मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कोजागिरी

कच्चा पापड पक्का पापड · · काथ्याकूट
सोसयटी मध्ये कोजागिरी साजरी करणार आहे. गाण्याच्या भेन्ड्या नेहमी खेळ्तोच. काही नविन खेळ ,कार्यक्रम कुणाला माहित असतिल तर कळवा.

वाचने 9407 वाचनखूण प्रतिक्रिया 46

प्रतिक्रिया

१. लपाछपी २. हुतुतु ३. सागरगोटे ४. चिर चिर घोडी ५. सापशिडी ६. ल्युडो ७.ज्युडो ८. भुताची गल्ली ९. कुस्ती १०. चमचा लिंबु ११. आंधळी कोशिंबीर १२. जोडसाखळी १३.कौन बनेगा करोडपती १४.फास्टेस्ट फिंगर फस्ट १५. टिपरी १६. जुगार (भिकार सावकार) १७. हुतुतु

In reply to by Dhananjay Borgaonkar

आता तुम्ही एवढे १५-१६ पर्याय सुचवलात ना. धाग्याचा उद्देश सफल झालेला आहे. मग काय आहेच फटकेबाजी! ;) आणि नेम कसा नाही, सर्व प्रतिसाद व्यवस्थित नेम धरून मारले जातात! ज्याला लागते त्यालाच कळते! ;)

In reply to by Dhananjay Borgaonkar

=)) =)) धनंजय भौ, सोसायटी पार्ट्या इव्हेंट म्यानेजमेंट कंपनी आहे काय तुमची? ;) असो, मी खेळ सांगू? १. खो खो खेळा खो खो... २. कबड्डी खेळा... ३.पोकर खेळा... (स्ट्रीप पोकर नव्हे. :P )

In reply to by धमाल मुलगा

सोसायटी पार्ट्या इव्हेंट म्यानेजमेंट कंपनी ....आयला ब्येष्ट आईडीया आहे ही :D चालु करायला हरकत नाही खरं :P

In reply to by निवेदिता-ताई

पत्र तरी कुठे माहितेय हल्लिच्या मुलांना...त्यापेक्शा "माझ्या आइचि मेल कुठे गेली.... डिलिट झाली कि स्पॅम मधे गेली "
by the way ...... प्लान्चेत येत का करता? कधी केलंय? आम्ही खूप वर्षापूर्वी एक अयशस्वी प्रयत्न केला होता ..............

वाटाड्या... 21/10/2010 - 19:51
नाना.. तु..शिवापाणी खेळायचास कारे? आता हा खेळ कुठला म्हणुन विचारु नकोस...??? - वापिपाणी
डष्मराज खेळा.. दोन गट करुन मुक अभिनयातुन सिनेमाचे नाव ओळखणे.. लय मजा येते.. नाहीतर प्रश्न प्रश्न.. एका गटाने मनात प्रश्न बन्वायचा..दुसर्याने उत्तर.. पण हे दोन्ही दुसर्या गटाला न कळु देता.. नंतर प्रश्न वाल्या गटाने प्रश्न करायचा आणि दुसर्या गटाने आधी बनवलेले उत्तर द्यायचे.. भन्नाट प्रश्न त्याचे भन्नाट उत्तर... नंतर उलटे करायचे..प्रश्न वाल्या गटाने उत्तर व उत्तर वाल्या गटाने प्रश्न... :)

In reply to by शिल्पा ब

मराठमोळा 22/10/2010 - 05:07
>>बरीच नवी नवी नावे कळताहेत... खरं आहे. डष्मराज खेळा.. डष्मराज हा शब्द काळजाला भिडला. पापण्या पानावल्या. असो, रग्बी खेळा सुसायटीच्या आवारात.