लग्न
लेखनविषय:
असच एखाद्या दिवशी असेल धो धो पाउस
आणी तू न मी असुत सिंहगडावर
भिजलेले असुत चिंब आपण
आणी गोठलेले असतील शब्द सुद्धा
मग वारा धरेल अंतरपाट आपला
अन आकाश करेल तुझे कन्यादान
तिथेच होईल सप्तपदी आपली
अन गारांच्या असतील अक्षता
झोकून देऊ हे शरीर मग
उंच कड्यावरुन एखाद्या
सोपवून देऊ सगळे काही
चिरंतन अविनाशी मृत्यूला
-आनंदयात्री
हे लेखन इतरत्र पुर्वप्रसिद्ध.
(कवितेत आम्हाला फारशी गती नाही हे जाणुन आहोत :D तरी पण आज पण काहितरी बदलतयं... हे वाचुन पुर्वप्रसिद्ध लेखन पुन्हा देण्याचा मोह आवरला नाही, धन्यवाद.)
वाचने
7913
वाचनखूण
प्रतिक्रिया
19
!
गोठलेले असतील शब्द
>>छे .. छे.
आवडली!
मग वारा
स्वर्ग....
छान कविता !!!
In reply to छान कविता !!! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ढकलून देईन तुझे शरीर मग
In reply to ढकलून देईन तुझे शरीर मग by आनंदयात्री
आमची कल्पना
लै भारी!
क्लास
छान
छ्या
वावा!
पहिली दोन कडवी एकदम सुंदर्
झोकून देऊ
काय राव...
सहमत
सर्वांनी