जन्मभराचं ऋण !
लेखनप्रकार
रविवार दुपार. असाच निवांत पडलो होतो,शुक्रवारी रात्री ट्रेकला निघून रविवारी सकाळीचं परत आलो होतो,आणि जेवून झाल्यावर मस्त झोपायच्या तयारीत होतो. आणि दार वाजलं! आत्ता एवढ्या दुपारी कोण आलं असेल ? असा विचार करतच दार उघडलं तर एक सेल्समन ! जेल साबण आणि फ्लोअर क्लिनर वगैरे घेउन आलेला होता. चेहेर्यावर अतिशय दमलेला भाव, उन्हातनं आल्यामुळं घामाघूम झालेला. मी त्याला आत घेतलं,फॅन लावला आणि पाणी आणायला आत गेलो.पाणी भरत असतनाच मला त्याच्या जागी मीच दिसायला लागलो.
२००४ साल असावं, मी पुण्यात येउन सुमारे वर्षभर होउन गेलेलं होतं,ज्यासाठी आलो ते अजूनही गवसतं नव्हतं,जीवाची नुसती तगंमग चाललेली होती. खिशात पैसा नाही,काहीतरी करून वेळ मारून न्यायचं चालू होतं. त्याचवेळी टाईम्स ऑफ ईंडीया साठी सर्व्हे करायचं काम मिळालं. सकाळी १०:००च्या सुमाराला एफ.सी. रोडवरच्या टाईम्स ऑफ ईंडीयाच्या ऑफिसातनं फॉर्म्सचे गठ्ठे घेउन निघायचं आणि ठरलेल्या भागात जाउन घरोघर फिरून,ते कोणता पेपर वाचतात्,का वाचतात, टाईम्स कधी वाचलाय काय? टाईम्स वाचायला आवडेलं काय ? असे प्रश्न असलेले फॉर्म्स भरून घ्यायचे.
काही काही ठिकाणी वॉचमन आत घ्यायचाचं नाही,काही ठिकाणी माणसं दारातूनच हाकलून लावायची. चार्/पाच मजले चढून एकेका बिल्डिंगमधे जायचं,पाठीवर ४०० फॉर्म्सचं ओझं(रविवारी५००फॉर्म्स),आणि एक सुद्धा फॉर्म भरला जायचा नाही. काही काही ठिकाणी चांगल्या घरातली माणसंसुद्धा टर उडवायची,वाट्टेल ते बोलायची,पण दिवसाच्या ८० रु.साठी ते सगळं पचवायचं.
अशाचं एका दुपारी विमान नगरात फिरत होतो,सकाळ्पासून फार फॉर्म्स नव्हते भरले गेले,उलट २-४ जणांच्या शिव्याचं खाउन झालेल्या होत्या.उन्ह नुसतं मी म्हणत होतं,पोटात आग पडली होती,पण कालचं रुमचं भाडं दिलेलं होतं,खिशात फक्त संध्याकाळच्या बससाठी पैसे होते,त्यामुळं तसाच पाय ओढतं चालतं होतो.एका घरापुढं उभा राहीलो बेल वाजवली,२दा,३दा. जरावेळानं एक आजी बाहेर आल्या,काय पाहीजे काय काम आहे अशी चौकशी केली,टाईम्स ऑफ ईंडीया,सर्व्हे वगैरे काहीच त्याना कळालं नाही,मोडक्या तोडक्या मराठीतं म्हणाल्या,मला रे बाबा त्यातली काही माहीती नाही,आमच्या घरी आमचा मुलगाआणि नातूच पेपर वाचतातं. मी काहीचं न बोलता परत फिरलो,तेव्हढ्यात त्यांनी परत हाक मारली,मला आत यायची खूण केली,मी घरात जाउन सावरून एका खुर्चीवर बसलो,आजी आत गेल्या,ग्लासभर पाणी आणि एक वाटी घेउन बाहेर आल्या. माझ्या हातात देउन म्हणाल्या,आज माझ्या नातवाचा वाढदिवस आहे,त्याच्यासाठी त्याला आवडतात म्हणून गुलाबजाम केलेले होते,असं म्हणून माझ्या हातात वाटी ठेवली, माझे डोळे भरून आले,२च दिवसांपूर्वी माझा वाढदिवस चहा आणि पार्ले बिस्किट खाउन साजरा झाला होता,त्याची आठवण झाली. घशातून घास खाली उतरेना,पाण्याबरोबर गुलाबजाम कसेबसे गिळले आणि तिथनं निघालो.
आता दाराशी कोणीही सेल्समन आला, की हे सगळं आठवतं आणि त्याला पाण्याबरोबर काही ना काही नक्की दिलं जातं.बायकोला हयाचा अर्थच कळत नाही,पण मी मात्र त्या दारातल्या प्रत्येकात स्वत:लाच बघत असतो,आणि एक आजन्म न फिटणारे ऋण आठवतं असतो.
पुढच्या वेळी तुमच्या दारावर एखादा सेल्समन येईल तेंव्हा तुम्हाला हे आठवेलं?
वाचने
7134
वाचनखूण
प्रतिक्रिया
41
घरे पडले हृदयाला माझा नवरा
खूप चांगला संदेश देत आहात
In reply to खूप चांगला संदेश देत आहात by पारुबाई
असेच म्हणतो
In reply to असेच म्हणतो by बेसनलाडू
सुरेख लेख!
छान उतरला आहे लेख. अगदी
जावे त्यांच्या वंशा.....
In reply to जावे त्यांच्या वंशा..... by गणपा
+१
तुमचे लेख आवडतात...मलाही मी
मनाला स्पर्शुन गेलं. मी
भापो
सुंदर लेख!
लेख आवडला...
आवडला...
छान
सुंदर....
छान
In reply to छान by आनंदयात्री
+१ सहमत खरोखर छान लिहिले
In reply to छान by आनंदयात्री
+२
अनुभवाची जातकुळी...!!
In reply to अनुभवाची जातकुळी...!! by इन्द्र्राज पवार
अतिशय सुरेख लेख
In reply to अनुभवाची जातकुळी...!! by इन्द्र्राज पवार
आपले पाय कायम जमिनीवरच राहतील" ही भावना
सुपर्ब...
उत्तम लेख ! आवडला
जिप्सी, मनापासून आलेले लेखन.
In reply to जिप्सी, मनापासून आलेले लेखन. by यशोधरा
+१ टची लेखन.
लेख खूप चांगला आहे. लेखात
सुरेख लेखन !!
पुढच्या वेळी तुमच्या दारावर
छान..
नक्की आठवेल..
लेख आवडला.
सुरेख लेखन!
छान. आवडले. गणपा व सहजकाकांशी
छान
छान
आभार !
भिडले
अतिशय सुन्दर लेख
जिप्सी आपला अनुभव काळजाला
जिप्सी आपला अनुभव काळजाला
जबरदस्त लिहिलं आहे. श्रीमंतीत