मंडळी चार दिवसावर दिवाळी ! निदान चार पाच पदार्थ तरी घरचे हवेतच नाही का?
हे बेसन लाडू माझ्या पद्धतीचे. अर्थात हा उपद्व्याप नवख्या लोकांकरिता.
तर सामान हा तेच सामग्री :-
५ वाट्या बेसन
१ ते ११/२ वाटी तूप
३ वाट्या पिठी साखर
१०- १२ वेलदोडे ( पावडर करून)
बेदाणे वां मनुके जे आवडेल ते.
थोडे बदाम काप.
अन लास्ट अन बेस्ट इनग्रेडियंट 'नवरा' तो हीं जिम वगैरे करणारा असेल तर उत्तम !!
कृती :-'
बेसन कढईत घालून आच कमीजास्त करत भाजायला सुरु करणे. मी आपल नेहमीचच बारीक दळलेल (फाईन ) बेसन वापरते.
बेसनाची सुरुवातीची वाफ गेली की तूप घालायला सुरु करणे. आता इथून पुढे हात जरा हीं थांबता कामा नये. मग' ए आजच जिम इथच कर ना !' असं लाडिक पणे म्हणून नवऱ्याला तिथे बसवणे. पीठ भाजून होई पर्यंत नाही 'मसल' तयार झाले तर बोला.
बराचसा हा पदार्थ मी माझ्या नाकावर विसंबून करते कारण पूर्वी खाल्लेलं कस होत ते फक्त ' हे घ्राणेंद्रिय ' च मला सांगू शकत.
साधारण अर्धा एक तास एक सारख भाजत राहिला की पाहिला तूप घातल्यावर पिठात एकदम गाठी तयार होतात मग एकदम सार तूप वितळून पीठ पातळ झालं की काय असं वाटू लागत, अन परत तूप घट्ट होऊन पीठ जवळ जवळ तयार व्हायला येत. बस एक सारखा जवळ वाकून वास घेत रहा! साधारण याच वेळी मी बदामाचे काप या बेसनात मिसळते . छान भाजून निघतात. आता आच बंद करून. हे पीठ अगदी थंड गार होऊ दया.
पूर्ण थंड झालेल्या बेसनात मग पिठी साखर, अन वेलदोडे पूड मिसळा अन लाडू वळून वर एक वां दोन बेदाणे लावा.
बेसन लाडू तय्यार . माझ पिठ भाजुन झालय पण लाडु नाही बांधले अजुन, म्हणुन तो फोटो नाही !!
[काही जण पीठ भाजून होत आल की त्यामध्ये दुध घालतात पण त्यामुळे लाडू ;थोड्याच दिवसात त्यातला खवा खराब होऊन, 'वाशेल' होतात.]
अल्टी..!
अपर्णा, लाडू कुठेयत ? किती
व्वा ...
मस्त! टोण्डाला पाणी सुटलं!
मस्त. खमंग सुगंध येतोय
वा वा! फोटो पाहूनच भाजलेल्या
काय जबरी रंग आहे भाजलेल्या
अरे.. या धाग्यावर खुद्द
बेसन लाडू..
:)
:)
From Drop Box" alt="" /> धरा
In reply to From Drop Box" alt="" /> धरा by स्पंदना
अपर्णा, मस्तं !!! काय सुंदर
In reply to अपर्णा, मस्तं !!! काय सुंदर by मितान
मोदकाच्या साच्यात. जरा छान
ज ब र द स्त !!!
मस्त..
लाळेरं...
अतिशय सुंदर ह
अरे देवा
In reply to अरे देवा by मिसळभोक्ता
वा!! काय खमंग विचार आहे. चला