एकात्म - ५ अंतीम भाग.
एकात्म भाग चवथा
एकात्म भाग तिसरा
एकात्म भाग दुसरा
एकात्म भाग पहिला
बाहेर पडलो आणि पावले आपोआप नदीकडे वळली. वाळूत बसलो आणि मागे वळून बघितले चंद्र चिंचांच्या मागून आकाशात आला होता. त्याच्या प्रकाशात पाणी चमचम करत होते.. त्या चंद्रप्रकाशात आमच्या वाड्याची काळी आकृती स्पष्ट दिसत होती. त्याच्या कडेची चिंचेची झाडे स्तब्ध उभी होती. मी पाण्याकडे पाठ करून वाड्याकडे नजर रोखली. तेवढ्यात चिंचावरून दोन तीन घारी पंख फडकवत उडाल्या. मी सिगरेट पेटवली आणि वाळूत रेघा मारत विचार करत होतो.
काय करावं......................................
विचार करून करून डोकं फुटायची वेळ आली होती तेव्हा. तेथेच वाळूत कलंडलो. डोळे मिटले. उघडले तेव्हा चंद्र डोक्यावर आला होता. पंधरा वीस फुटावर एक मोठी घार वाळूत शांतपणे उभी राहून माझ्याच कडे बघत उभी होती. ती तेथे का उभी होती हे आता मला चांगलेच माहीत होते. काळजी करत बसण्यापेक्षा नातवावर नजर ठेवणे सोपे नाही का ?
आज चाळीस वर्षांनंतर मी त्याच वाळूत अशाच चंद्रप्रकाशात खुर्ची टाकून बसलो आहे. अरे हो मधे काय काय झालं हे सांगायलाच पाहिजे.
आजी गेली. तिच्या अगोदर आई गेली. मी लष्करात कमिशन घेऊन वेगवेगळ्या गावी हिंडत होतो. अगदी कांगोमधेही गेलो. आता निवृत्त होऊन आजीच्या गावी बस्तान बसवले आहे. मामांनी गाव सोड्ले पण मी त्यांच्याकडून तुळशी वृंदावनापासून ते मागच्या दरवाजापर्यंत सर्व जागा विकत घेतली. डागडूजी केली. पण आहे तशीच ठेवली अगदी. त्या बाजे सकट, त्या खिडकीसकट. मागच्या दरवाजापासून नदीपर्यंत सगळी जमीन विकत घेऊन मी आता त्याच वाळूत खुर्चीवर आरामात माझ्या आवडत्या व्हिस्कीचे घोट घेत बसलो आहे. समोरच्या टेबलावर माझा लॅपटॉप आणि माझा पाईप. लॅप्टॉपवर मिसळपाव उघडलेले आहे आणि माझे वाचक मित्र आणि मैत्रिणी मदनबाण, यशोधरा, धमू, स्वाती, शुची, पैसा, मोहर, पुष्करिणी, स्पा, इंद्रा, तात्या, नितीन, शिल्पा, प्राजू मला आग्रह करताएत की अजून लिहा जरा सवीस्तर. पण आता याच्या पेक्षा सविस्तर लिहायचे म्हणजे मला ती पोथीच येथे लिहावी लागेल. ते कसे शक्य आहे ? या वरच समाधान मानून घ्या मित्रांनो !
थोड्याच अंतरावर माझा नोकर माझ्यासाठी बार्बीक्यूवर नदीतले मासे भाजतोय. माझ्या प्लेयरवर संध्याकाळचा अमीरखॉसाहेबांचा मारवा. थोड्याच वेळात माझा तिसरा पेग संपेल. त्याला माहीत आहे की त्या नंतर मला खायला लागते. बरोबर त्याच वेळी तो तो मासा माझ्या समोर टेबलावर आणून ठेवेल.
अरे हो सांगायचे राहिलेच ! मला मुलगी झाली. तिचे नाव साशेंका. लाडाने मी तिला म्हणतो साशा !. पुण्यात असते. तिलाही नुकतीच मुलगी झाली. मोठी गोड आहे माझी नात. म्हणून तिचे नाव ठेवले आहे “सायली”. मधून मधून पुण्याला चक्कर असतेच.
माझी गाडी चौकात पोहोचली की साशा कडेवरच्या सायलीला सांगत असणार “ रडू नकोस आजोबा आले बघ चौकात. ! त्याच वेळी आकाशात एखादातरी काळ ठिपका असणार हे आता मी तुम्हाला सांगायला नको.
मी सहज मागे वळून बघितले, चंद्र चिंचांच्या मागून आकाशात आला होता. त्याच्या प्रकाशात पाणी चमचम करत होते.. पेल्यातले पेय सोन्यासारखे चमकतय. त्या चंद्रप्रकाशात आमच्या वाड्याची काळी आकृती स्पष्ट दिसत होती. मस्त मंद वारा सुटलाय. वाड्याच्या कडेची चिंचेची झाडे मंद हलत होती. मी पाण्याकडे पाठ करून वाड्याकडे नजर रोखली. तेवढ्यात चिंचावरून दोन तीन घारी पंख फडकवत उडाल्या. मी पाईप पेटवला आणि पेल्यातल्या त्या सोनेरी पेयाचा आस्वाद घ्यायला सुरवात केली.
समाप्त.
जयंत कुलकर्णी.
सदर कथा पूर्णपणे काल्पनिक आहे. कोणालाही कसलेही कशाबरोबर साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा. मित्र मैत्रिणींची नावे त्यांना न विचारता लिहीली आहेत त्या बद्दल क्षमस्व. आशा आहे ते माफ करतील !
वाचन
14515
प्रतिक्रिया
39
सुंदर!
In reply to सुंदर! by पैसा
धन्यवाद ! वाचल्याबद्दल आणि
झकास भाग जयवंत
धन्यवाद !
सदर कथा पूर्णपणे काल्पनिक
In reply to सदर कथा पूर्णपणे काल्पनिक by यकु
हा हा ! :-) एक वेगळेच मत !
In reply to हा हा ! :-) एक वेगळेच मत ! by जयंत कुलकर्णी
त्यांच्याकडे उत्तर नसते
झकास!
In reply to झकास! by स्वाती२
धन्यवाद स्वाती ! धन्यवाद !
मस्तच...जरा उशीरा आले ..पण
सॅल्युट जयंत साहेब!
In reply to सॅल्युट जयंत साहेब! by संजय अभ्यंकर
धन्यवाद ! बसू एकदा यासारखे !
In reply to धन्यवाद ! बसू एकदा यासारखे ! by जयंत कुलकर्णी
धन्यवाद!
छान वाटलं इतक्या सुंदर
In reply to छान वाटलं इतक्या सुंदर by शुचि
या सुंदर प्रतिक्रिये बद्दल
+१
आवडली कथा. मित्रांमध्ये
In reply to आवडली कथा. मित्रांमध्ये by यशोधरा
धन्यवाद ! //घारीशी संवाद होतो
अवांतर
In reply to अवांतर by स्पा
हो अर्थातच ! म्हणूनच त्यांची
दीर्घकथा आवडली! सत्याच्या
In reply to दीर्घकथा आवडली! सत्याच्या by नगरीनिरंजन
धन्यवाद ! या प्रामाणिक
मस्त... मध्यंतरी ट्रीप मारली
धन्यवाद !
जबरदस्त...
In reply to जबरदस्त... by चिगो
नमस्कार ! कथा वाचल्याबद्दल
पहिल्या पासुन तर वाचलीलच पण
मनाची पकड घेणारं लिखाण आहे.
आनंद झाला वाचुन..
श्री. जोगळेकर, श्री. झंप्या
अतिशय उत्तम दर्जाचं लेखन
धन्यवाद !
वाह!!! एकदम वेगळी कथा...खूप
In reply to वाह!!! एकदम वेगळी कथा...खूप by शिल्पा ब
धन्यवाद ! शिल्पा ब !
सुंदर कथा ! सगळे भाग एकदमच्
In reply to सुंदर कथा ! सगळे भाग एकदमच् by सुप्रिया
धन्यवाद !
सगळे भाग वाचले आवडली
दुवा दिल्याबद्दल धन्यवाद
एकदम वेगळी कथा