मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

विडंबन

केशवसुमार · · जे न देखे रवी...
लेखनविषय:

आमची प्रेरणा मिलिंद फणसे यांची अप्रतिम गझल

फक्त मी नावास कर्ता शेष आता
बायको ही लांडगा मी मेष आता

केस पिकले, दात पडले, भिंग सजले
केव्हढा बदलून गेला वेष आता

म्हैस ही बसते, पुन्हा उठतेच कोठे!!
आणि लाजेचा न उरला लेश आता

रोज नवऱ्यांनो, अता ऱ्हावा उपाशी
बायकांनी काढला आदेश आता

एकही ना ठेवला खात्यात पैसा
आणि बचतीचा मला उपदेश आता

सारखी येते तिला ऊर्मी लढ्याची
राहिला नाही मला आवेश आता

घास उतरावा कसा खाली घशाच्या?
काल चे सारे, न काही फ्रेश आता

सासरा, दारू, विडी, आणीक, लफडी
सोड ते, "केश्या", जरा कर श्लेष आता


वाचन 6423 वाचनखूण प्रतिक्रिया 19

इनोबा म्हणे Sat, 05/10/2008 - 00:17
केशवा. मस्त हाणलेस रे! फक्त मी नावास कर्ता शेष आता बायको ही लांडगा मी मेष आता एकही ना ठेवला खात्यात पैसा आणि बचतीचा मला उपदेश आता ह्या ओळी तर जबराच कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

मदनबाण Sat, 05/10/2008 - 00:21
सारखी येते तिला ऊर्मी लढ्याची राहिला नाही मला आवेश आता घास उतरावा कसा खाली घशाच्या? काल चे सारे, न काही फ्रेश आता व्वा रे भिडु.....मस्तच...... मदनबाण.....

चतुरंग Sat, 05/10/2008 - 00:54
छान, मूळ गजलेतल्या प्रत्येक शेराला विडंबन प्रतिशेर (किंवा शेराला 'सव्वाशेर' ;)! (स्वगत - आता ह्या गजलेला छान म्हणून मी घरी एक नवे भांडण ओढवून घेणार की काय? :?) चतुरंग

In reply to by चतुरंग

प्राजु Tue, 05/20/2008 - 19:15
छान, मूळ गजलेतल्या प्रत्येक शेराला विडंबन प्रतिशेर (किंवा शेराला 'सव्वाशेर' !) असेच म्हणते. विडंबन आवडले.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

विजुभाऊ Sat, 05/10/2008 - 18:30
एकही ना ठेवला खात्यात पैसा आणि बचतीचा मला उपदेश आता झकास. सासरा, दारू, विडी, आणीक, लफडी हे उल्लेखाला आलेच की :)

पिवळा डांबिस Sun, 05/11/2008 - 04:25
घास उतरावा कसा खाली घशाच्या? काल चे सारे, न काही फ्रेश आता क्या बात है! केशवसुमारजी, फस्क्लास झालीय हो गझल! -डांबिसकाका

विसोबा खेचर Sun, 05/11/2008 - 13:21
सासरा, दारू, विडी, आणीक, लफडी सोड ते, "केश्या", जरा कर श्लेष आता लै भारी रे केशवा! तात्या.

केशवसुमार Mon, 05/12/2008 - 08:47
प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार! (आभारी)केशवसुमार

अरुण मनोहर Fri, 05/16/2008 - 10:05
प्रतिक्रिया न दिलेला एक लिहीतो आहे. आतापर्यंत वाचलेच नव्ह्ते. वाचल्याबरोबर लिहावेसे वाटले. अतीउत्तम. आणखी येऊदे. एकही ना ठेवला खात्यात पैसा आणि बचतीचा मला उपदेश आता बचके रहना रे बाबा बचके रहना रे!

मित Mon, 05/19/2008 - 11:08
माला पन थोड बोलयच आहे कराया गेलो सुखानचि बेरीज राहीले न काही शेष आता !!!! पुर्षाथाला ही वाटे लाज पाहुन माझे अवशेष आता !!!!

कैलासराजा Wed, 05/21/2008 - 14:02
नाथा पुरे आता बायकोवर करीशी गझल कुटवर गेली ही मजल.... शाब्बास केशवा...............