मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

फिलाडेल्फीया

प्रभो · · कलादालन
दोन तीन विकांतापुर्वी फिलाडेल्फीया ला गेलो होतो... त्याची काही प्रकाशचित्रे. इंडिपेंडन्स हॉल फस्ट बँक लिबर्टी बेल असंच टीपी अमेरिकेतल्या सर्वात जुन्या(पहिल्या) झू मधील मोर वाघ कुठलातरी पक्षी (नाव विसरलो) पोलर बेअर पेंग्वीन म्युझीयम ऑफ आर्ट्स सिटी हॉल चर्च

वाचने 10228 वाचनखूण प्रतिक्रिया 55

In reply to by मेघवेडा

प्राजु Fri, 10/15/2010 - 19:31
>>>त्या झूमधल्या आणखी एका प्राण्याचा फोटो होता ना रे?!?! तो कुठे दिसत नाही! ह्म्म! अरे त्या बिचर्‍या प्राण्याचा फोटो कुणी काढलाच नाही. ;) शेवटचे दोन जे फोटो आहेत, ते प्रोसेस केलेले आहेत का? खूप आवडले.

गणपा Fri, 10/15/2010 - 19:39
गेल्यावेळे सारखे ह्यातलेही निवडक फोटो खास आतल्या गोटासाठी राखुन ठेवलेत का ? ;) आवांतर : म्युझीयम ऑफ आर्ट्स च्या कळसावरची कलाकृती आवडली.

पैसा Fri, 10/15/2010 - 20:09
झक्कास फोटो. बरोबर थोडी थोडी माहिती का नाही दिलीस? की स्वतंत्र लेख येणार आहे?

रेवती Fri, 10/15/2010 - 21:12
मस्त फोटू! प्राण्यांचे फोटू तर गोडच येतात. वरच्या काही प्रतिसादांमध्ये आडवळणाने प्रभोची खिल्ली उडवलेली पाहून अंमळ (आनंद झाला) दु:ख झाले. तू असाच फिरत रहा आणि फोटू टाकत रहा. दरवेळी पेश्शल फोटू दोन तीन टाकलेस तरी धाग्याचा टि आर पी वाढेल अशी एक आगाऊपणे दिलेली सुचना. आम्हीही दोन वर्षापूर्वी गेलो होतो. ती क्रायोला फॅक्टरीही पाहिली होती.

Pain Fri, 10/15/2010 - 22:01
रॉकी तिथलाच ना हो ? त्याचा पुतळा आहे त्या इमारतीचा फोटो टाका ना. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिथल्या विमानतळावर फ्री वायफाय आहे :)

In reply to by Pain

प्रभो Fri, 10/15/2010 - 23:34
हो रॉकीचं चित्रीकरण इथेच झालं.. हा रॉकी ३ मधे असलेला त्याचा पुतळा जो सिलव्हेस्टर ने फिली सिटी ला भेट दिला... आणी ह्या रॉकी स्टेप्स (म्युझीयमच्या पायर्‍या)

In reply to by Pain

नितिन थत्ते Sun, 10/17/2010 - 10:59
मस्त फोटो. क्यामेरा कोणता? अवांतरः छ शि आं ह अड्ड्याच्या अंतर्देशीय टर्मिनलवर पण वाय फाय फ्री आहे. हिरव्या देशातच असतं असं नाही. :)

In reply to by शिल्पा ब

Pain Sat, 10/16/2010 - 03:37
मोरावरून आठवले- लहानपणी मोराचे कान फार तिखट असतात असे निबंधाच्या पुस्तकात वाचले होते आणि तेव्हा तिखट याचा अर्थ तीक्ष्ण हे माहित नव्हते. पुष्कळ दिवस तिखट म्हणजे चवीला तिखट अशीच माझी समजूत होती :D

In reply to by मिसळभोक्ता

त्यात सॅन फ्रांसिस्कोचा पण उल्लेख होता. त्याचेच कुतूहल शमवायला तिथे गेलात वाटते :-) @प्रभो :- फोटो छानच आहेत.

In reply to by मिसळभोक्ता

शिर्षक वाचल्या वाचल्या आधी वासूची सासूच आठवले होते. प्रभावळकर साहेब त्याचा जो उच्चार करतात तो लजवाब ;) प्रभो फोटु भारी आहेत रे एकदम. नुसते फोटुच काढले का काही खरेदी पण केलीस तिकडे ? काय आणले नाहीतर कॅफेत पाय टाकु द्यायचो नाही बघ ;)

असुर Fri, 10/15/2010 - 22:38
मस्त फटू रे प्रभो! 'सेपिया'मोड वाले फटु अप्रतिम! फक्त त्या 'इंडिपेंडन्स हॉल'च्या घुमटाला असं कैदेत का टाकलंय तेव्हढं एकदा विचारुन घे राव! :-) --असुर

बेसनलाडू Sat, 10/16/2010 - 03:30
पेन्स लॅन्डिन्ग या महत्त्वाच्या ठिकाणाचा फोटो काढला नाहीस? विलिअम पेन पहिल्यांदा तिथे उतरला. त्या ठिकाणी उभे राहून (फिलाडेल्फियात) समोर पाहिले की न्यू जर्सी राज्य (काही भाग) दिसते :) (प्रवासी)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

शिल्पा ब Sat, 10/16/2010 - 04:13
अरे वा!!! तुम्ही सुद्धा गेला होता का फिलाडेल्फियात ? छान छान....नव्या जुन्याचा असाच संगम होत राहिला पाहिजे.

In reply to by शिल्पा ब

बेसनलाडू Sat, 10/16/2010 - 05:18
त्यानंतर गेल्या वर्षी (२००९) तेथे बीएमएम कन्वेन्शन झाले तेव्हाही जायचे होते; आशा भोसलेंचा लाइव कार्यक्रम, नाना पाटेकरांची मुलाखत वगैरे आकर्षणे होती. पण जमले नाही :( (दुर्दैवी)बेसनलाडू

In reply to by प्रभो

गणपा Sat, 10/16/2010 - 15:19
काय रे चोच्या अस लोकांनी विचारल्या वर एक एक फोटु वाढवत चालाला आहेस. आता आमची चरणधुळ त्या फिलाडेल्फीयाला लागली नाही त्यामुळे अजुन काय आकर्षणे आहेत ती आम्हाला ठाउक नाहीत. एकदाच दे बघु सगळ्या आकर्षणाचे फोटु. लोकांच्या आमंत्रणाची वाट नको बघत बसुस.

सहज Sat, 10/16/2010 - 06:26
काही फोटोवरुन नॅशनल ट्रेझर सिनेमाची आठवण झाली. तसेच नाव, गाव, प्राणी, पक्षी, फूल खेळाची पण आठवण झाली. किमान फिलाडेल्फीयाचे (गाव) वेगळे व प्राणी, फूल वगैरे तरी वेगळे टाकायचेस प्रभो.

Pain Sat, 10/16/2010 - 12:37
अरेच्च्या, मी सुरुवात केली खरे पण आता हे रेडिओवरच्या आपकी पसंद सारखे वाटते आहे. लोक विनंती करतात आणि प्रभो त्या त्या प्रेक्षणीय स्थळांचे फोटो दाखवतात !

sneharani Sat, 10/16/2010 - 12:47
मस्त आलेत फोटो शेवटचे दोन तर अगदी मस्त! :)

In reply to by मी-सौरभ

हॅ हॅ हॅ.. संवेदनशील भागांची चित्रे ते चेपुवर लावायचे. तिथे बाजार उठवल्यापासून कमी केले आहे त्यांनी .

पिवळा डांबिस Sun, 10/17/2010 - 10:04
श्री.प्रभो हे आमचे मित्र आहेत... पण श्री प्रभो ह्यांना फिलाडेल्फियात जाऊन काय बघायचे ते नीटसे कळलेले दिसत नाही.... फिलीमध्ये (हां, हिरवा माज असलेली लोकं फिलाडेल्फियाला फिली म्हणतात!!) भेट द्यायची सर्वात महत्वाची ठिकाणं दोनच आहेत... आणि ती दोन्ही समोरासमोर आहेत... ते आहेत जगातील बेस्ट फिली चीझ स्टेक मिळण्यावे स्टॅन्डस!!! चव अशी की जिंदगीभर याद राहील!!!! हात प्रभो!!! उगीच पीठ मारलेल्या भाज्या वगैरे रेसेपीज लिहितोस!!!! जर फिलीला जाऊन तिथला स्पेशल चीझ स्टेक खाल्ला नसशील तर सब झूट है!!!! राहवले नाही म्हणुन लिहिले, क्षमा केली पाहिजे|| प्रतिसाद संपादित केला आहे : संपादक मंडळ

In reply to by नितिन थत्ते

मस्त कलंदर Sun, 10/17/2010 - 12:44
हो... बहुधा नाही नक्कीच!!!! त्यांचे कॉलेज आधी फक्त स्त्रियांसाठीचे 'वीमेन्स मेडिकल ऑफ पेनिसिल्व्हेनिया' होते. आता तेही को-एड कॉलेज झाले आहे. हा त्या कॉलेजचा आनंदीबाई शिकल्या तेव्हाचा जुना फोटो असावा. (आता ते दुसर्‍या ठिकाणी हलवले गेले आहे)

प्रभो Mon, 10/18/2010 - 18:55
सर्व वाचक-प्रतिसादक मित्र, मैत्रीणी, काका-काकू व एका आजीचे ;) आभार.. @थत्तेचाचा : कॅमेरा Cannon SX120is ,10 MP,10X zoom @पिडांकाका : बीफ खात नसल्याने फिली चिज स्टेक ला लांबूनच नमस्कार केला.. :)

धमाल मुलगा Tue, 10/19/2010 - 20:48
तुला हल्ली काय क्यामेराफिव्हर चढलाय कळेना...पण चांगले फोटु काढतोयस हों... चान चान :) काही फोटु पाहुन 'द फ्री मेसन्स' च्या स्थापत्यकलेची आठवण आल्यावाचुन राहिली नाही. अवांतरः ह्या टिरिपेच्या फोटुंचं प्रायव्हेट सर्कुलेशन कधी रे? ;)