मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

चारोळ्या

यशोधरा · · जे न देखे रवी...
लेखनविषय:

वाचने 7409 वाचनखूण प्रतिक्रिया 15

आनंदयात्री Wed, 05/21/2008 - 15:33
तुझ्या नि माझ्या वाटा, एकमेकींशी नेहमीच समांतर एकत्रच चालतात खर तर, पण मिटत नाही अंतर सुंदर !! .. अन असे दाटूनी येते सांजवेळी डोळां नीर डोळ्यातला पाण्याला नीर म्हटलेले पहिल्यांदा पाहिले, छान. सुंदर आहेत तुमच्या चारोळ्या. पुलेशु.

ऋचा Wed, 05/21/2008 - 15:35
शब्दांचे सांडती धबधबे, रक्तास जिव्हाळा नाही नात्यांचे मृगजळी फ़ुलोरे, विश्राम जिवाला नाही... तुझ्या नि माझ्या वाटा, एकमेकींशी नेहमीच समांतर एकत्रच चालतात खर तर, पण मिटत नाही अंतर सही......... :)

प्रगती Wed, 05/21/2008 - 16:07
अन असे दाटूनी येते सांजवेळी डोळां नीर डोळ्यातला पाण्याला नीर म्हटलेले मी पण पहिल्यांदा पाहिले पण छान लीहीलं आहे.

शितल Wed, 05/21/2008 - 17:38
सर्वच चारोळ्या छानच आहेत. अजुन येऊद्या वाचायला आवडेल.

संदीप चित्रे Wed, 05/21/2008 - 19:10
हाय यशोधरा... छान आहेत ग सगळ्या चारोळया... मी जरा एक आगाऊपणा करणार आहे पण तो जाहीरपणे करण्यापेक्षा तुला मेलतो :)

यशोधरा Wed, 05/21/2008 - 19:27
आनंदयात्री, ऋचा, प्रगती, डॉक्टरसाहेब, प्रगती, शीतल धन्यवाद :) संदीप, तुझ्या मेलला उत्तर दिलेय, गंम्मत वाटली :)

फटू गुरुवार, 05/22/2008 - 01:14
.. अन असे दाटूनी येते सांजवेळी डोळां नीर निसटल्या काही क्षणांचे उरी विंधणारे शर कधी कधी कातरवेळी भूतकाळ आठवतो अन् आपण आपल्याला अश्रूंच्या हवाली करतो... सार्‍याच चारोळ्या छान आहेत... पुन्हा, सतीश गावडे आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...

वरदा गुरुवार, 05/22/2008 - 01:42
शब्दांचे सांडती धबधबे, रक्तास जिव्हाळा नाही नात्यांचे मृगजळी फ़ुलोरे, विश्राम जिवाला नाही... शब्दच नाहीत....

मदनबाण गुरुवार, 05/22/2008 - 03:53
लांडग्यांच्या मस्तवाल जगात, माणूस कवडीमोल आहे हे मात्र १००% खर आहे..... मदनबाण.....

कावळा गुरुवार, 05/22/2008 - 12:01
आयुष्याची अनवट धून सुरेल कधी अन कधी बेसूर सप्तस्वरांचे हिंदोळे अन पडते जीवा प्राणांतिक भूल अति उत्तम आपलाच विवेक वि

धमाल मुलगा गुरुवार, 05/22/2008 - 12:54
शब्दांचे सांडती धबधबे, रक्तास जिव्हाळा नाही नात्यांचे मृगजळी फ़ुलोरे, विश्राम जिवाला नाही... तुझ्या नि माझ्या वाटा, एकमेकींशी नेहमीच समांतर एकत्रच चालतात खर तर, पण मिटत नाही अंतर
क्या बात है! छान :)
सांजवेळी डोळां नीर निसटल्या काही क्षणांचे उरी विंधणारे शर
वाह! उरी विंधणारे शर.....क्या बात है! आणखी येऊ दे:) छानच.

विसोबा खेचर गुरुवार, 05/22/2008 - 16:39
शब्दांचे सांडती धबधबे, रक्तास जिव्हाळा नाही नात्यांचे मृगजळी फ़ुलोरे, विश्राम जिवाला नाही... वा! क्या बात है... तात्या.