मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

"थेंब"

चेतन · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
थेंब हे पावसाचे, धरणीसं सुगंधणारे थेंब हे अत्तराचे, सर्वत्र सुवासणारे || थेंब हे घामाचे, सर्वांग निथळणारे थेंब हे दवाचे, आळवास शोभणारे || थेंब हे जलाचे, तहानेस त्रुप्तणारे थेंब हे ओषधाचे, यातनेस सुप्तणारे || थेंब हे सुरांचे, शांततेस भंगणारे थेंब हे मदिरेचे, क्षणभर विसरवणारे || थेंब हे प्रतिभेचे, कवितेसं श्रुंगारणारे थेंब हे तारुण्याचे, बंधनासं झुगारणारे || थेंब हे मायेचे, मनासं ओलावणारे थेंब हे प्रेमाचे, ह्रुदयास भिजवणारे || थेंब हे अश्रुंचे, डोळ्यातुन ओघळणारे थेंब हे हास्याचे, ओठातुन पाझरणारे || थेंब हे तुषाराचे, मनासं अल्हादणारे थेंब हे थेंबाथेंबाचे, थेंबात नाचणारे || (थेंबाथेंबांत लिहणारा) चेतन

वाचने 3508 वाचनखूण प्रतिक्रिया 6

फटू Fri, 05/23/2008 - 11:06
थेंब हे मायेचे, मनासं ओलावणारे थेंब हे प्रेमाचे, ह्रुदयास भिजवणारे || थेंब हे अश्रुंचे, डोळ्यातुन ओघळणारे थेंब हे हास्याचे, ओठातुन पाझरणारे || बहुतेक याला अनुप्रास अलंकार म्हणतात... पुन्हा, सतीश गावडे आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...

चेतन Fri, 05/23/2008 - 12:29
हा शब्दअनुप्रास आहे कि नाही हे माहीत नाही पणं अक्षरअनुप्रास होउ शकतो (चे, रे) शब्दावर केलेल्या अनुप्रासाचे एक ढापलेले उदाहरणं धवल करान्नी धवल फुले ती धवल गुणी गाठी

प्राजु Fri, 05/23/2008 - 19:33
कविता आवडली.. थेंब हे मायेचे, मनासं ओलावणारे थेंब हे प्रेमाचे, ह्रुदयास भिजवणारे || हे खास.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

चेतन Mon, 05/26/2008 - 14:10
सतिश, ईश्वरी, प्राजु ताई, शितल प्रतिक्रियांबद्दल आभार. स्वगतः ह अनुप्रास आहे कि नुसते यमक? बहुतेक नमोगतावरचा लेख परत वाचल पाहिजे