खोल खोल खोली !
सहज एके दिवशी माझ्या कार्यलयातिल सहकार्र्याशी त्याच्या नवीन घराबद्दल बोलत असताना मी त्याला म्हटले, "आतल्या खोलीत कोण राहणार मग?".. तर माझ्या या प्रश्नाचे उत्तर देण्याऐवजि तो जोरात केकाटलाच! "ई..ई.. खोली काय?" मला समजेचना कि हा का ओरडला ते! मी त्याला कारण विचारले असता तो मला म्हणाला , " खोली हा शब्द मराठित फक्त पाण्याची खोली किंवा तत्सम संदर्भात वापरतात. घराच्या संदर्भात नाहि वापरत! " मग नक्कि खरे काय किंवा खोटे काय हे कळेच ना!
म्हणुनच यावर जाणकरांची कय मते आहेत, हे जाणुन घेण्यासाठी हा धागा सुरु केला आहे! तरी आपण त्यावर थोडा प्रकाश फेकुन मारावा हि विनंती . ;)
वाचने
6498
वाचनखूण
प्रतिक्रिया
28
बहुधा तुमचा मित्र वायझेड असेल.
In reply to खोली घरासंदर्भात वापरतात by वेताळ
असंच म्हणतो...
आता तुम्ही ही माहिती त्याला देऊन त्याच्या शब्दकोष वाढवा...
'आपल्याला माहीत नाही' हेच बर्याच जणांना माहिती नसतं>>
ह्या वाक्यासाठी तुमच्या मित्राचे उद्गार म्हणजे योग्य उदाहरण आहेत :)
घराला खोल्या नसतात तर काय रूम्स असतात?
In reply to घराला खोल्या नसतात तर काय by शुचि
हो, रुम्सच असू शकतात, फ्लावर (भाजी) असतो ना तसेच.
मुंबईचे चाळसंस्कृतीला सरावलेले लोक अख्ख्या घरालाच खोली म्हणतात.
"मग येऊ काय तुमच्या खोलीवर?" म्हणजे "येऊ का तुमच्या घरी?"
खोलीला खोलीच म्हणतात हो मराठीत.
आणि खोली खोल नसते काय?
आमच्या शेजार्यांच्या ग्राऊंड लेव्हलपासून खाली असलेल्या खोलीत पावसाचं पाणी शिरलं.
त्याला आत जाऊन वस्तू बाहेर काढ म्हट्लं तर तो म्हणे "खोली फार खोल आहे!"
ग्रामीण बोलीत आतल्या खोलीला मागची वढ असा एक शब्द आहे.
बैठक, दिवाणखाणा हे शब्द आहेत पण ते वेगळे.
"तुम अपने कम्रे में जाओ" हे कितीही वेळा ऐकलं तरी खोलीला कम्रा म्हणावं वाटत नाही.
घरामधे खोली असते आणि अपार्टमेन्ट मधे रूम असते ..
मी एकदा म्हणले कि, आमच्या वाडयात बरेच भाडेकरु होते ... तर लोकांना माझी भाषा सुधारण्याची गरज भासू लागली .
मित्राला या विषयातील खोली जरा कमीच दिसती आहे.
खोली यास खालील संस्कृत शब्द आहेत........
कक्षा
अवकाश
कोष्टक
कोष्ठ
कक्ष
प्रकोष्ठ
व्यचस्
निवेशन
वासगृह
हे पर्याय त्त्याला देवुन त्याची बोलति बंद करा
मी नवीन ब्लॉक घेतला तेव्हा माझी आजी म्हणाली होती "छान आहे हो तुझी खोली".. हे ऐकताना मलासुद्धा जरा कसंसंच झालं होतं! कदाचीत खोली म्हंटलं की माझ्या डोळ्यापुढे चाळीतल्या छोट्या छोट्या खोल्यांची घरं उभी राहतात त्यामुळे असेल.
घरातली लादी पुसणे ह्याला 'जागा पुसणे' हा अशाच संदर्भातला एक वाक्प्रचार. मी माझ्या बायकोच्या तोंडून ऐकला तेव्हा मला विचित्र वाटला होता.. (आता वाटत नाही.. रोज रोज "ऐकायला" लागतो ना!:) )
मित्राला "आतल्या गाळ्यात कोण राहणार मग?" असे विचारावे. किंवा "पण मी घरासंबंधी बोलत नाहीये, तुझ्या गाळ्यासंबंधी बोलत आहे" असे म्हणावे. :D
तुमचे मित्र त्यांच्या मराठी भाषेत खोलीला काय म्हणतात ?
In reply to तुमचे मित्र त्यांच्या मराठी by पुष्करिणी
तुम्ही वकील आहात काय?
महालात राहणारा तुमचा हा मित्र कदाचित दालन हा शब्द वापरत असेल! आता दालनाला खोली म्हणायचं म्हंजे कैच्या कैच, नै का!!
बापरे! तुमच्या सहकार्याचे म्हर्हाटीचे ज्ञान पाहून काय म्हणावं सुचत नाही.
असल्या माणसासाठी आम्ही आमचा बहुमोल प्रकाश का म्हणून फेकायचा?;)
In reply to बापरे! तुमच्या सहकार्याचे by रेवती
समाजसेवा करा की थोडी!!
आमच्याकडुन थोडी सेवा : म्हर्हाटी नाही तर मराठी
आता तुमची पाळी
त्याला राज ठाकरेकडे पाठवा, म्हणजे खोलीच काय आणखी बर्याच मराठी शब्दांचे अर्थ समजतील.
मिपाकरांच्या प्रतिसादांवरुन तरी हे कळतय कि 'खोली' हा शब्द घराच्या संदर्भात वापरणे चुकीचे नाहिए.
धन्यवाद!
तुमच्या त्या मित्रवर्यांना हल्ली मराठी वर्ड्स रिमेंबर करायला जरा डिफिकल्टच जात असेल. त्यामुळं असं झालं असेल गडबडीत. ;)
खोली हाच शब्द योग्य.पिटिशन ग्रँटेड.रूल अॅब्सोल्यूट .नो कॉस्ट्स.
अवांतर: खोली आणि त्यापेक्षाही रूम या शब्दांना उगीच स्कॅंड्युलस वास येतो.
माझ्या घरी येतेस? असं मैत्रिणीला विचारणं आणि
माझ्या रूमवर येतेस..
असं विचारणं.
In reply to खोली हाच शब्द योग्य.पिटिशन by गवि
माझ्या घरी येतेस? असं मैत्रिणीला विचारणं आणि
माझ्या रूमवर येतेस..
असं विचारणं.
सहमत.
In reply to खोली हाच शब्द योग्य.पिटिशन by गवि
घर आणि रूम या दोघांत बराच फरक आहे! माणस फक्त झोपण्यापुरती येतात ती रूम ! आणि जिथे संवाद आणि विचारांची देवाण घेवाण होते ते घर! :)
हा फरक मला घरापासुन लांब राहायला आल्यानंतर काही दिवसांतच कळला!
पण अर्थातच घर म्हणणे रूम म्हणण्यापेक्शा केव्हाहि चांगलेच! :)
In reply to तरीही! by स्वैर परी
"घर आणि रूम या दोघांत बराच फरक आहे! माणस फक्त झोपण्यापुरती येतात ती रूम ! आणि जिथे संवाद आणि विचारांची देवाण घेवाण होते ते घर! Smile"
शेवटी तुंम्ही कीती वेळ राहता यापेक्षा कोणाबरोबर राहता ते महत्वाच.. माझ्या नसलेल्या आमच्या हॉस्टेल "रुम" वर जी देवानघेवाण व्हायची ती पाहता मी तरी हि व्याख्या करणार नाही.
माझा एक मित्र मुलुंड्ला रहातो. तो नेहमी घराला रूम म्हणतो .
विचारताना तो विचारतो तुझा रूम किती बी एच के चा आहे.
आमच्याकडे 'खोलीवर जाणे' हा शब्दप्रयोग फारच वेगळ्या अर्थाने वापरतात.
In reply to आमच्याकडे 'खोलीवर जाणे' हा by परिकथेतील राजकुमार
तुमची भाषासुद्धा वेगळीच
सुंदर विचार .... :)
चालायचेच !!
खोली घरासंदर्भात वापरतात