त्या दिवशीच्या पेपरात
कूठल्याशा गावची खबर होती
खबर जरी लहान असली
तरी तिची मजा जबर होती..
गाव म्हणे आकारानं
तसं जरा छोटं होतं
गावकुसाच्या शिवेवर
हनुमानाचं मंदिर मोठं होतं..
जेव्हा कधी गावात
लग्नाची वरात यायची
व-हाडी मंडळी मंदिराच्या
सावलीला आडोशाला हायची..
वरातीतल्या बायका मात्र
कधीमधी मंदिरात जायच्या
हनुमानच्या मुर्तीसमोर खुशाल
अंगावरच्या साड्या बदलायच्या..
सालोसाल असंच घडुन
अखेर ती एक रीत झाली
मात्र शेवटी हनुमंताच्या
ब्रम्हचर्याची जीत झाली..
एकदिवशी भक्तांच्या ध्यानी आलं
मुर्तीनं डोळे मिटले होते
कदाचित हनुमंताच्याही डोळ्याचे
आता पारणे फिटले होते...!
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
6384
प्रतिक्रिया
21
मिसळपाव
प्रतिक्रिया
कदाचित हनुमंताच्याही
सहमत
In reply to कदाचित हनुमंताच्याही by परिकथेतील राजकुमार
सहमत.
In reply to सहमत by अवलिया
अरे हो...
नाही हो.. गोतमारे. आमच्या
In reply to अरे हो... by चिगो
कविता आणि कल्पना झक्कास हो.
राजकुमाराशी सहमत... बाकी,
मारुती स्त्री राज्यात
In reply to राजकुमाराशी सहमत... बाकी, by मदनबाण
ह्म्म. मग त्या मूर्तीचे डोळे
In reply to मारुती स्त्री राज्यात by परिकथेतील राजकुमार
मकरध्वज आठवतोय ना ? खी खी
झकास रे
झकास कविता...!
अजून येऊ दे....! कोण ?
In reply to झकास कविता...! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>> कोण ? कविता येऊ दे असे
In reply to अजून येऊ दे....! कोण ? by परिकथेतील राजकुमार
खुलाशाबद्दल धन्यवाद हो.
In reply to >>> कोण ? कविता येऊ दे असे by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आई ग
सुरेख...
सुरेख सुन्दर पेक्षा मला ही
धन्यवाद....
छाण..
मस्त.