वर्धापन दिनानिमित्त मिपाला शुभेच्छा!
आज गणेशचतुर्थी. मिपाचा वर्धापन दिन. मिपावर मला येऊन एक वर्ष देखील झालं नाही. मिपाचा, किंवा एकंदरीत मराठी संस्थळांचा शोध लागला तेव्हा माझी वैयक्तिक स्थिती अतिशय वाईट होती. अजूनही ती पूर्णपणे सुधारली नाही, पण मिपामधून मला जो आधार मिळाला, मनात साचून राहिलेलं खूपसं लिहायला मिळालं, वाचायला मिळालं त्यामुळे ती सुसह्य झाली. आपल्या विशाल कुटुंबात मिपाने मला मोकळ्या हातांनी सामील करून घेतलं. माझं लेखन वाचलं, बरेवाईट प्रतिसाद दिले. नवीन लिहायला स्फूर्ती दिली. समधर्मी लोकांशी, मराठी भाषिकांशी सुसंवाद (कधी कधी नुसताच वाद) साधण्याची संधी दिली. त्याही पलिकडे जाऊन अनेक नाती जोडली गेली. सातासमुद्रापलिकडून नवीन ओळखी झाल्या. इतकंच नाही, तर माझ्या आसपास इतके धमाल लोक राहातात हे मिपाच्या कट्ट्यांमुळेच कळलं. खदाखदा हसणं, टिंगलटवाळ्या करणं, आश्चर्याने मुग्ध होणं, फोटो बघून सह्याद्रीत काल्पनिक सफरी करणं, चर्चांमध्ये समरसून तात्विक दणके देणं/घेणं, उत्तम कथा कविता वाचून भारावून जाणं, एखादा जिव्हारी लागणारा अनुभव किंवा कथा वाचून मन व्याकूळ होणं.... एवढ्याशा स्क्रीनमधून काय नाही मिळालं?
मिपाचे ऋण कसे व्यक्त करावे यासाठीच शब्द अपुरे पडतात.
या सगळ्या चान चान गोष्टींबरोबरच काही निरर्थक पण आनंददायी गोष्टीही मिळाल्या
- खरडवह्या उचकपाचक करण्याची सवय : हिच्याशिवाय मी इतकी वर्षं कसा जगलो कोण जाणे
- दशावतार (एकाच व्यक्तीच्या अनेक आयडी) बघण्याची संधी : हे खेळ माझ्यासाठी नवीनच
- एकोळीचे धागे, धाग्यांवर चर्चा, चर्चांवर कौल.... : या विश्वाची आत्माभिमुखताच दिसून येते.
- चूळ, मूळ, धूळ ... अशा विडंबनांचं खूळ!
- पुणेरी लोकांचं प्रचंड प्रेम :)
वगैरे वगैरे.
वर म्हटलं आहे त्याप्रमाणे मिपाचे ऋण व्यक्त करणं एवढंच मला करता येईल. मिपाचा परिवार वृद्धिंगत होतो आहे. तो असाच दिवसेंदिवस वाढत जावो ही इच्छा. मिपावर लेखन करणाऱ्यांना, वाचन करणाऱ्यांना, प्रतिसाद देणाऱ्यांना आणि हो मिपाच्या संपादक व व्यवस्थापकांनाही मनापासून शुभेच्छा. हे सगळे म्हणजेच मिपा (मिपाचा सर्व्हर सोडला तर)! या सगळ्यांची भरभराट होवो ही गणेशाकडे प्रार्थना.
आपणही आपले मिपाचे अनुभव खेळीमेळीने मांडावेत ही विनंती.
वाचने
15029
वाचनखूण
प्रतिक्रिया
37
मिसळपावला परिवाराला वर्धापन
गोजीरं !!
मिपाकरांना वर्धापनदिनाच्या शुभेच्छा
गणपतीबाप्पा मोरया
आम्हाला काय गुर्जीवाणी चान
मी
शुभेच्छा
In reply to शुभेच्छा by नंदन
नंदनने मांडलेल्या कविता महाजनांच्या विचारांशी सहमत आहे.
In reply to शुभेच्छा by नंदन
नंदनने मांडलेल्या कविता महाजनांच्या विचारांशी सहमत आहे.
गुर्जी छान लिहीलंय !! मिपावर
मिपाला वर्धापन दिनानिमित्त
शुभेच्छा-
॥ गणपतीबाप्पा मोरया !!!!!!!!!
सुंदर आढावा !
गुड! मिपा छान आहेच. अगदी
+++++
गणपतीबाप्पा मोरया !!!
श्री गणेशाचा वरदहस्त
:-)
In reply to :-) by सहज
सहजरावांसारखेच म्हणतो....
मी अगदी सुरवातीच्या
गुरुजींच्या
म्हटलं तर 'मिसळपाव' हा
मिसळपावला परिवाराला वर्धापन
या निमित्त
मिसळपावला वर्धापन...............
मिपा वर्धापनदिनाच्या समस्त
मिपाच्या वर्धापनदिनानिमित्त शुभेच्छा
मिसळपाव
सध्या वेळ नाही
मिपा चे अभिनंदन
शुभेच्छा
मिपाचे अभिनंदन
साला या गुर्जीला एकदा फिक्स
मिपाशिवाय दिवस सरत नाही हेच
शुभेच्छा!!!
मिपा आणि मिपापरिवाराला