले देशी खेळाडू इंग्लिश कौंटीज़च्या वतीने खेळू पाहात, तसे. मग आता साहेबाने बोंब मारावी काय, की 'आमचा' खेळ या इंडियनांनी ढापला म्हणून?) शेवटी एखाद्या गोष्टीचा खप जो सर्वाधिक घडवून आणतो, तो त्याचे श्रेय घेणारच. मग भले ती गोष्ट बनवलेली कोणी असो. इतालियनांच्या मते डॉमिनोज़चा पिझ्झा भलेही 'त्यांच्या' पिझ्झ्यापुढे सबस्टॅंडर्ड असेल. (आणि ते मत योग्यही असेल बहुधा.) पण इतालियनांचा आपल्या या 'चीज़'वस्तूचा खप जगभर वाढवण्यात जोपर्यंत फारसा हातभार नसेल (आणि उलट डॉमिनोज़चा तो असेल), तोपर्यंत इतालियनांनी हवे तर 'ह्यँ:! आमच्या पिझ्झ्याची सर त्या डॉमिनोज़च्या पिझ्झ्याला कध्धीकध्धी येणार नाही! शेवटी तेथें पाहिजें जातीचें!' असे भले ('तुई मुख फुटे तोर मोनेर कोथा अॅकला बोलो रे'च्या धर्तीवर) तोंड फाटेस्तोवर जगाला सांगावे आणि आपलीच (पाठ) थोपटून घ्यावी. पण त्यांना रडण्याचे काहीच कारण नाही. (आणि इतालियनांना कधी रडताना ('हे अमेरिकन्ज़ घाऊक भावात पिझ्झे खायला लागल्यापासून मोत्झारेलाचे भाव अवाच्यासवा वधारले!' किंवा 'डॉमिनोज़ने ताबा घेतल्यापासून पिझ्झ्याची पडझड सुरू झाली', वगैरे वगैरे) पाहिलेलेही नाही. ते आपले शांतपणे आपला तो काय तो पिझ्झा-पाष्टा वगैरे खातात, ती कियांती की काय ती पितात, आणि एकंदरीत मजा करतात*. ते डॉमिनोज़ वगैरे सगळे जाऊ द्यात तेल लावत - तेल ऑलिवचे, की आणखी कसले, हा प्रश्न गौण आहे.) निदान, डॉमिनोज़ / पिझ्झा हट वगैरे मंडळी जोपर्यंत पिझ्झ्याचेच पेटंट घेऊन इतालियनांच्या पिझ्झा बनवण्यावरच घाला घालत नाहीत, तोपर्यंत त्यांनी का रडावे? तसे काही होऊ लागले, तर विरोध अर्थातच समजण्यासारखा आहे, नव्हे योग्यच आहे. पण सहसा डॉमिनोज़ पिझ्झ्यावर पेटंट घेत नाही, फार फार तर डॉमिनोज़ बनवत असलेल्या एखाद्या विशिष्ट क्रस्टवर नाहीतर घटकांच्या प्रमाणाच्या फॉर्म्युल्यावर / रेसिपीवर घेते. आणि तस्सा क्रस्ट / तश्शी रेसिपी जर कोणा सुगरणीने / बल्लवाने कधी योगायोगाने घरी बनवलीच, आणि आलेल्या पाहुण्यांना कधी खाऊ घातलीच, तर त्याला बहुधा काही अडचण येत नसावी. म्हणजे याचा अडथळा जर कोणाला आलाच, तर व्यापारी तत्त्वावर ती वस्तू (पिझ्झा / विशिष्ट क्रस्ट / विशिष्ट रेसिपी) बनवून विकून नफा कमावू पाहणारास यावा. अर्थात असा अडथळाही आक्षेपार्ह आहेच, नाही अशातला भाग नाही. शेवटी कोणाकडून लुबाडले जायचे (आणि लुबाडणारा देशी असावा की विदेशी) याचा निवाडा करण्याचा हक्क ग्राहकाजवळ असलाच पाहिजे. आणि लुबाडणार्यांमधील पर्याय जितके कमी, तितकी ग्राहकाची लुबाडणूक अधिक होण्याची शक्यता जास्त (एकाधिकारशाही घातक!), हे अर्थशास्त्रीय तत्त्व येथे लागू आहेच. याबद्दल वाद नाही, आणि म्हणून असे काही घडत असेल तर त्याचा विरोध झालाच पाहिजे. मात्र, याव्यतिरिक्त येणारे 'श्रेय कोणी घेतले', 'राष्ट्रीय अस्मिता' वगैरे मुद्दे अतिशय गौण आहेत, असे वाटते. (तसेही, आज अमेरिकन्स जर आपलाच असल्याच्या थाटात सर्रास पिझ्झा खात असतील, तो खाताना 'परकीय संस्कृतीचे अतिक्रमण' वगैरे विचार आमच्या मनाला शिवत नसतील, या असल्या 'म्लेंच्छांच्या पाककृती'चे आमच्या अन्नातून उच्चाटन करून** त्या जागी 'मेफ्लॉवर'वरील पिल्ग्रिमांच्या कोण्या अज्ञात रेशिपीचे ओढूनताणून पुनरुज्जीवन करू पाहणारी एखादी 'अन्नशुद्धी चळवळ' काढावीशी आम्हांस वाटत नसेल, नव्हे हा पदार्थ मुळात कधीतरी 'परकीय' होता याची आठवणही येत नसेल, इतका जर तो आमच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग होऊन गेला असेल, तर तो मुळात कोठूनही आलेला असो, तो अमेरिकनच. इंग्रजी भाषेसारखा. मग भले आमच्या अंगीकारण्याने त्याचे मूळ स्वरूप - पुन्हा इंग्रजी भाषेसारखे - पूर्णपणे पालटले, तरी - किंवा कदाचित म्हणूनच - तो आमचा. इतालियनांना पिझ्झा, इंग्रजांना इंग्रजी भाषा आणि भारतीयांना/हिंदूंना योग वगैरे आपली मालमत्ता वाटत असेल, तर वाटो बापडी. तो त्यांचा प्रश्न आहे - त्याच्याशी आम्हाला काहीही देणेघेणे नाही. तसेही आमच्या गोष्टी आम्ही त्यांच्याशी शेअर करू की, आम्हाला वाटले तर... ;-) 'आसिंधुसिंधुपर्यंत**** अमेरिकन जे काही चरतात, ती अमेरिकन खाद्यसंस्कृती' अशी आमची बॉ 'सांस्कृतिक अमेरिकनत्वा'ची - खाद्यापुरती तरी - साधीसोपी व्याख्या आहे.) =================================================================== तळटीपा: * असे निदान आपले तरी बॉ इंप्रेशन आहे - चूभूद्याघ्या. तज्ज्ञांनी खुलासा करावाच. पण एकंदरीत अतिशय छान लोक, असे वाटते. (पुन्हा चूभूद्याघा.) ** मेक्सिकन स्थलांतरित मंडळी आमच्या देशात घुसलेली आम्हांस खपत नसतीलही कदाचित***, पण मेक्सिकन जेवणाशी आमचे वाकडे नाही. सर्रास आणि आवडीने हादडतो. *** (म्हणजे, मला व्यक्तिशः काहीही अडचण किंवा आक्षेप नाही, पण अनेक अमेरिकनांना खपत नाही. अनेक महाराष्ट्रवासीयांना महाराष्ट्रात बिहारी घुसलेले खपत नाहीत ना, अगदी तस्से! असो.) **** यातील दोन सिंधु हे अनुक्रमे प्यासिफिक आणि अतलान्तिक महासिंधु गणावेत.
In reply to समांतर अवांतर by पंगा
In reply to हा हा by आजानुकर्ण
In reply to समांतर अवांतर by पंगा
In reply to समांतर अवांतर by पंगा
रोजच्या व्यवहारात, म्हणजे जर तुम्ही आम्ही कुठे योगासाधना करायाला जात असलो, एकत्रित येत असलो तर बोलायची गरज देखील नाही. पण जर कोणी चुकीची माहीती देऊ लागले अथवा कोणी आपण्हून माहीती विचारली तर उत्तर देताना काचकूच करायची गरज आहे का? अशा वेळेस आपण योगसाधनेचे मूळ हिंदू संस्कृतीत आहे असे म्हणणे (जे आधी कधी म्हणायची गरज भासली नाही) हे आपल्याला योग्य आणि महत्वाचे वाटते का? का त्याची काही गरज नाही असे वाटते? का हे overt intellectual property theft वाटते?मी "श्रेय" हा शब्द चर्चा प्रस्तावात,
"म्हणजे आधी हळद, मग योगसाधना आणि नंतर अजून काही करत आपले चांगल्याचे श्रेय काढून लाटण्याचे प्रकार आहेत. "- ह्या वरील वाक्यात पेटंट संदर्भात वापरला होता. आता आपला प्रतिसाद पाहूया:
शेवटी एखाद्या गोष्टीचा खप जो सर्वाधिक घडवून आणतो, तो त्याचे श्रेय घेणारच. मग भले ती गोष्ट बनवलेली कोणी असो.म्हणजे आपल्याला त्यांनी पेटंट घेणे योग्य वाटते असा अर्थ घेयचा का? तसे आपल्याला वाटत असल्यास अवश्य सांगा. अमेरिकेने पिझ्झा लोकप्रिय केला अथवा भारतामुळे क्रिकेट लोकप्रिय झाले. पण अमेरिकन्स अथवा भारतीय क्रिकेटला आम्हीच शोधले असे म्हणत नाहीत. मात्र मला, 'योगसाधनेचे मूळ हिंदूसंस्कृतीत आहे असे म्हणताना सध्याच्या लोकप्रियतेचे श्रेय अमेरिका अथवा इतरत्र अजून कोणी घेऊ नये असे वाटते', असे आपल्याला माझ्याबद्दल म्हणायचे असेल तर मात्र "आग रामेश्वरी... " असेच म्हणावे लागेल.
In reply to गो॑धळ by kamalakant samant
कधीकधी वाय एम सी ए मध्ये